मी तुझी उपासना करतो प्रभु येशू, तूं दाविदाचा सिंह आहे आणि दाविदाचा अंकुर आहेस. तूं सर्वावर प्रभुत्व मिळविले आहे, प्रभु येशू, मी तुझा धन्यवाद करतो आणि तुझीस्तुती करतो कारण तूं चांगला आहे आणि तुझी दया युगानुयुग कायम राहते.
पण वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.” ( प्रकटीकरण 5:5)