पवित्र शास्त्रात अनेक वेळेला पवित्र आत्म्याला कबुतर समान ओळखले गेले आहे. (लक्षात घ्या, मी म्हटले आहे त्यासमान).
ह्यासाठी कारण हे की कबुतर हा अतिशय संवेदनशील पक्षी आहे. जर आपल्याला पवित्र आत्म्यासह घनिष्ठ संबंधात चालावयाचे आहे, तर आपल्याला त्याच्या संवेदनशील स्वभावाला समजण्याची गरज आहे.
मगती(दलीला) शमशोन ला म्हणाली, "पलीष्टी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे, ह्याची त्याला कल्पना नव्हती." (शास्ते १६: २०)
पवित्र शास्त्रातील हासर्वात दु:खदायी भाग आहे जेथे एका व्यक्तीला इतक्या सामर्थ्याने देवाने उपयोगात आणलेले आहे त्याने देवाच्या उपस्थितीला ग्राह्य मानले होते आणि परमेश्वराला काय प्रसन्न करते आणि काय नाही याचा कधी विचार केला नाही. शमशोन ची सर्वात मोठी चूक ही, त्याने पवित्र आत्म्याच्या संवेदनशीलतेच्या स्वभावालासमजण्याचा कधीही विचार केला नाही. येशूच्या नांवात, मी भविष्यवाणी करतो की आपलाहा कधीही भाग असणार नाही.
तुम्हालामाहीत आहे काय पवित्र आत्म्याला सुद्धा खोटे बोलले जाऊ शकते?
बायबल नोंद ठेवते की हनन्या आणि सप्पीरा ने पवित्र आत्म्याशी खोटे बोलले.
तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तूं पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे. (प्रेषित ५: ३)
तुम्ही केवळ व्यक्तीला खोटे बोलू शकता कोणत्या शक्तीला नाही हनन्या आणि सप्पीराचे प्रकरण दु:खद वास्तविकतेला स्पष्ट करते कीख्रिस्ती लोकांना सुद्धा निडर आणि घोर पापात नेऊ शकतात. हा तो सैतान होता ज्याने त्यांची हृदये भरली होती की अशा प्रकारे खोटे बोलावे (प्रेषित ५:३) आणि"देवाच्या आत्म्याची परीक्षा घ्यावी." (वचन ९)
पवित्र आत्म्याचा प्रतिकार सुद्धा केला जाऊ शकतो
स्तेफन ने सन्हेद्रीन ला म्हटले की ते त्याचा प्रतिकार करून पवित्र आत्म्याची अवज्ञा करीत आहेत:
"अहो 'ताठ मानेच्या' आणि'हृदयाची' व कानाची सुंता न झालेल्या लोकानो,' तुम्ही तर 'पवित्र आत्म्याला' सर्वदा'विरोध करिता;' जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही." (प्रेषित ७:५१)
पवित्र आत्म्याची निंदा केली जाऊ शकते
येशूने शिकविले की पवित्र आत्म्याची निंदा केली जाऊ शकते:
ह्यास्तव मी तुम्हांस सांगतो की, प्रत्येक पाप व दुर्भाषण (प्रत्येकदुष्टता, वाईट बोलणे, घातक बोलणे किंवा पवित्र गोष्टींविरुद्ध असभ्यता)ह्यांची माणसांना क्षमाहोईल, परंतुपवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही;
मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोण काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही. (मत्तय १२: ३१-३२)
पवित्र आत्मा हा नेहमीच तुमच्या बाजूला आहे, परंतु तो त्याच्या संवेदनशील आणि सभ्य स्वभावामुळेकधीही तुमच्यावर स्वतःची जबरदस्ती करणार नाही. तुम्ही जे सर्व काही करता त्यामध्ये त्यास आमंत्रित केले पाहिजे. त्यास केवळ त्याचेच कार्य करण्यासाठी मोकळीक असली पाहिजे.
अनेक वर्षांपूर्वी, हेन्री फोर्ड, फोर्ड मोटर कंपनीचा एक प्रसिद्ध संस्थापक तो एका राष्ट्रीय महामार्गावरून वाहन चालवीत जातहोता. त्याच्या लक्षात आले कीएककार ही रस्त्यावरून बाजूला गेली आहे आणि त्याचा ड्रायवर त्यास दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. हेन्री फोर्ड ने त्याच्या कार ला थांबविले, आणि त्या ड्रायवरला विचारले की तो त्याची काही मदत करू शकतो काय. ड्रायवर ने रागात म्हटले, "वृद्ध मनुष्या, येथे असे काहीही नाही की जे तू करू शकतो आणिजे मी करू शकत नाही. तूं तुझ्या मार्गाने जा; मी स्वतः हे पाहून घेईन."
ताबडतोब, हेन्री फोर्ड त्याच्या कार कडे गेले आणि निघून गेले.
त्या कार ड्रायवरने फार थोडया वेळाने हे जाणले की त्याच्या कार ला दुरुस्त करण्याची गरज होती जेव्हा त्याने त्या कार च्या निर्मात्याला घालवून दिले होते! निश्चितच, निर्माता ते दुरुस्त करू शकत होता.
अनेक संध्या ह्या गमाविल्या जातात कारण ख्रिस्ती म्हणून आपण हे ओळखत नाही की पवित्रआत्मा हा आपल्याला काही निश्चित गोष्टी करण्यास सांगत आहे. सरळ शब्दात म्हटले तर, आपण त्याची वाणी आणि उपस्थिती विषयी पुरेसे संवेदनशील नाहीत.
Bible Reading: Ecclesiastes 11-12 ; Song of Solomon 1-4
Confession
पित्या परमेश्वरा, असे होवो की आज एक नवीन अग्नि माझ्यावर उतरो, येशूच्या नांवात. माझा प्रभु आणि माझा परमेश्वर, पवित्र आत्म्याने मला बाप्तिस्मा दे, येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel

Most Read
● येशूचे नांव● परमेश्वराकडून सल्ल्याची गरज
● सापांना रोखणे
● येशू खरेच तरवार आणण्यासाठी आला होता काय?
● दिवस १६ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● येशू द्राक्षारस (आंब) प्याला
● गौरव आणि सामर्थ्याची भाषा-जीभ
Comments