देशांत दुष्काळ कडक होता. त्यांनी मिसराहून आणिलेलेधान्य खाऊन संपविले तेव्हा त्यांचा बाप त्यांस म्हणाला, पुनः जाऊन आपल्यासाठी थोडी अन्नसामग्री खरेदी करा. तेव्हा यहूदा त्यास म्हणाला, त्या मनुष्याने आम्हांस अगदी निक्षून सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही आपल्याबरोबर आणिले नाही तर माझे तोंड तुम्हांला पाहता येणार नाही. (उत्पत्ति ४३: १-३)
दुष्काळ कडक होता.अन्नसामग्री जी याकोबाच्या पुत्रांनीमिसराहून पहिल्या खेपेला आणिली होती ती सर्व संपून गेली होती. ते आता भूकमरीने मरण्याच्या संकटात होते. याकोब त्यांचा पिता आता त्यांना जोर देऊन सांगत आहे की त्यांनी पुनः एकदा मिसरला जावे म्हणजे त्यांस अन्न मिळेल.
लक्षात घ्या, सर्व जण शांत आहेत, परंतु यहूदा त्यांचा पिता याकोबाला सर्व काही सांगत आहे.
हे आपल्याला सांगते की....
• एक मध्यस्थी करणारा तो आहे जो पित्याकडे त्याचे अंत:करण मोकळे करतो
• मध्यस्थी करणारा हा आहे जो पित्याला ती परिस्थिती स्पष्टपणे सांगत आहे.
यहूदा आपला बाप इस्राएल यांस म्हणाला, मुलास मजबरोबर पाठवा, म्हणजे आम्ही मार्गस्थ होऊ; अशाने आम्ही, तुम्ही आणि आमची मुलेबाळे वाचतील, मरणार नाहीत. मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो. मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेन. आम्ही विलंब केला नसता तर आता आमची दुसरी खेप झाली असती. (उत्पत्ति ४३: ८-१०)
यहूदा चे शब्द लक्षात घ्या, "मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो. मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेन." इतर कोणतेही भाऊ बोलत नाहीत. हे असे काही की काय घडेल याबाबत त्यांना काही काळजी नाही. परंतु येथे यहूदा आहे जो त्यासर्वांच्या वतीने खिंडीतउभे राहण्यास तयार आहे.
हे पुन्हा मला सांगते...
एक मध्यस्थी करणारा व्यक्ति तो आहे जो खिंडीत उभे राहण्यास तयार आहे.
यहूदाच्या मध्यस्थीने केवळ त्याच्या जवळच्या कुटुंबियांचाचबचाव केला नाही तर संपूर्ण वंशाला दुष्काळ आणि अटळ मरण यापासून वाचविले. त्याप्रमाणे, तुमची मध्यस्थी केवळ तुमच्या कुटुंबियांनाच केवळ वाचविणार नाही परंतु ते ख्रिस्ताच्या शरीराला सुद्धा पुनर्जीवित करेल.
येथे अशा दोन प्रकारच्या लोकांसाठी परमेश्वर शोध घेत आहे
१. उपासक
योहान ४: २३-२४ आपल्याला सांगते की, परमेश्वर स्वतः खऱ्या उपासकांना शोधत आहे.
२. मध्यस्थी करणारा
परमेश्वर स्वतः घोषित करतो, "मी भूमीचा नाश करू ने म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील कोणी मजसमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पहिली, पण मला कोणी आढळला नाही." (यहेज्केल २२: ३०)
परमेश्वर अजूनसुद्धा त्यास शोधत आहे जो कोणी खिंडीत उभा राहील. जर परमेश्वर मध्यस्थी करणारा शोधत आहे, परमेश्वराजवळ एक व्यक्ति असेल ज्याच्याबरोबर तो सहकारी होईल.
सत्य हे आहे-तुम्ही दोन्ही होऊ शकता-उपासक आणि मध्यस्थी करणारे. अब्राहाम हा उपासक आणि मध्यस्थी करणारा होता, दावीद हा उपासक आणि मध्यस्थी करणारा होता.
Bible Reading: Jeremiah 5-6
Prayer
१. पित्या, येशूच्या नांवात, प्रत्येकव्यक्ति जो करुणा सदन सेवाकार्याशी जुडलेला आहे त्यास ह्या वर्षी त्यांच्या आध्यात्मिक जीवनात अद्भुते घडण्यासाठी उत्कृष्ठतेच्या आत्म्याने समर्थ कर.
२. पित्या, येशूच्या नांवात, करुणा सदन सेवाकार्यामध्ये जे आजारी आहेत आणि दु:खी आहेतत्या प्रत्येकाला स्वस्थ कर, आणि त्यास पूर्ण स्वास्थ्यात पुनर्स्थापित कर.
३. पित्या, येशूच्या नांवात,करुणा सदन सेवाकार्याशी जुडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सैतानाच्या अत्याचारातून सोडीव आणि ह्याचक्षणी त्यांची मुक्तता कर.
Join our WhatsApp Channel

Most Read
● आत्मे जिंकणे-ते किती महत्वाचे आहे?● प्रीतीची भाषा
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-१
● तुम्ही मत्सरास कसे हाताळाल
● अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत
Comments