बायबल मध्ये मृत समुद्राला खारट समुद्र असे म्हटले आहे, अरबी समुद्र, आणि पूर्वीय समुद्र.
तुमच्यापैकी जे मृत समुद्राला जाऊन आले, तुम्ही आशीर्वादित लोक आहात कारण मी ऐकले आहे की मार्गदर्शक म्हणतो (आणि यांस आणखी विश्वसनीय स्त्रोत कडून खात्री करून घेतले आहे) की काही वर्षात मृत समुद्र हा पूर्णपणे नाहीसा होईल.
ह्या तलावात पाणी हे यार्देन नदीमधून येते ज्याचा लोक पिण्यासाठी वापर करतात. इस्राएली सरकार ने यार्देन नदीला मृत समुद्रात जाण्यापासून थांबविले आहे. आणि मग फारच थोडया पावसाने, मृत समुद्राला प्रत्येक वर्षी कमी पाणी मिळत आहे.
येथे काही टिपा आहेत की मृत समुद्राकडून सर्वात चांगले परिणाम घ्यावेत जर तुम्ही पुढच्या वेळी येण्याचा विचार करीत आहात.
टीप # 1
जर तुम्हाला काही कापलेले आहे किंवा उघडे फोड आहेत तर पाण्यात उतरू नका. जर तुम्ही तसे केले, तर तुम्ही ती म्हण "जखमेवर मीठ चोळावे" यास नक्कीच समजाल. मागच्या वेळी, अहरोनला पायावर काही कापलेले होते आणि ते खूपच पीडादायक होते.
टीप # 2
पाण्यास तुमच्या डोळ्यात लावू नका. वास्तवात, काही वेळा मागे, मला किनाऱ्यावर चांगले स्वच्छ पाणी घेऊन थांबावे लागले जेव्हा काही स्त्रियांच्या डोळ्यात पाणी गेले होते आणि त्याने त्यांना घाबरवले होते. मला माहीत आहे हे फारच मूर्खपणाचे वाटते, परंतु ही एक व्यवहारिक सुचना आहे.