बेथलेहेम हे पलेस्टाईनचे एक शहर आहे जे केंद्रीय पश्चिम किनाऱ्यावर, यरुशलेमेच्या दक्षिणेला 10 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.
बेथलेहेम या शब्दाचा अरेबिक भाषे मध्ये अर्थ, 'मांसाचे घर' असे आहे,
बेथलेहेम या शब्दाचा इब्री भाषे मध्ये अर्थ, 'भाकरीचे घर' असे आहे,
एक अतिभव्य चर्च त्याच ठिकाणी बांधले गेले आहे जेथे यहूदा नगरात बेथलेहेम मध्ये येशूचा जन्म झाला होता. ह्या चर्च ला नेटीविटी चर्च असे म्हटले गेले आहे आणि हे संपूर्ण इस्राएल मध्ये हे सर्वात जुने चर्च आहे.
इस्राएल आणि त्यांच्या शत्रुंमधील युद्धात सर्व चर्च हे नष्ट केले गेलेत.
चर्च च्या आतील भाग
येशूच्या जन्माची भविष्यवाणी
"हे बेथलेहेम एफ्राथा, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुजमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे." (मीखा 5:2)
अचूक जागा जेथे प्रभू येशूचा जन्म झाला होता
प्रभू येशूच्या जन्माचे ठिकाण
योसेफ हा दावीदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दावीदाच्या बेथलेहेम गांवी गेला, व नांवनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असतांना असें झाले की, तिचे दिवस पूर्ण भरले; आणि तिला तीचा प्रथम पुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती. (लूक 2:4-7)
जेव्हा त्यांना उतारशाळेत जागा नव्हती, तेव्हा योसेफ ला एका गोठयात जागा देण्यात आली जेथे प्राण्यांना ठेवण्यात येत होते. हा तो गोठा होता जेथे येशूचा जन्म झाला.
याकोबाची पत्नी-राहेलची पुरण्याची जागा सुद्धा बेथलेहेम हेच होते
ह्याप्रमाणे राहेल मरण पावली आणि एफ्राथ (म्हणजे बेथलेहेम) गावांच्या वाटेवर तिला पुरिले. (उत्पत्ति 35:19)
सर मोजेस मोंटेफिओर यांनी 1841 मध्ये गोलाकार बांधलेल्या इमारतीच्या आतमध्ये राहेल ची कबर आहे.
संदेष्टा शमुवेल ने दावीदास इस्राएलचा राजा म्हणून बेथलेहेम मध्ये अभिषिक्त केले ( 1 शमुवेल 16: 1, 4, 13)
दावीदाचे वंशज रुथ आणि बोआज हे बेथलेहेम मध्ये विवाहित झाले. (रुथ 4:13-17)