जेव्हा मी दक्षिण भारत तीरुनेलवेली, तामिळनाडू येथे प्रवासाला निघालो, माझे अंत:करण उत्साह आणि अपेक्षेने भरले होते. जीजस रीडीम्स मिनिस्ट्रीचे पास्टर मोहन सी. लाजरस, या देवाच्या महान सेवकास भेटण्यास मी जात होतो. प्रवास लांब असताना सुद्धा, मला ठाऊक होते की प्रत्येक क्षण हा मोलाचा असेन.
माझ्या प्रवासाबद्दल मला तुम्हांला सांगू दया.
स्टॅन्ले स्वामीबरोबर मदुराई विमानतळावर. ते माझ्यासाठी मोठे साहाय्य होते.
आता दुपारच्या भोजनाची वेळ झाली होती, मग हैरीस रेस्टोरंट येथे आम्ही दक्षिणे भारतातील काही खास पक्वान्ने घेतली, जे मदुराई विमानतळापासून काही ८.६ किमी अंतरावर होते.
हैरीस रेस्टोरंट येथून जवळ जवळ दोन तास आणि तीस मिनिटे कारने प्रवास केल्यावर, आम्ही शेवटी तिरुनेलवेली मधील हॉटेल पालमायरा ग्रँड सूट येथील राहण्याच्या आमच्या ठिकाणी पोहचलो.
आमच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, आम्ही प्रार्थनेचे डोंगर येथे भल्या पहाटे गेलो, जे डोंगराळ भागात टेंकासी नगराजवळ, पूर्वीच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात होते. हे ते ठिकाण होते जे देवाने बंधु मोहन सी. लाजरस यास देण्याचे आश्वासन दिले होते. कारने डोंगरावर प्रवास पूर्ण केला, जे ६४ किमी अंतर पूर्ण करण्यास आम्हाला जवळजवळ दोन तास पंधरा मिनिटे लागली.
प्रार्थनेच्या डोंगराचे प्रवेशद्वार
२०१९ वर्ष हे प्रार्थना बागेला पूर्ण करण्यासह एक महत्वाचा पल्ला पूर्ण करणारे वर्ष होते. ते बनविले गेले होते की येशूबरोबर दररोज प्रार्थनेची सवय करावी आणि त्याबरोबर चालावे. ते जे देवाबरोबर चालतात, ते नेहमीच त्यांच्या गंतव्यस्थानी पोहचतात.
प्रार्थनेत चालण्याचे बागेचे प्रवेशद्वार
प्रार्थनेत चालण्याचे बागेत बंधु एस. टी. राज व स्टॅन्लेबरोबर पास्टर मायकल यांनी प्रवेश केला.
संपूर्ण बागेत, एकंदर ६० राज्ये-आणि शहरांच्या नावाचे स्तंभ बनविले गेले होते. प्रत्येक स्तंभावर चार भिन्न भाषेमध्ये चौदा प्रार्थना मुद्दे लिहिलेली होती, जे भेट देणाऱ्या व्यक्तींना भिन्न भाषेमध्ये प्रार्थनेद्वारे देवाबरोबर संबंध जोडण्याची संधी देत होते.
संपूर्ण बागेचा परिसर पूर्ण करण्यासाठी जवळजवळ ६० मिनिटे लागत होती, जे भेट देणाऱ्या व्यक्तींना पुष्कळ वेळ देत होते की प्रार्थना व मनन करण्यावर दयावे. ज्यावेळेस ते त्या मार्गावर चालतात, तेव्हा ते प्रत्येक स्तंभाकडे थांबू शकतात, आणि प्रार्थना मुद्दे वाचू शकतात आणि देवाबरोबर जुळण्याचा क्षण अनुभवू शकतात.
प्रार्थनेत चालण्याच्या बागेमध्ये पास्टर मायकल यांनी महाराष्ट्र राज्यासाठी प्रार्थना केली.
मनन करण्याच्या बागेत पास्टर मायकल यांनी मनन केले.
डोंगरावून पाणी प्राण्यांसाठी जमा होत असे जे संध्याकाळी पाणी पिण्यासाठी येत असत. आम्ही रानडुकरे पळताना देखील पाहिली.
काळजी-घेणाऱ्या पास्टर बरोबर ९० एकर जागा पाहणे
प्रवासादरम्यान, आमच्या कारचे टायर पंक्चर झाले, म्हणून आम्हांला प्रार्थना केंद्र ऑफिसकडे ट्रॅक्टरद्वारे प्रवास करावा लागला. तो एक अद्भुत अनुभव होता.
