बातमी
कोरोना विषाणू आजार-१९ पासून सुटके साठी पास्टर मायकल सर्वांना उपास आणि प्रार्थना करण्यास आमंत्रित करीत आहे.
Sunday, 29th of March 2020
58
13
2809
करुणा सदन सेवाकार्या चे पास्टर मायकल सर्वांना आमंत्रित करीत आहेत की त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या संघासह कोरोना विषाणू आजार-१९ पासून सुटके साठी तीन दिवस उपास आणि प्रार्थने मध्ये एकत्र या.
उपास करण्याचे दिवस: २९, ३० आणि ३१ मार्च २०२०
१. मला, माझ्या कुटुंबियांना आणि घरादाराला येशूच्या मौल्यवान रक्ताने पांघरून घाल, येशूच्या नांवात.
२. पित्या, हा आत्मविश्वास ठेवून की जर आम्ही तुझ्या इच्छेनुसार काहीही मागितले, तर तूं आमचे ऐकतोस. आम्हांवर तुझी दया असू दे यासाठी आम्ही तुला विनंती करीत आहोत आणि ह्या कोरोना विषाणूची मरी थांबव. येशूच्या नांवात. (१ योहान ५: १४)
३. पित्या, तूं आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे; संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध. आम्ही तुझ्याकडे विनंती करीत आहोत की ते सर्व जे ह्या विषाणू मुळे पीडे मध्ये आणि आजारी आहेत त्यांना स्पर्श कर. आम्ही ही सुद्धा विनंती करीत आहोत की ज्यांना ह्या विषाणूच्या आजारामुळे एकटे ठेवले गेले आहे त्यांचे सांत्वन कर. येशूच्या नांवात.
४. मी कबूल करतो की, परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. असे होवो की आमच्या सभोवतालची भीती, पीडा आणि निराशा अग्निद्वारे भस्म होवो. येशूच्या नांवात.
५. पित्या, आम्ही आमच्या संकटसमयी तुझा धावा करतो आणि तूं विश्वसनीय आहेस आणि खात्रीने आम्हांस ह्या वर्तमान क्लेशांतून मुक्त करशील. जे ह्या कोरोना विषाणू -१९ मुळे आजारी आहेत त्यांची काळजी घेणाऱ्या सर्व आरोग्य सेवक वर्गासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्यावर तुझे संरक्षण आणि कृपे साठी आम्ही तुला विनंती करीत आहोत. येशूच्या नांवात. (स्तोत्रसंहिता १०७: २८)
६. पित्या, पास्टर मायकल, आणि करुणा सदन सेवाकार्यातील इतर अनेक पास्टर आणि पुढाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो की ते दैवी मार्गाने तुझ्या आत्म्या द्वारे मार्गदर्शित व्हावे की अशा वेळी योग्य वचन प्रचार करावा आणि योग्य कार्य करावे. येशूच्या नांवात.
७. पित्या, तुझे वचन सांगते, "आम्ही तुझे शरीर आहोत, आणि आम्ही प्रत्येक जण त्या दैवी शरीराचे भागीदार आहोत." आम्ही सर्व चर्च साठी (त्यात करुणा सदन सेवाकार्य सुद्धा आहे) प्रार्थना करतो की त्यांनी टेकडीवरील प्रकाशाप्रमाणे व्हावे जेथे परमेश्वराने त्यांना ठेवले आहे. येशूच्या नांवात. (१ करिंथ १२: २७)
८. पापकबुली:
कोणतेही अरिष्ट माझ्यावर आणि माझ्या प्रियजनांवर येणार नाही,
कोणतीही व्याधी माझ्या घराजवळ आणि जेथे मी राहत आहे तेथे येणार नाही;
कारण परमेश्वर त्याच्या दिव्यदुतांना आज्ञा देईल की माझ्या आणि माझ्या कुटुंबांच्या सदस्यांचे
आमच्या सर्व मार्गात आमचे रक्षण करावे.
त्यांच्या हातात ते आम्हांला झेलून धरितील. येशूच्या नांवात. (स्तोत्रसंहिता ९१: १०-१२)
९. पित्या, सर्व सरकारी अधिकारी आणि निर्णय घेणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही प्रार्थना करतो जे ह्या संकटमयी परिस्थितीतून देशाला आणि संस्थांना मार्गदर्शन देत आहेत. त्यांच्यावर, त्यांच्या संघावर आणि कुटुंबावर देवाचे ज्ञान व संरक्षण असावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो की त्यांनी कार्यकारी निर्णय घ्यावेत जे त्याच्या देशाला आणि सर्व जगाला लाभदायक असे होतील. येशूच्या नांवात.
१०. पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझ्याजवळ आमच्या हिताचे संकल्प आहे, आमच्या अनिष्टाचे नाही. आम्ही प्रार्थना करतो की लोकांनी नोकऱ्या गमावू नयेत. आम्ही प्रार्थना करतो की व्यवसाय वाढावे कारण तूं कधी असफल होत नाही. येशूच्या नांवात. (यिर्मया २९: ११)
उपास सुरु होतो: ००.०० तास (मध्यरात्री)
उपास संपतो: १६.०० संध्याकाळी (४ वाजता)
केवळ पाणी प्या, चहा कॉफी नाही.
वचन, उपासना आणि प्रार्थने मध्ये अधिकतर वेळ घालवा.
त्यानंतर, तुम्ही तुमचा उपास सोडू शकता, आणि तुमचे नियमित भोजन घ्यावे.
टीप: जर तुम्ही आध्यात्मिकदृष्टया परिपक्व आहात, तर मग तुम्ही १८.०० तास पर्यंत जाऊ शकता.
घरी राहा आणि सुरुक्षित राहा.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या