प्रत्येक वर्षी रोझी दिवस ११ जानेवारीला श्रीमती रोझी फर्नांडीस (पास्टर मायकल यांची आई) यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ती एक सामर्थ्यशाली प्रार्थना करणारी योद्धा होती आणि भविष्यात्मक स्पर्शामध्ये कार्य करीत असे. पास्टर मायकल यांचे जीवन आणि सेवाकार्यावर तीचा मोठा प्रभाव होता.
या दिवशी, पास्टर मायकल, अनिता, अहरोन, अबीगईल आणि केएसएम संघातील स्वयंसेवक एकत्र येत असतात की मुंबई शहरातील विविध ठिकाणी गरीब, बेघर आणि अनाथ लोकांना अन्न वाटप करावे.
१. कुर्ला- होली क्रॉस चौक
गरीब व बेघर लोकांना अन्न वाटप केले गेले. अन्नामध्ये, चिकन फ्राईड-राईस, लाडू, केक आणि केळी होते. या कार्यक्रमास आयोजित करण्यासाठी बहिण अनिता शेट्टी आणि भाऊ अनिल शेट्टी यांचे विशेष आभार.
२. स्नेह-सदन- जोगेश्वरी
हे मुलांसाठी अनाथालय आहे. तेथील सर्वाना चिकन बिर्याणी वाटप केली.
३. स्नेह-सदन –अंधेरी
हे मुलींसाठी अनाथालय आहे. तेथील सर्वाना वेज-बिर्याणी वाटप केली.
अन्न पुरविण्याबरोबर, केएसएम स्वयंसेवक हे ते घेणाऱ्या व्यक्तींबरोबर संभाषण देखील करीत होते, त्यांच्या कथा ऐकत होते आणि त्यांना साहाय्य व प्रोत्साहन देत होते. अनेक लाभार्थींनी स्वयंसेवकांच्या दयाळूपणाने बोलण्याबद्दल आणि त्यांना आठवण करून देण्यासाठी कि या जगातील त्यांच्या संघर्षामध्ये ते एकटेच नाहीत यासाठी कृतज्ञता व्यक्त केली.
तो एक यशस्वी कार्यक्रम होता, आणि भविष्यात असे अनेक कार्यक्रम व्हावेत याची आम्ही अपेक्षा करतो. दानधर्म करणारे आणि भागीदार यांना आपल्या त्यागमय साहाय्याबद्दल आभार.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या