english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बातमी
  3. क्षेत्रानुसार नाताळ उत्सव २०२२
बातमी

क्षेत्रानुसार नाताळ उत्सव २०२२

Friday, 13th of January 2023
16 0 540
केएसएम नाताळ उत्सव हे सणाचे व आनंदाचे प्रसंग आहेत ज्याने मुंबई व नवी मुंबई येथील लोकांना एकत्र आणले की सुट्टीचा हंगाम साजरा करावा. १० डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात, २१ दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये संपूर्ण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले गेले.

१. सांताक्रुज (१० डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी कॅथरीन बॅरेटोने नाताळ उत्सव आयोजित केला.

path

फ्रेममध्ये: संघ एका कुटुंबासारखे प्रार्थना करीत आहेत.

path
नाताळ बक्षिसे देण्यात आली- एशयू तनावडे, मनीष शिंदे आणि मोनी गुप्ता (डावीकडून उजवीकडे)

२. वाकोला (११ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी फिलोमेना रोहित आणि मिलाग्राईन व्हिएगस यांनी वाकोला, सांताक्रुज (पूर्व) येथे त्यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सव आयोजित केला.

path
चर्चचे जवळजवळ १६ सदस्य नाताळ उत्सवासाठी एकत्र आले.

path
जे-१२ पुढारी फिलोमेना रोहित यांनी निलेश तनावडे यास बक्षीस दिले.

३. वडाला (१४ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी तुल बहादूर थापा याने वडालामधील डाऊनलाईन सदस्यांसाठी नाताळ उत्सव आयोजित केला.

उत्सवास २५ सदस्यांसाठी अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली.
गट निरीक्षक प्रवीण सालढाना याने वचन प्रचार केला.
path
विविध खेळ जसे बॉल एकमेकांकडे देत राहणे हे लेकरांसाठी आयोजित केले गेले.

path
बॉल एकमेकांकडे देण्याच्या खेळातील विजेत्या मुलास बक्षीस देण्यात आले.

४. कलीना (१५ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी, मर्लिन मेंडोन्का, डेनीस मेंडोन्का, चेलेसा मेंडोन्का, फ्रान्सिस्का रॉड्रिग्ज आणि रितेश पचेनी यांनी कलीना प्रार्थना टॉवर, सांताक्रुज (पूर्व) येथे नाताळ उत्सव आयोजित केला.

पास्टर ज्युलिएट डिसूझा यांनी संदेश दिला, नाताळ सणाचे खरे कारण प्रगट केले ज्याने लोकांच्या अंत:करणास स्पर्श केला.

path
जे-१२ पुढाऱ्यांसोबत नाताळ उत्सव
path
उत्सवासाठी चर्चचे जवळ जवळ ५० सभासद हजर होते.

path
बक्षिसे मिळाल्यावर लेकरे उत्साहित होती.

५. कांदिवली (१५ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी मधील डाऊनलाईन सभासद चेतना पुरी आणि फेमिना ब्रिट्टो यांनी नाताळ उत्सव आयोजित केला.

उत्सवास प्रार्थना व गीते गाऊन सुरुवात झाली आणि त्यानंतर देवाच्या वचनाचा प्रचार करण्यात आला.

path
निवासस्थानी उपस्थित असलेल्या १५ सभासदांसह सह्भागीता करण्यात आली.

path
उत्सवा दरम्यान अल्पोपहार देण्यात आले.

६. बदलापूर (१५ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी सोनी खैरनार हिने तिच्या निवासस्थानी, बदलापूर येथे नाताळ उत्सव आयोजित केला.

path
जे-१२ पुढारी जसविंदर सेहरा याने प्रार्थना करून सुरुवात केली.

path
यजमान घरच्या लोकांना उत्सव आयोजित करण्यासाठी बक्षीस देण्यात आले.

७. अंधेरी (पश्चिम) (१६ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी: अनिशा रॉड्रिग्ज, शेरॉन मॅककुलो, संजय मिस्त्री, एस्मेराल्ड रॉड्रिग्ज आणि रीबेका स्वामी यांनी नाताळ उत्सव आयोजित केला.

ही एक परिपूर्ण संधी होती की घनिष्ठ संबंधात यावे आणि लोकांबरोबरचे नवीन व अस्तित्वातील संबंध मजबूत करावे.

path
उत्सवात पास्टर जुलीएटा यांनी देवाच्या वचनातून संदेश दिला.

path
वृद्ध व तरुणांनी खेळामध्ये भाग घेतला.

path
जवळजवळ २५ सभासद या नाताळ उत्सवासाठी एकत्र आले होते.

