शालोम
योम किप्पुर म्हणजे काय?
योम किप्पुर हा इस्राएली लोकांच्या कॅलेंडरमध्ये एक पवित्र दिवस आहे. या दिवसासाठी लेवीय १६ मध्ये पवित्र शास्त्रातील माहितीची रूपरेखा दिली आहे, जेथे प्रमुख याजक परमपवित्र स्थानात लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित्त करण्यासाठी प्रवेश करतो. एखाद्याच्या कृतीवर चिंतन करण्याचा. क्षमा मागण्याचा, आणि देव व सहकारी माणसांबरोबर योग्य ते करण्याचा हा दिवस आहे.
योम किप्पुरचे भविष्यात्मकदृष्ट्या काय महत्व आहे?
योम किप्पुरचे भविष्यात्मक महत्व आहे जे त्याच्या ऐतिहासिक पालन करण्याच्याही पलीकडे जाते. अनेक ईश्वरविज्ञानी कर्ण्याच्या सणाला (रोश होसान्ना) चर्चच्या लोकांतराचे संकेत देणारे आणि योम किप्पुर हे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचे प्रतिक असे मानतात.
या दोन घटनांमधील दहा दिवसांना “विस्मयाचे दहा दिवस” म्हणून ओळखतात, जे रूपकात्मकदृष्ट्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात वर्णन केलेल्या महासंकटाच्या काळाचे प्रतिनिधित्व करते.
जखऱ्या १२:१० हे भविष्यातील काळाचा उल्लेख करते जेथे यरुशलेम येथील लोक त्याच्याकडे पाहतील ज्यास त्यांनी भोसकले आणि एकुलत्या एका पुत्राप्रमाणे त्याच्यासाठी शोक करतील. हे एक सामुहिक अनुभूती आणि पश्चाताप दर्शवते जे योम किप्पुरच्या आत्म्यामध्ये अत्यंत आहे.
प्रायश्चित्ताचा दिवस (जो योम किप्पुर म्हणून ओळखला जातो) भविष्यात्मक अर्थाने एक कळस बिंदू म्हणून कार्य करतो जेथे मानवतेला खरा मसीहा कळतो आणि जेथे प्रायश्चित्त एक सार्वत्रिक परिणाम घेते.
त्याबद्दल आपण काय केले पाहिजे?
२०२३, यावर्षी, योम किप्पुर (प्रायश्चित्ताचा दिवस) २५ सप्टेंबरला येतो. जगभरातील लाखो यहूदी लोक उपास आणि प्रार्थना करणार आहेत. ते स्वतःला पवित्र आत्म्यासाठी असुरक्षित असे करणार आहेत- मग त्यांना माहित असो किंवा नसो.
- जेव्हा आपण यहूदी लोकांच्या तारणासाठी प्रार्थना करतो, प्रभू निश्चितच त्याचे स्मरण करेल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला देखील आशीर्वादित करेल. (उत्पत्ती १२:१-२)
- जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा तुम्ही आणि मी यशया ६२:६-७चा भविष्यासुचक आदेश की यरुशलेमेच्या भिंतीवर उभे असणारे पहारेकरी म्हणून पूर्ण करू.
- जेव्हा आपण यहूदी लोकांच्या तारणासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आमचे चर्च, नगरे आणि राष्ट्रांमध्ये चिन्हे आणि अद्भूतांचे एक मोठे संजीवन निर्माण होईल.
कृती योजना:
२४ सप्टेंबर २०२३ला, आपण इस्राएल आणि भारतासाठी प्रार्थना करणार आहोत. हे निश्चित करा की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांसोबत यात सामील व्हाल म्हणजे त्याच्या लोकांच्या प्रती तुमच्या दयाळूपणाच्या कृत्याचे देव स्मरण करेल.
या दिवशी, आम्ही ००/०० तासापासून (रात्री १२ वाजल्यापासून) ते १४.०० (दुपारी २ वाजेपर्यंत) उपास आणि प्रार्थना करणार आहोत-१४ तास. या वेळेदरम्यान केवळ पाणी पिऊ शकता (चहा आणि कॉफी नाही)
नोहा ऐपवर या महत्वाच्या कार्यक्रमासाठी तुमचे स्थान बुक करा.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या