पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे उपदेश देते की आपल्या लेकरांचे प्रभूच्या मार्गात संगोपन करावे (नीतिसूत्रे २२:६).
लेकरांच्या दिवसाचा उत्सव नोहा ऐप व्यासपीठ वर डिजिटल मार्गाने रविवार १५ नोव्हेंबर २०२० ला पाळला गेला.
शिक्षिका हीरा वेस्ली द्वारे लहान प्रार्थनेसह उत्सव सुरु झाला.
लेकरांचे आवडते श्री पिकल व गोवा येथील शिक्षकांद्वारे (नीलज व वीना) कार्यक्रमाची ओळख केली गेली.
त्यानंतर पवित्रशास्त्रावर आधारित रंगीबेरंगी पोषाख-परिधान करणे स्पर्धा झाली. लेकरांना पवित्र शास्त्रातील व्यक्तिंसारखी वस्त्रे घातली गेली. पवित्र शास्त्रातून अनेक खेळाचा सुद्धा वापर केला गेला. स्पर्धक जी वेशभूषा/भूमिका पार पाडत आहेत त्यास आधार म्हणून बायबल मधून वचनाचा संदर्भ द्यायचा होता. प्रत्येक स्पर्धकाला त्यांचा भाग पूर्ण करण्यासाठी १ मिनीट दिला गेला.
तेथे तीन वय गट होते:
गट अ- ४ वर्ष ते ७ वर्ष
गट ब- ८ वर्ष ते १० वर्ष
गट क- ११ वर्ष ते १३ वर्ष
आमचे उत्कृष्ट परीक्षक-पास्टर अनिता, पास्टर विल्यम, पास्टर जुलीएटा, पास्टर वायोलेट व बहिण जेलीटा ह्या सर्वांद्वारे याचे फार चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले गेले होते. ही स्पर्धा आयोजित करण्यास पास्टर एलाविओ यांनी मुख्य भूमिका पार पाडली होती.
ह्या स्पर्धेचे विजेते
ह्यानंतर अहरोन व अबीगईल द्वारे एक लहान प्रेरणादायक संदेश दिला गेला.
वीओना द्वारे शिकविलेले डोळ्याचे मुखवटे करण्यास लेकरे हे अत्यंत उत्साही होते.
नीलज व वीना द्वारे जीभ वळविण्याचा खेळ त्यामागे एक लहान संदेश सह आयोजित केला गेला की आपले शब्द योग्यरीत्या वापरावे.
पास्टर एलाविओ द्वारे खजाना शोधण्याचा खेळ आयोजित केला गेला. खजाना शोधण्याच्या वेळी, लेकरांना आवाहन दिले गेले की त्यांना दिलेली विविध कार्ये/वस्तू शक्य तितक्या जलद वेळेत पूर्ण करावे/दाखवावे.
मुंबई येथील आमच्या प्रिय शिक्षिका हीरा, अर्चना, अनिता, वीनी, अस्मी व इग्नीस द्वारे बायबल वाचनाच्या महत्वावर आधारित हावभाव करून एक नाटिका आयोजित केली गेली.
सर्व लेकरांसाठी हा संपूर्ण दिवस मनोरंजन-खेळाने भरपूर होता. आई-वडील व मध्यस्थी करणारे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांची अत्यंत प्रशंसा करतो. पास्टर एलाविओ व ते सर्व ज्यांनी हा कार्यक्रम होण्यासाठी साहाय्य केले त्यांचे अत्यंत आभार. परमेश्वर तुमचा आदर करेल. (१ शमुवेल २:३०)
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या