८. आशीर्वादाची वृष्टि उपासना (१७ डिसेंबर २०२२)
पास्टर अनिता फर्नांडीस आणि पास्टर रवी भीमा यांनी कुर्ला प्रार्थना टॉवर बेल बजार, कुर्ला (पश्चिम) येथे नाताळ उत्सव आयोजित केला.

आरोन व अबीगईल यांनी लोकांना स्तुति व आराधनामध्ये मार्गदर्शन केले.
पास्टर रवी भीमा याने नाताळ सणाच्या महत्वावर संदेश दिला.

path
१२५ लोक उत्सवासाठी एकत्र आले होते.

path
विविध खेळ खेळण्यात आले जसे पार्सल एकमेकांकडे देणे, शहरावर बॉम्ब टाकणे आणि क्षणात बक्षिसे घेणे.

pathशहरावर बॉम्ब टाकण्यातील विजेती अनिता क्लीयेटस हिने पास्टर अनिता कडून बक्षीस घेतले.

९. अंधेरी (पूर्व) (१८ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी: पार्वती चव्हाण, पीटर धोत्रे व वर्षा न्यानिर्गुने यांनी नाताळ उत्सव आयोजित केला.

पास्टर डोलोरस टीक्सईरिया यांनी उत्सवात देवाचा संदेश दिला.
खेळ जसे हौसी, म्युसिकल चेयर्स, पिऱ्यामीड वगैर आयोजित केले होते.

path
सभासद त्यांच्या स्वतःला प्रकाश असे चित्रित करीत होते जे लपविले जाऊ शकत नाहीत.

path
म्युसिकल चेयर्समधील बक्षीस विजेता पीटर धोत्रे याने सैफ डिसोजाकडून बक्षीस स्वीकारले.

path
उत्सवासाठी अल्पोपहार व बक्षिसे आयोजित केली होती.

१०. कुर्ला (पश्चिम) (१८ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी सुंदीप सुब्रमण्यन याने आपल्या निवासस्थानी नाताळ उत्सव आयोजित केला.

गट निरीक्षक प्रवीण सालढाना याने नाताळ सणाचे महत्त्व आणि केएसएम चर्च संबंधी थोडक्यात संदेश दिला. 

path
लोकांच्या चेहऱ्यावर गौरवी आनंद होता.

path
विविध खेळ जसे बॉल एकमेकांकडे देणे, बायबल क्विझ वगैरे आयोजित केले होते.

खेळाचे विजेते: नतालिया सुब्रमण्यन व केनेथ सोआन्स

११. बांद्रा (पश्चिम) (१८ डिसेंबर २०२२)
गट निरीक्षक उमेन थॉमस आणि जे-१२ पुढारी इनास डिसुजा, बेसील करझाई, वेरोनिका विल्यम, श्वेता जाधव, सुमंगला मेत्री यांनी नाताळ उत्सव आयोजित केला.

एकंदर ७१ लोक उपस्थित होते, त्यापैकी १५ सभासद ज्यामध्ये लेकरे देखील होती ते सर्व स्थानिक निवासी होते.


path
लोकांच्या हृदयात अत्याधिक आनंद होता.

path
लेकरांनी खेळामध्ये सहभाग घेतला.

path
गट निरीक्षक उमेन थॉमस यांनी बायबल क्विझ मधील विजेत्यास बक्षीस दिले.

१२. ठाणे (पश्चिम) (१८ डिसेंबर २०२२)
गट निरीक्षक हेलेन डिसुजा आणि जे-१२ पुढारी स्टीफन पिल्लाई व एस्मेराल्डा डिसुजा यांनी नाताळ उत्सव आयोजित केला.

खाली त्या खेळांची नावे दिली आहेत जे आयोजित केले होते:
१. नंबरचा खेळ
२. म्युसिकल चेयर्स बदलण्यासह
३. खजाना शोधणे
४. साधा सायमन
५. गाणे- चार भाग घेणारे

path
जे घेऊन जाऊ शकते ती बक्षिसे कुटुंबियांना देण्यात आली.

path
ठाणे येथील लोकांबरोबर सह्भागीतेचा वेळ.

