पास्टर मायकल यांनी शनिवार, 12 ऑक्टोंबर रोजी, हिंदी भाषेत करुणा सदनच्या वेबसाईटची घोषणा केली.
या नवीन प्रक्षेपण करण्याची घोषणा करतेवेळी पास्टर मायकल म्हणाले:
एस्तेर च्या पुस्तकात भारत हे नाव दोनदा उल्लेखले आहे. किती आश्चर्यजनक आहे की स्वयं देवाच्या मुखाने भारताचे नाव हे उल्लेखले गेले आहे. खात्रीने भारत या राष्ट्रासाठी देवाकडे एक योजना आहे.
एस्तेर 1:22 आपल्याला राजा अहेश्वरोश बद्दल सांगते ज्याने त्याच्या भागातील लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत पत्रे पाठवितो. इतिहास आपल्याला सांगतो की त्याने भारतातील स्थानिक भाषे मध्ये सुद्धा पत्रे पाठविली.
भारतामध्ये इन्टरनेट प्रेक्षक हे 50 टक्क्या पेक्षा अधिक हिंदी भाषिक आहेत. केएसएम हिंदी वेबसाईट आणि नोहा अॅप चे नवीन प्रक्षेपण हिंदी भाषे मध्ये करणे हे लोकांना चांगली मुल्ये व सिद्धांत याजवळ आणण्याचे महत्वाचे पाऊल आहे.
करुणा सदन हिंदी वेबसाईटचे वेबसाईट यूआरएल हे https://karunasadan.com/hi आहे.
विडीओ पाहा:
नोहा चर्च सभासद अॅप वर:
ही सेवा हिंदी मध्ये वापरण्यासाठी, वापरणाऱ्यास सेटिंग मुख्य यादी मध्ये भाषा बदलावी लागेल.
पाऊले:
1. होम पेज वर डाव्या कोपऱ्यातील मुख्य यादी बटन दाबावे.
2. खाली जात राहावे व 'भाषा' वर क्लिक करावे व हिंदी ही पाहिजे असणारी भाषा निवडावी.
3. वापरणारा हा पाहिजे ती भाषा पुन्हा इंग्रजी भाषे कडून जाऊन बदलू शकतो.
जानेवारी २०२० पर्यंत, पास्टर मायकल कडे दृष्टांत आहे की मराठी भाषेत सुद्धा हे सुरु करावे. कृपा करून यांस आपल्या प्रार्थनेत आठवण करा.
अधिक माहिती, प्रश्ने यासाठी, कृपा करून नोहा अॅप वर बातचीत करणे ह्या पर्यायाचा उपयोग करा किंवा सरळपणे केएसएम कार्यालयास संपर्क करा.