कोंकण विभागात महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर हे शहर आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन पासून 55 किमी वर स्थित आहे.
आम्ही उल्हासनगर येथे जवळजवळ सकाळी 10 वाजता कार ने सुरक्षितपणे पोहचलो. विल्सन क्रुज, पास्टर वायलेट लोबो व ओमप्रकाश हे पास्टर मायकल सोबत होते. प्रवास करताना प्रार्थना आणि संगतीचा आम्हाला एक चांगला वेळ मिळाला.
पास्टर दिनेश चावला द्वारे उल्हासनगर येथेसत्य मार्ग जीवन संगती द्वारे हा सुवार्ताप्रसार आयोजित केला गेला होता.
पास्टर मायकल यांनी सकाळच्यासभे मध्ये "तीन पदरी दोरी" वर उपदेश दिला. संपूर्ण चर्च तुडुंब भरलेले होते. अनेकांनी साक्ष दिली की ते वचनाद्वारे आशीर्वादित झाले होते.
सकाळच्या सभेत तेथे अनेक पाळक उपस्थित होते.
नंतर आयोजकांनी पास्टर मायकल व संघाला दुपारच्याभोजनास नेले.
पास्टर मायकल यांनी हॉटेल मधील अनेककामकरणाऱ्यांसाठी जेव्हा ते प्रार्थनेसाठी एकत्र झाले तेव्हा भाकिते केली. भाकिते ही अचूक आणि शास्त्रोक्त होती.
कारण खाणे व पिणे ह्यांत देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यांत ते आहे. (रोम 14:17) देवाचे वचन किती सत्य आहे.
संध्याकाळची सभा पास्टर अंथोनी राज व बहिण संगीता आवळे यांच्या द्वारे भक्ती व स्तुती द्वारे सुरु झाली.
वेळे अभावी पास्टर मायकल हे केवळ 40 मिनिटेच उपदेश देऊ शकले.
पास्टर मायकल कडून एक सुचना:
माझ्या हृदयापासून, मला त्या सर्वांना प्रामाणिकपणे धन्यवाद द्यायचा आहे ज्यांनी उल्हासनगर सुवार्ताप्रसार कार्यासाठी प्रार्थना, उपास व साहाय्य केले आहे.
पास्टर दिनेश माझा पाहुणचार केल्याबद्दल तुम्हालाधन्यवाद.
प्रभू जो गुपित सर्वकाही पाहतो तो उघडपणे आपल्या सर्वाना पुरस्कार देवो (मत्तय 6). येशूच्या नांवात देव तुम्हांस व तुमच्या प्रियजनास आशीर्वादित करो.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या