१३. वसई (पश्चिम) (१८ डिसेंबर २०२२)
गट निरीक्षक टेरेंस बेरेटो बरोबर जे-१२ पुढारी रुक्मनी वकील, मोजेस, मायकल अफोन्सो आणि श्रुतिका डिमेलो यांनी नाताळ उत्सव आयोजित केला.

वसई, मीरा रोड आणि विरार येथील विविध भागांतून ४० लोक उपस्थित उत्सवाला होते.

path
उत्सवाच्या वेळी स्तुति व आराधनासह लोक आनंद करीत होते.
path
मिचेले व मोजेस अफोन्सो यांनी फुगा खेळातील विजेत्यास बक्षीस दिले.

path
गट निरीक्षक टेरेंस बेरेटो यांनी स्पॉट प्राईज खेळातील विजेत्या कुटुंबाला बक्षीस दिले.

१४. इंग्लिश चर्च (१८ डिसेंबर २०२२)
पास्टर वायलेट लोबो व पास्टर फ्रांसिस डिसुजा यांनी कलीना प्रार्थना टॉवर, सांताक्रुज (पूर्व) येथे नाताळ उत्सव आयोजित केला.

हे मजेदार, आनंददायी, स्वादिष्ट अल्पोपहार होते आणि उत्सवाच्या ठिकाणी पुष्कळ खेळ होते.

path
एकंदर ४८ लोक एक निश्चित पोषाख लाल किंवा हिरवा घालून उत्सवास आले होते.

path
लेकरांनी नृत्यामध्ये भाग घेतला.

path
सर्व खेळातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

१५. मराठी आशीर्वाद सभा (१८ डिसेंबर २०२२)
पास्टर रोवेनो जेसिंटो व पास्टर सीसीलिया सुतारी यांनी कुर्ला प्रार्थना टॉवर, बेल बजार (कुर्ला-पश्चिम) येथे नाताळ उत्सव आयोजित केला.

उत्साहवर्धक खेळ व विविध स्पॉट बक्षिसे आयोजित केली होती.

path
जवळ जवळ ८० लोक उत्सवासाठी एकत्र आले होते.

path
लोकांनी एकमेकांचे हात धरलेले असताना पास्टर रोवेनो त्यांच्यासाठी प्रार्थना करीत होते.

path
लोकांना बॉक्समध्ये अल्पोपहार देण्यात आला.

१६. कोंकणी चर्च (१८ डिसेंबर २०२२)
पास्टर मार्टीजा डायस यांनी कुर्ला प्रार्थना टॉवर, बेल बजार (कुर्ला-पश्चिम) येथे नाताळ उत्सव आयोजित केला.

path
चर्च सभासदांसह जे-१२ पुढारी एकत्र आले होते.

path
उत्सवाच्या ठिकाणी अल्पोपहार देण्यात आला.

path

१७. विक्रोळी (पूर्व) (१९ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी हिल्डास डायस यांनी त्यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सव आयोजित केला.
जवळजवळ १२ सदस्य उत्सवासाठी आले होते.


path

path

उत्सवादरम्यान विविध खेळ जसे बॉल एकमेकांकडे देणे, गीते गाणे आयोजित केली होती.
खेळासाठी सायली सोर्डे यांनी बक्षीस मिळविले.

१८. वाशी (१९ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी काजल शहरी, करिश्मा श्रीसुंदर, नेहा देवकर, प्रिन्स मोंटेरीओ आणि गट निरीक्षक फातिमा मिस्त्री यांनी नाताळ उत्सव आयोजित केला.

केक कापला आणि अल्पोपहार लोकांना देण्यात आला. खेळ जसे म्युसिकल चेयर्स, उशी एकमेकांकडे फेकणे वगैरे खेळ खेळण्यात आले.

path
यरुशा जाधव व विपुल मान्कुरे यांनी स्तुति-गीतांमध्ये लोकांचे मार्गदर्शन केले.

path
उत्सवाच्या ठिकाणी लोक प्रभु येशूची उपासना करण्यात एकत्र आले.

path
गट निरीक्षक फातिमा मिस्त्री यांनी देवाच्या वचनातून संदेश दिला.

१९. वसई (पूर्व) (२० डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी जसविंदर सेहरा व वीना डिमेलो यांनी वसई येथे नाताळ उत्सव आयोजित केला.

