बातमी
पास्टर मायकल त्यांच्या आई साठी गीता द्वारे श्रद्धांजली व्यक्त करत आहेत
Monday, 26th of October 2020
56
2
1096
पास्टर मायकल फर्नांडीस यांनी त्यांच्या दिवंगत आई, श्रीमती रोझी फर्नांडीस, ज्या जून ५, २०२० रोजी देवाघरी गेल्या त्यांच्यासाठी एका गीता द्वारे भावनात्मक श्रद्धांजली वाहिली आहे, त्या गीताचे शीर्षक आहे: मी ती वेळ आठवतो. पास्टर मायकल द्वारे स्वतः हे गीत लिहिले व गाईले आहे.
पास्टर मायकल यांनी इंस्टाग्राम वर, त्याच्या आई साठी एक हृदयस्पर्शी टिप्पणी लिहिली आहे:
विडीओ पाहा:
सध्याच्या त्यांच्या एका सभेत प्रार्थना सुरु असताना, पास्टर मायकल यांनी म्हटले, "जर तुमचे आई-वडील आजही तुमच्यासोबत आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी करा. तुम्ही आज जे काही आहात, त्यासाठी त्यांनी एक महान भूमिका पार पाडली आहे. वाट पाहू नका, तोपर्यंत ते कदाचित निघून गेलेले असतील."
प्रेषित पौलाने लिहिले: "आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तूं पृथ्वीवर दीर्घायू असावे,' अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे." (इफिस ६:२-३)
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या