भारतात लेकरांचा दिवस हा 'बाल दिवस' असा ओळखला जातो आणि हा प्रत्येक वर्षी 14 नोव्हेंबर ला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा केला जातो.
लेकरे ही परमेश्वरा कडून दान अशी आहेत (स्तोत्रसंहिता 127:3). करुणा सदन येथे, आम्ही हे समजतो, की लेकरे ही उदयाचे भविष्य असे आहेत आणि म्हणून आम्हाला त्यांचे योग्य पालनपोषण करण्याची गरज आहे.
लेकरांच्या दिवसाच्या प्रसंगी, पास्टर मायकल आणि पास्टर अनिता यांनी लेकरांना चित्रकला संबंधी एक पाकीट दिले ज्यात खालील वस्तू होत्या:
1 चित्रकला वही
1 पेन्सिल बॉक्स
12 स्केच पेन्स
1 नियॉन रबर
12 रंगीत पेन्सिल्स
प्लास्टिक चे सजावटीचे कागद 12 रंगाचे
तैल पेन्सिल्स 12 रंगाचे
मोमचे चे सजावटीचे कागद 12 रंगाचे
कौटुंबिक आशीर्वाद सभेच्या वेळी लेकरांना ही बक्षिसे देण्यात आली (FBM)
वाव येथे पास्टर मायकल लेकरांना बक्षिसे वाटप करतात-डब्लू जे सभा (WoW-WJ)
वाव येथे पास्टर अनिता लेकरांना बक्षिसे वाटप करतात-डब्लू जे सभा (WoW-WJ)