जग म्हणते, "हताश वेळी साहसीकार्य करावे लागतात." देवाच्या राज्यात, तथापि, हताश समय अत्यंत साहसी कार्य करावयास लावते. तुम्ही कदाचित विचाराल, "अत्यंत साहसी कार्य म्हणजे काय?"
यशया ५९: १९ आपल्याला सांगते की,
जेव्हा शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याजविरुद्ध झेंडा उभारील.
परमेश्वराचा आत्मा नेहमीच सर्वांपेक्षा अधिक उंच प्रमाण स्थितकरते जे शत्रू करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या हताश अवस्थेसाठी पवित्र शास्त्रातून उपाय हे 'भविष्यात्मक गीत' आहे. पवित्र शास्त्रात भविष्यात्मक गीत हे नेहमीच एक नवीन वाट साठी साधन आहे.
यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्माविले. (२ इतिहास २०: ३)
२ इतिहास २० आपल्याला सांगते की एके दिवशी, राजा यहोशाफाट ने बातमी ऐकली की एक 'मोठे सैन्य' त्याच्या राज्याच्या विरोधात येत आहे. त्याच्या प्रत्युत्तरात, तो परमेश्वराचा धावा करू लागला. आता तुम्हाला परमेश्वराचा धावा करणे आणि केवळ प्रार्थना करणे यातील फरक समजला पाहिजे.
मला ते स्पष्ट करू दया: जेव्हा तुम्ही परमेश्वराचा धावा करता, तुम्ही प्रार्थना करीत आहात. तथापि, जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत आहात, तुम्ही परमेश्वराचा धावा करत असाल किंवा नाही. हे कदाचित सर्व काही तुमच्या गरजा, तुमच्या जीवना, वगैरे विषयी असेल. मला आशा आहे की जे मी म्हणत आहे ते तुम्ही समजत आहात.
जेव्हा आपण परमेश्वराचा धावा करतो, ते सर्व केवळ त्याच्याविषयी असते-त्याची उपस्थिती, त्याचे वचन. आपली मने ही पूर्णपणे त्यावर केंद्रित असतात. आपल्या गरजा ह्या नंतर येतात. कधीकधी प्रार्थने मध्ये, त्याच्या ऐवजी हे केवळ स्वतः विषयीच असते.
लोक परमेश्वराचा धावा करण्याच्या प्रत्युत्तरात, ते भविष्यात्मक वचन प्राप्त करतात: "युद्ध हे तुमचे नाही, परंतु परमेश्वराचे आहे." भविष्यात्मक वचन हे नेहमीच अगोदर येते जेव्हा तुम्ही त्याचा धावा करीत आहात. भविष्यवाणी ही परमेश्वर आपल्या परिस्थिती मध्ये बोलत आहे हे आहे.
अनेकांनी ह्या वचनाने टोकाची भूमिका घेतली आहे, "युद्ध हे तुमचे नाही परंतु परमेश्वराचे आहे याचा अर्थ हा नाही की तुम्ही कोठेतरी लपावे. तुम्हाला युद्धाला तोंड दयावे लागेल परंतु चांगली सुवार्ता ही आहे की तुम्हाला लढावे लागणार नाही.
दाविदाला गल्याथ ला तोंड दयावे लागले परंतु परमेश्वराने लढाई केली.
ज्या काही अडथळ्यांचा सामना आज तुम्ही करीत आहात, परमेश्वराचा धावा करण्याससुरुवात करा. तुम्हीज्या परिस्थितीचा सामना करीत आहात त्याविषयी परमेश्वर त्यामध्ये त्याचे मन बोलेल. आता तुम्हाला ठाऊक आहे की त्याचे विचार हे त्याच्याविषयी आहे, पुढे जा आणि त्याचा सामना करा. विजय हा तुमचा आहे. तुम्ही विजया पेक्षा अधिक आहात.
Prayer
मी पूर्णपणे आत्मविश्वासी आहे की परमेश्वर ज्याने मजमध्ये चांगले कार्य आरंभ केले आहे ते तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्ण करेल. जेव्हा मी अन्य भाषे मध्ये प्रार्थना करतो, मी त्या परमेश्वराची थोरवी गातो जो महान व स्तुतीस पात्र आहे.
Join our WhatsApp Channel

Most Read
● स्तुति ही जेथे परमेश्वर वास करतो● विश्वासाची शाळा
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● ओरडण्यापेक्षा दयेसाठी रडणे
● वचनामध्ये ज्ञान
● हुशारीने कार्य करा
● ४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
Comments