वेफर्स, केक, कचोरी, चक्ली, सॉफ्ट नीर डोसा व कोल्ड-ड्रिंक्स लोकांना देण्यात आले.

path
पास्टर जेनी डिसिल्वा यांनी लोकांसाठी प्रार्थना केली.

path
उत्सवासाठी एकंदर २९ लोक एकत्र आले होते.

२०. लोअर परेल (२० डिसेंबर २०२२)
गट निरीक्षक हीरा वेस्ली बरोबर जे-१२ पुढारी गिरीराज देवा विजयश्री देवा, लेखिता देवा व रीना कोटीयान यांनी नाताळ उत्सव आयोजित केला.

खेळ जसे पार्सल एकमेकांकडे देणे व शहरावर बॉम्ब टाकणे खेळण्यात आले. उत्सवानंतर कुटुंबियांना घरी घेऊन जाता येतील अशी बक्षिसे देण्यात आली.

path
आयोजनाच्या ठिकाणी संघाने स्तुती-आराधना मध्ये मार्गदर्शन केले.

path
गट निरीक्षक हीरा वेस्ली यांनी देवाच्या वचनातून संदेश दिला.
path
उत्सवामध्ये सहभागी झालेल्या लोकांबरोबर अद्भुत वेळ होता.

२१. खारघर (२१ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी मायशामीम सोअर्स यांनी नाताळ उत्सव आयोजित केला.
उत्सव स्तुति-आराधनेसह सुरु झाला. बायबल क्विझ व भोजनासह देवाच्या वचनातून संदेश दिला गेला.

path प्रत्येक जण एक दिलाने प्रार्थना करीत होते.

path
बायबल क्विझचा विजेता.
२२. दहिसर (२१ डिसेंबर २०२२)

जे-१२ पुढारी अंजली मायती यांनी दहिसर येथे नाताळ उत्सव आयोजित केला.
स्नॅक्स जसे की वेफर्स, प्लम केक, सँडविच आणि कोल्ड्रिंक देण्यात आले. फुगा उडवणे, पार्सल पास करणे असे खेळ आयोजित करण्यात आले होते.

path
मंडळी देवाचे वचन ऐकण्यात सहभागी झाली.


path
उत्सवास हजर असलेल्या लोकांना घरी घेऊन जाता येईल अशी बक्षिसे देण्यात आली.

path
भोजनासाठी जसविंदर सेहरा यांनी प्रार्थना केली.

२३. अंधेरी (पश्चिम) (२१ डिसेंबर २०२२)
जे-१२ पुढारी अमित भोईर, कस्तुरी चोंडणकर, निनाद चेऊलकर, श्वेता चोंडणकर व पास्टर सीमा बेरेटो यांनी त्यांच्या सभासदांसाठी नाताळ उत्सव आयोजित केला.

path
पुढाऱ्यांद्वारे स्तुति-आराधना करण्याने उत्सवास सुरुवात झाली, त्यानंतर लोकांसाठी थोडक्यात संदेश देण्यात आला.
मजेदार खेळानंतर अल्पोपहार देण्यात आला.
मजेदार खेळ:

तीनमध्ये विभागलेले (गेम डान्स स्पॉट प्राइज)
खेळ:
- [x] संगीतमय हातवारे 
- [x] फुगे फोडणे
- [x] खजाना शोधणे

नृत्य
- [x] उत्तम नर्तक (लेकरे)

कथेचे बक्षीस
- [x] अगोदरचे पक्षी 
- [x] उत्तम खेळ
- [x] नवीन आलेल्या लोकांपैकी कोण अधिक लोकांना भेटले.


path
खेळाच्या विजेत्यास पास्टर सीमा यांनी बक्षीस दिले.

path
उत्सवासाठी एकंदर २९ लोक उपस्थित होते.

२४. मालाड (२१ डिसेंबर २०२२)
गट निरीक्षण आयेशा डिसुजा बरोबर जे-१२ पुढारी लोचन चव्हाण, रोझमेरी शिंगारे व ओलिंडा चोंडणकर यांनी मालाड येथे नाताळ उत्सव आयोजित केला.
वचन वाचून व थोडक्यात संदेश देऊन उत्सवास सुरुवात झाली. उत्सवासाठी एकंदर २७ सभासद हजर होते.

path
स्नॅक बॉक्सेस येथे वितरीत केले गेले ज्यात मिनी मांसाहारी बर्गर आणि फ्रूटी, चिप्स आणि केकसह मटन पफ समाविष्ट होते.

path
सुवार्ता गीतांवर लोकांनी नृत्य केले.

path
लोकांना स्वादिष्ट बिर्याणी देण्यात आली.

