हे अति दु:ख व शोक द्वारे मी तुम्हांला सांगत आहेत की माझी आई, श्रीमती रोझी फर्नांडीस (वय ७६) यांचे निधन झाले आहे.
तिचे मूत्रपिंड निकामी झाले आणि मग तिला एक मोठा हृदयघात झाला.
तिने ह्या पृथ्वीवर तिचे विश्वासाचे एक चांगले युद्ध लढले आणि तिची धाव संपविली आहे (२ तीमथ्यी ४:७). माझी आई एक प्रार्थना योद्धा होती, तिच्या प्रार्थनांनी मला, माझ्या कुटुंबाला आणि सेवाकार्याला बळकटी आणली होती. मी तिची कमतरता खूपच अनुभवीत आहे परंतु मी परमेश्वराला धन्यवाद देत आहे की मला एक अद्भुत आई दिली होती.
तसेच, तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. (इब्री ६: १०)
अंत:करणापासून, मी प्रामाणिकपणे माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीने तुमचे आभार मानीत आहे. तुम्ही माझ्यासाठी जे केले आहे त्याची परत फेड मी कधीही करू शकत नाही.
कृपा करून माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. त्यांना माझ्या आईची कमी फारच जाणवत आहे.
त्याच्या उपस्थितीत
पास्टर मायकल फर्नांडीस
Join our WhatsApp Channel

टिप्पण्या