२०२३ साठी भविष्यवाणी
आ). २०२३ हे वर्ष जगासाठी दुष्काळाचे वर्ष असणार आहे. तथापि, देवाच्या लोकांसाठी, हे पुरवठा आणि विपुलतेचे वर्ष असेल. दुष्काळा दरम्यान, परमेश्वराने राजाच्या मेजावरून एलीयास पुरवठा केला होता. परमेश्वर त्याच्या लोकांसाठी अलौकिकरित्या त्याच्या मेजावरून पुरवठा करील.
ब). २०२३ हे तयारीचे देखील वर्ष असणार आहे. "असे असूनही यहोआश राजाच्या कारकीर्दीच्या तेविसाव्या वर्षापर्यंत मंदिराच्या मोडतोडीची दुरुस्ती झाली नाही" (२ राजे १२:६). तुम्ही यापुढे प्रभूमध्ये तुमच्या आध्यात्मिक वाढीकडे दुर्लक्ष करू नका. लोकांतरणासाठी ही महत्वाची तयारी आहे. आपल्याला अचूक वेळ ठाऊक नाही, परंतु मी माझ्या आत्म्यामध्ये जाणतो, की ते पूर्वीपेक्षा अधिक जवळ आहे. सैतानी एजंट बद्दल सावधान राहा जो लोकांतरणाची निंदा करतो.
सी). २०२३ मध्ये, अशा परिस्थिती येतील, त्याचा समुद्रातील व्यवसायाच्या मार्गांवर मोठा परिणाम होईल.
डी) सर्व मानवजाति गवत आहे, तिची सर्व शोभा वनांतल्या फुलासारखी आहे." (यशया ४०:६)
एक जगप्रसिद्ध व्यवसायिकाचे निधन होईल. ते अनपेक्षीपणे होईल आणि सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का असेल.
इ) वैमानिक सेवा जी जगभर आहे ती संपुष्टात येईल. त्याच्या संजीवनाचे अनेक प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.
येथे इतर अनेक गोष्टी देखील आहेत, जे मी तुम्हाला परमेश्वराची परवानगी असेल तर सांगेन.
केएसएम चर्चसाठी भविष्यात्मक वचन
येथे एक महत्वाची गोष्ट आहे, आणि ती विशेषतः त्यांच्यासाठी वचन आहे जे करुणा सदन चर्चचे भागीदार आहेत.
"आणखी असे होईल की, पृथ्वीवरील घराण्यांपैकी जे राजाधिराज सेनाधीश परमेश्वर याचे भजनपूजन करण्यास यरुशलेमेस जाणार नाहीत, त्यांवर पर्जन्यवृष्टि होणार नाही." (जखऱ्या १४:१७)
भौतिक क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे दुष्काळासारखी परिस्थिती उद्भवते. परंतु आध्यात्मिक क्षेत्रात पाऊस नसणे हे याहूनही अत्यंत वाईट आहे; ते आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक भागावर परिणाम करते. कोणताही आध्यात्मिक पाऊस व्यक्तीला आध्यात्मिकदृष्टया कोरडे करीत नाही. ते त्यांचे नातेसंबध, कुटुंब, विवाह, मुलेबाळे इत्यादिंवर परिणाम करते. ही एक अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे.
तसेच, परमेश्वर हा केवळ एखादया व्यक्तीचा परमेश्वर नाही, परंतु तो सर्व कुटुंबांचा देखील परमेश्वर आहे (यिर्मया ३१:१). त्याची इच्छा आहे की आपण एक व्यक्ति म्हणूनच केवळ त्याची उपासना करू नये, परंतु एक कुटुंब म्हणून देखील. नोहाच्या जलप्रलय दरम्यान, त्याने केवळ एखादया व्यक्तीचा बचाव केला नाही, परंतु संपूर्ण कुटुंबाचा देखील केला. जलप्रलयानंतर ते तारवातून बाहेर आले आणि एकत्र मिळून उपासना केली.
तुम्हाला ठाऊक आहे काय की मोशे संदेष्ट्याने रानात देवाच्या निवासमंडपास पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी उभारले होते (म्हणजे, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी)?
"१ परमेश्वर मोशेला म्हणाला, २ पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस दर्शन-मंडपाचा निवासमंडप उभा कर.
१७ दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस निवासमंडपाची उभारणी झाली."
(निर्गम ४०:१-२, १७)
मी विश्वास ठेवतो की परमेश्वर तुम्हाला हे म्हणत आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबासह जानेवारी, १, २०२३ ला शन्मुखानंद प्रेक्षागृह येथे उपासनेसाठी यावे आणि कुटुंब म्हणून उपासना करावी. तुम्हाला कदाचित काही फेरबदल करावे लागतील, पण मग तेव्हाच पवित्र आत्म्याचा वर्षाव तुम्हावर आणि तुमच्या कुटुंबावर येईल.
वर्षाचा पहिला दिवस आपल्या कुटुंबासमवेत नवीन सुरुवातीच्या सेवेत परमेश्वराची उपासना करण्यात घालविणे हा परमेश्वराला प्रथम फळ अर्पण करण्यासारखे आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या गोष्टी पुन्हा जिवंत केल्या जातील, असे परमेश्वराचा आत्मा म्हणतो.