मृतकांच्या मित्रमंडळीसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी एखादा निधनवार्तेचा लेख एक महत्वाची सूचना म्हणून कार्य करतो. दु: खाच्या वेळी, ज्यांना महत्त्वाची वाटते त्यांना ही बातमी सांगणे खूप अवघड होते.
ऐतिहासिकदृष्ट्या,प्रिय व्यक्तीच्या निधनाची ही बातमी वर्तमानपत्रातून जाहीर केली जात असे, जेथे कुटुंबातील सदस्यांना ही निधनवार्ता प्रसारित करण्यासाठी वर्तमान पत्रकाला बरेचशे पैसै द्यावे लागत असे.
हा पास्टर मायकल यांचा दृष्टांत होता आणि म्हणूनच नोहा अॅपवर, मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना ही बातमी लवकर पसरविण्यात मदत करेल अशा एका निधनवार्तेच्या विभागाची सुरुवात आम्ही केली आहे. हा अॅप प्रेतक्रियेची अधिक-आवश्यक माहीती देखील पुरवील.
निधनवार्तेचा लेख कसा प्रसारित करायचा?
नोहा अॅपवरील मेन्यूवर जावून, निधनवार्तेच्या विभागावर जा, आणि (अधिकच्या/प्लस) चिन्हावर क्लिक करा. सर्व संबंधित माहिती भरा आणि ती माहीती मंजूरी मिळविण्यासाठी पुढे जाईल. हे इतके सोपे आहे. तसेच, ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. ही सेवा नोहा अॅपवर असणाऱ्या (आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य) सर्वांसाठी आहे.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या