माझ्या बालपणापासून, मला नेहमीच याचे आश्चर्य वाटत असे की संदेष्टा नोहा ने प्राण्यांबरोबर कसे बोलले असेन (उत्पत्ति ७: ५ वाचा). मी हे सुद्धा वाचत असे की परमेश्वराने हिंस्त्र सिंहाचे तोंड कसे बंद केले आणि मी नेहमी ह्या चमत्काराविषयी आश्चर्य करीत असे (दानीएल ६:२२). माझ्या सुद्धा मनात ही फार गाढ इच्छा होती की व्यक्तिगतपणे हिंस्र प्राण्याबरोबर बोलावे.
आज, जेव्हा मी साऊथ आफ्रिका येथे होतो, माझे कुटुंब आणि मला अशा प्राण्यांबरोबर त्यांच्या नैसर्गिक स्थितीत बोलण्याची अद्भुत संधी मिळाली.


जोहान्सबर्ग येथे लायन्स सफारी पार्क च्या प्रवेशद्वारा जवळ
हिंस्त्र सिंहाबरोबर चालणे आणि त्यांच्यासह वार्तालाप करणे हा एक अद्भुत अनुभव होता
अहरोन आणि अबीगाईल ने सुद्धा सिंहाच्या बच्छड्यासोबत वार्तालाप केला

संघ जे माझ्याबरोबर प्रवास करीत होते त्यांनी सुद्धा, जिराफ, झेब्रा, हरण, हिंस्त्रपशु (एक प्रकारचा नाकतोडा), शहामृग इत्यादी बरोबर वार्तालाप केला.
परमेश्वर प्राण्यांना बोलतो
बायबल सांगते की परमेश्वराने कावळ्यांना आज्ञा केली की संदेष्टा एलीयाला अन्न घेऊन जावे जेथे तो होता, आणि त्यांनी तसे केले (१ राजे १७: ४-६). आपण जेवढे समजू त्यापेक्षा हे निश्चितच शक्य आहे की परमेश्वराने प्राण्यांबरोबर वार्तालाप केला आहे.
परमेश्वर निश्चितच प्राण्यांची काळजी करतो
स्तोत्रकर्ता प्राण्यांबद्दल सामान्यपणे बोलतो, हे म्हणत, "तूं (परमेश्वर) त्यांस त्यांचे अन्न यथाकाळी देतोस म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात" (स्तोत्रसंहिता १०४: २७).
ह्या विशेष अनुभवाने माझ्या अंत:करणात ते सत्य पुन्हा ठळकपणेनिश्चित केले कीप्राणी हे परमेश्वराचे अनोखी निर्मिती आहे आणि म्हणून ते आपल्याकडून सन्मान आणि काळजीस पात्र आहेत.
प्रामाणिकपणे, मी करुणा सदन सेवाकार्यातील सर्वांची आठवण केली आणि खरेच प्रार्थना केली की तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांना हा अनुभव लवकरच मिळावा. ते प्राप्त करा.
Join our WhatsApp Channel

टिप्पण्या