बंधु एस. टी. राज बरोबर पास्टर मायकलचा ट्रॅक्टरद्वारे प्रवास
मागे काही आश्रयस्थान होते: लोक जे उपासनेसाठी येत होते त्यांच्यासाठी प्रार्थना होत होत्या
आम्ही प्रार्थनेच्या डोंगरावरून जीजस रीडीम्स मिनिस्ट्री, नालुमावडीकडे गेलो. आम्ही ९८.८ किमी प्रवास २ तास व ३० मिनिटांमध्ये पूर्ण केले.
जीजस रीडीम्स मिनिस्ट्रीचे देवाचे निवासस्थान हे लांबून अशा प्रकारे दिसते.
जीजस रीडीम्स मिनिस्ट्रीचे प्रवेशद्वार (देवाचे निवासस्थान)
खरेच देव विश्वसनीय आहे आणि जे त्याने आश्वासन दिले, ते त्याने पूर्ण केले आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचल्यावर, पास्टर मायकल यांनी सकाळच्या परिषदेत भाग घेतला, जेथे मोजेस प्रेक्षाग्रह, जे तळमजल्यावर आहे तेथे मोहन बंधु सी. लाजरस सत्राचे मार्गदर्शन करीत होते.
मोजेस प्रेक्षाग्रह येथे जे घडत होते तेथील परिषेदेची एक झलक.
मोजेस प्रेक्षाग्रह येथे बंधु मोहन सी. लाजरस यांनी पास्टर मायकल यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांच्यावर भविष्यवाणी देखील केली.
मुख्य प्रेक्षाग्रहात उभे राहिलो जेथे प्रत्येक शनिवारी ४०, ००० पेक्षा अधिक लोक एकत्र येतात.
पास्टर मायकल, "जेव्हा मी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला देवाच्या उपस्थितीचा प्रबळ अनुभव झाला."
जीजस रीडीम्स मिनिस्ट्रीच्या आणखी काही पुढाऱ्यांसोबत पास्टर मायकल
पुढील दिवशी, पास्टर मायकल यांना त्यांची साक्ष त्या लोकांना सांगण्यासाठी आमंत्रण मिळाले जे मुख्य प्रेक्षाग्रहात उपासनेसाठी जमणार होते.
स्वर्गीय उपासना केंद्र येथे पास्टर मायकल
पास्टर मायकल यांनी मंडळीला त्यांची साक्ष सांगण्याअगोदर पवित्र उपासना केंद्र येथे प्रार्थना करीत काही वेळ घालविला.
पास्टर मायकल यांनी मंडळीला त्यांची साक्ष सांगितली
प्रेक्षाग्रहात बसलेला एका विभागातील जमाव
पास्टर मायकल यांनी त्यांची साक्ष सांगितल्यावर लोकांसाठी प्रार्थना केली. तेव्हा देवाच्या आत्म्याचे तेथे शक्तिशाली प्रगटीकरण झाले.
पुढारी जे तेथे व्यासपीठावर उपस्थित होते ते आले आणि पास्टर मायकल यांना बोलले, की त्यांची साक्ष व प्रार्थना जी त्यांनी केली होती त्याद्वारे त्यांना किती सामर्थ्यशाली स्पर्श झाला आहे.
देवाच्या निवासस्थानी पास्टर जॉन वेस्ली यांना भेटलो आणि तसेच जे पुढारी मुंबई येथून परिषदेसाठी आले होते त्यांना देखील भेटलो.
परिषदेच्या शेवटच्या दिवशी, पास्टर मायकल बंधु मोहन सी. लाजरस यांना भेटले.
थलाप्पाकट्टी हॉटेल येथे दुपारचे भोजन.
दक्षिणे भारतातील भोजन स्वादिष्ट होते.
डी'पार्क मल्टीक्युझिन रेस्टॉरंट येथील रात्रीचे भोजन छान होते. काही महत्वाच्या लोकांना भेटलो.
१ थेस्सलनीका २:८ मध्ये, प्रेषित पौलाने लिहिले, "आम्हांला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुमच्याकरता आपला जीवही देण्यास राजी होतो." हेच ते कारण आहे ज्यामुळे हे मी तुम्हांला का सांगत आहे. अशा प्रकारे मी तुम्हांला सांगावे असे तुम्हांला आवडेल काय. खालील टिप्पणीमध्ये ते मला कळवा. (मी हे इतर सामाजिक माध्यमावर सांगत नाही.)
तिरुनेलवेली येथील माझ्या समयाची आठवण, आणि मूल्यवान धडे जे मी शिकलो हे नेहमीच माझ्याबरोबर कायमचे राहील. अनेक प्रकारे मला चालना आणि प्रोत्साहन मिळाले.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या