कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते; आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळविणारा कोण आहे? (१ योहान ५: ४-५)
प्रकटीकरण अध्याय २ आणि ३ मध्ये परमेश्वर सात चर्च ला बोध करतो. प्रत्येक चर्च सोबत, तेथे जो विजय मिळवेल त्याच्यासाठी आश्वासन आहे. तुमच्याबरोबर मला खूपच प्रमाणिक होऊ दया, अनेक वेळेला, मी ह्या आश्वासना द्वारे धमकी मध्ये आलो आहे कारण मला वाटले की ते त्यांच्या स्वाभाविकतेमध्ये काहीतरी शर्तीवर आहे.
त्याकडे पाहा:
जो विजय मिळवितो त्याला, देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी 'खावयास' देईन. (प्रकटीकरण २: ७)
जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही.(प्रकटीकरण २: ११)
जो विजय मिळवितो त्याला गुप्त 'राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खड्यावर 'नवे नांव' लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही.(प्रकटीकरण २:१७)
जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो 'त्याला' माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा 'राष्ट्रांवरचा' अधिकार मी 'देईन.' (प्रकटीकरण २: २६)
जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल; मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नांव खोडणारच नाही.(प्रकटीकरण३: ५)
जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. (प्रकटीकरण३: १२)
जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसू देईन.(प्रकटीकरण३: २१)
तथापि, जेव्हा मी १ योहान ५: ४-५ वाचले, त्यानेमाझ्या जिवाला मुक्ती आणली. मी हे जाणले की पात्र ठरणारा हा जय मिळविणारा असे नोंदले आहे हे सरळपणे आपला विश्वास जोयेशू ख्रिस्ताच्या पूर्ण केलेल्या कार्यावर विश्वास ठेवणे असे आहे. येशूने वधस्तंभावर आपल्या सर्वांसाठी जे काही केले त्यात तुम्ही आणि मी काहीही जोडू किंवा त्यातून काढू शकत नाही.
जय मिळविणे हा सामर्थ्यशाली शब्द आहे, आणि देवाची लेकरे म्हणून, आपल्याला जय मिळविणारे म्हणून बोलाविले आहे. येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थानाने आपल्याला सामर्थ्य दिले आहे की ह्या जगात जय मिळविलेले असेराहावे.
Bible Reading: Isaiah 19-23
Confession
पित्या, येशूच्या नांवात, प्रत्येकप्रसंग आणि परिस्थितीजिचा मी सामना करीत आहे त्यावर मी विजय घोषित करीत आहे जो येशूने माझ्यासाठी विकत घेतला आहे.
Join our WhatsApp Channel

Most Read
● जर ते तुमच्यासाठी महत्वाचे असेल, तर ते देवासाठीही महत्वाचे आहे● पवित्र आत्म्या विरुद्ध निंदा म्हणजे काय आहे?
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● जीवनाचे मोठे खडक ओळखणे आणि प्राथमिकता देणे
● विश्वासाची शाळा
● स्वर्गाचे आश्वासन
● गमाविलेले रहस्य
Comments