सकाळी 7.30 वाजता कार ने घरातून निघालो. पुण्यात जवळ जवळ दुपारी 12 वाजता पोहचलो. पुण्याच्या मार्गावर तेथे खूपच वाहतूक होती.
जेव्हा मी पुण्याला पोहचलो, मी सरळ त्या चर्च मध्ये गेलो जेथे उपासना घेतली जाणार होती. घटनास्थळी पुढाऱ्यांना भेटलो आणि त्यांच्याबरोबर प्रार्थना केली.
चर्च च्या पुढाऱ्यांनी पास्टर मायकल यांचा सत्कार केला.
मला सांगण्यात आले की साधू सुंदर सिंग यांनी भविष्यवाणी केली होती की, "हे चर्च ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत स्थिर राहणार", मी सुद्धा ती जागा पाहिली जेथे हा महान देवाचा सेवक उभा राहिला होता आणि संदेश दिला होता (चर्च च्या बाहेरील जागा). हे ह्याकारणासाठी की त्यांनी त्यास चर्च मध्ये संदेश देऊ दिला नव्हता.
वरील चित्र हे साधू सुंदर सिंग याचे आहे जेथे ते उभे राहिले आणि संदेश दिला होता.
मला कोणाला केवळ हे सांगावयाचे आहे की जर तुम्ही चांगले कार्य करीत असताना सुद्धा आज तुमचा अस्वीकार केला गेला आहे, तर प्रोत्साहित व्हा, तेथे अशी वेळ येईल जेव्हा तुमचा सत्कार केला जाईल.
मी मुख्य आयोजकांच्या घरी सुद्धा भेट दिली आणि त्यांच्या प्रियजनांसह प्रार्थना केली. त्यांनी मला सांगितले की ते माझे कार्यक्रम अनेक वर्षे शुभसंदेश आणि यूट्यूब वर पाहत आहेत. सहयोगी आणि दान देणाऱ्यांना विशेष धन्यवाद जे देवाच्या कार्यास साहाय्य पुरवितात. मी तुम्हा प्रत्येकासाठी शांतपणे देवाला धन्यवाद देतो.
त्यादरम्यान एक विशेष बस जी मुंबई वरून पुण्यासाठी आयोजित केली गेली होती ती सुद्धा घटनास्थळी 12.30 वाजता पोहचली. आयोजकांनी कृपापुर्वक दुपारच्या व रात्रीच्या भोजनाची त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था केली होती.
पास्टर मायकल ने इतर पाळकांकडून सन्मान स्वीकार केला
लोकांनी चर्च च्या अंगणात बसून देवाचे वचन ऐकले
घटनास्थळी जमावाचा काही भाग
घटनास्थळी आणखी एका जमावाचा काही भाग
उपासने नंतर संघाला संध्याकाळचे भोजन पुरविले गेले.