यावर्षी जागतिक अन्न दिन हा जगभर १६ ऑक्टोबर २०२१ला साजरा केला गेला. हा दिवस केवळ आपल्याला दररोज खायला मिळणारे आश्चर्यकारक अन्न साजरे करण्यासाठीच नाही पण जे लोक एका दिवसात एक वेळचे जेवण मिळवण्यासाठी धडपडत आहेत त्यांच्याबद्दलही जनजागृती करणे आहे.
नोव्हेंबर १९७९ला हा दिवस प्रथम स्थापित केला गेला. हंगेरीचे माजी कृषी आणि अन्न मंत्री डॉ. पॉल रोमनी यांनी ही कल्पना सुचवली होती. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण जगभर १५० पेक्षा अधिक देशांमध्ये साजरा केला जात आहे.
आपल्या सर्वांसाठी एकत्र येण्याची आणि उपासमार आणि कुपोषणाविरुद्ध कार्य करण्याची ही संधी आहे. आपण कधीही अन्न वाया घालविणार नाही अशी शपथ घेऊ या.
या दिवशी, करुणा सदन येथे आम्ही रस्त्यावरील गरीब आणि गरजवंतांना अन्न वाटप केले. देवाने आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजणांसाठी केलेल्या तरतूदीबद्दल आपण त्याचे आभार मानू या.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या