२५. अंधेरी (पश्चिम) (२२ डिसेंबर २०२२)
गट निरीक्षक स्वप्नील चोंडणकर बरोबर जे-१२ पुढारी विनायक देसाई, क्लिफर्ड डिसुजा, ग्लेन डिसुजा, अनुश्री नाडकर्णी आणि रोहिणी पाटील यांनी नाताळ उत्सव आयोजित केला.

वयस्करांसाठी म्युसिकल चेयर्स आणि लेकरांसाठी पार्सल पास करणे खेळ आयोजित केले होते.


path
काही सभासदांसह गट फोटो.

path
उत्सवादरम्यान नृत्याची वेळ

path
उत्सवानंतर लेकरांना भोजन देण्यात आले.

२६. सायन (२२ डिसेंबर २०२२)
लात्छिया थीरावियाराज यांच्या निवासस्थानी, सायन येथे नाताळ उत्सव आयोजित केला. गट निरीक्षक सियोना स्वामी, जे-१२ पुढारी सुशीला धोत्रे, मंजू जॉर्ज, सुंदर भगवाने, शीबा स्वामी, वर्षा कोळी आणि विभावरी साठे हे उत्सवासाठी उपस्थित होते.

path
उत्सवासाठी उपस्थित असलेले सभासद एकंदर ३८ होते.

path
गट निरीक्षक सियोना स्वामी यांनी नाताळच्या पूर्व संध्याला देवाच्या वचनातून संदेश दिला.


path
उत्सवास उपस्थित असलेल्या सभासदांना घरी घेऊन जाता येईल अशी बक्षिसे देण्यात आली.

path
उत्सवानंतर स्वादिष्ट भोजन देण्यात आले.

२७. बोरीवली (२३ डिसेंबर २०२२)

जे-१२ पुढारी- स्टीफन फुर्टाडो, राम वाधवानी, रंजिता सैलीयन यांनी स्टीफन यांच्या निवासस्थानी नाताळ उत्सव आयोजित केला.


path
जे-१२ पुढारी रंजिता सैलीयन यांनी देवाच्या वचनातून संदेश दिला.

path
मुंबईच्या विविध भागांतून २१ सभासद एकत्र आले होते.

२८. खार (२३ डिसेंबर २०२२)
गट निरीक्षक विल्सन क्रुज, जे-१२ पुढारी अमृता शिर्के, वैशाली आंगणे आणि छाया सावंत यांनी त्यांचा नाताळ उत्सव आदर्श सेवा मंडळ हॉल येथे साजरा केला.
सर्वांबरोबर स्पॉट बक्षिसे, क्विझ आणि त्यानंतर भोजन व गट फोटो.

path
गट निरीक्षक विल्सन क्रुज यांनी नाताळ उत्सवावर विशेष संदेश दिला

path
उत्सवात सहभागी झालेल्या पुरुषांचा गट फोटो.

path
उत्सवादरम्यान महिला देखील आनंदित होत्या.

path
उत्सवानंतर लोकांनी एकत्र मिळून भोजन केले.

२९. भांडूप (२४ डिसेंबर २०२२)
गट निरीक्षक दीपा दास, जे-१२ पुढारी कविता कांबळे, हेमंत कांबळे, नुरीन फ्रांसिस, सुवर्णप्रभा साठे यांनी त्यांचा नाताळ उत्सव भांडूप येथे साजरा केला.

विविध खेळ, बक्षिसे, व अल्पोपहार लोकांना देण्यात आले.

path
भांडूप येथे उत्सवासाठी एकंदर ३० लोक उपस्थित होते.

path
म्युसिकल चेयर्स खेळादरम्यान लोक आनंदात होते.

path
गट निरीक्षक दीपा दास यांनी भोजनासाठी प्रार्थना केली.

एकंदर सर्व मिळून, केएसएमचे क्षेत्रानुसार नाताळ उत्सव हे फारच यशस्वी झाले होते आणि लोकांना शहराच्या विविध भागांतून एक कुटुंब असे एकत्र केले होते. प्रत्येक व्यक्ति ज्यांनी यात सहभाग घेतला त्यांच्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो की देवाचा विशेष आशीर्वाद त्या सर्वांवर राहो.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन