आपल्या सर्वांच्या जीवनात कधी निराशेचा क्षण येतो. मग ते काहीही असो, नुकसान, परीक्षेत नापास, पैशाचा विषय, किंवा विश्वासाचे संकट सुद्धा. जर आपण खूपच निराश झालो, तर ते क्रोधाकडे नेऊ शकते किंवा परमेश्वराबरोबर भ्रमनिरासची भावना होऊ शकते.तरी अशा निराशेच्या वेळी ख्रिस्ती संगती ही का इतकी महत्वाची होते.
बायबल म्हणते, "प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ..........आपण आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा." (इब्री १०: २४-२५)
इतर ख्रिस्ती लोकांसह एकत्र येणे हे आपल्या स्वस्थ होण्याच्या प्रक्रीयेमध्ये साहाय्य करू शकते आणि आपल्याला अत्यंत आवश्यक प्रोत्साहन देते की आपण पुढे जावे.
हे विचारात घेऊन, आम्ही क्रिकेट क्रीडासत्र आयोजित केले आहे. कृपा करून त्याची सव्विस्तरमाहिती खाली पाहावी:
तारीख: रविवार, २६ ऑगस्ट२०१८
वेळ: सकाळी ८ वाजल्यापासून
स्थळ: लैवेंडर बाग, ९० फुटरोड, घाटकोपर पूर्व
मुंबई, महाराष्ट्र ४०००७७
प्रकार: खांद्याखालून बॉलिंग करणे
एकंदरओवर: प्रत्येक टीम मागे चार ओवर
१ ओवर एखादया स्त्री खेळाडू ने बॉलिंग केले पाहिजे (बंधनकारक)
एकंदर संघ: ८ संघ
प्रत्येक संघात १० खेळाडू असतील
७ खेळाडू पुरुष (कोणत्याही वय गटाचे)
३ खेळाडू स्त्री-बंधनकारक(कोणत्याही वय गटाचे)
पास्टर मायकल आणि अहरोन संदीप सुब्रमण्यम
सह(ऐन्जेलिक वारियर चा कप्तान) हे त्या ठिकाणी राहतील
बक्षीस:
पहिले बक्षीस: ५००० रुपये व ट्रॉफी
दुसरे बक्षीस: २००० रुपये व ट्रॉफी
तिसरे बक्षीस: १००० रुपये व ट्रॉफी
वाहन पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध आहे
अल्पोपहार हा सर्वांना देण्यात येईल.
तसेच, ह्या कार्यक्रमाला देण्यासाठी तुम्हांला प्रेरणा आली तर कृपा करून नोहा ऐप वर डोनेशन बटन वापरा. परमेश्वर खात्रीने तुम्हाला बक्षीस देईल. (रुथ २: १२)
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या