Daily Manna
18
15
260
देवाचे ७ आत्मे: उपदेशाचाआत्मा
Thursday, 21st of August 2025
Categories :
आत्म्याची नावे आणि शीर्षके
देवाचे ७ आत्मे
नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगीया व गलतिया ह्या प्रांतांमधून गेले; आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. (प्रेषित १६: ६-७)
लक्षात घ्या ते असे म्हणते की त्यांना पवित्र आत्म्या द्वारे प्रतिबंध केला गेला. पौल आणि त्याच्याबरोबरच्या लोकांना आशिया मध्ये जाऊन प्रचार करावा असे पाहिजे होते, परंतु पवित्र आत्म्याने त्यांना प्रतिबंध केला. हा उपदेशाचा आत्मा होता.
इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्यांच्यापुढे कैसरीयांतून माझ्याकडे पाठविलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की, काही संशय न धरिता त्यांच्याबरोबर जा. (प्रेषित ११:११-१२)
येथे प्रेषित पेत्र आठवण करतो की पवित्र आत्म्याने त्यास कसे उपदेश केला जेव्हा तो कातडे कमाविणाऱ्या शिमोनाच्या घरात प्रार्थना करीत होता तेव्हा त्यास सांगितले की कर्नेल्य च्या घरी जा.
स्तोत्र १६:७ मध्ये दाविदाचे शब्द स्मरण करा: "परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करितो; माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते."
उपदेशाचा आत्मा तुम्हाला सांगतो की काय करावे आणि काय करू नये. तो सर्व बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन देतो. तुम्ही कदाचित चुकीच्या दिशेमध्ये गेला असाल, परंतु जेव्हा उपदेशाचा आत्मा तुम्हाला उपदेश देतो, "तुम्ही तुमच्या मागे एक वाणी ऐकाल असे म्हणताना, "नाही, हा मार्ग आहे, येथून चाल." (यशया ३०:२१)
कारण आम्हांसाठी बाळ जन्मला आहे, आम्हांस पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील; त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. (यशया ९:६)
बायबल च्या ह्या भागाच्या मूळ इब्री भाषांतर असे म्हणत नाही, "अद्भुत, मंत्री," असे दोन नावे म्हणत नाही, जसे येथे किंग जेम्स भाषांतरात दिले आहे. हे प्रत्यक्षात एक जोडनाव असे वाचतात:
"अद्भुत मंत्री."तुम्ही हे पाहाल की, इतर नांवे,समर्थ देव, सनातन पिता, आणि शांतीचा अधिपती ज्याबरोबर संदेष्टा प्रभु चे वर्णन करतो, ते सुद्धा दोनअर्थी आहेत.
नाव, "अद्भुत मंत्री" याचा अर्थ "असामान्य योजना आखणारा". उपदेशाचा आत्मा हा असामान्य योजना आखणारा आहे. तो गोंधळला जाऊ शकत नाही. प्रत्येक संकट ज्याचा तुम्ही सामना करता त्यातून बाहेर पडण्याचा त्यास मार्ग ठाऊक आहे. त्यास ठाऊक आहे की तुम्ही अंधकारातून कसे बाहेर येऊ शकता;
त्यास ठाऊक आहे की तुम्हाला कसे यशस्वी करावे. तो तुमचा असामान्य योजना आखणारा आहे आणि तो तुमच्यात राहतो.
Bible Reading: Jeremiah 30-31
Prayer
धन्य पवित्र आत्म्या, तूं माझा अद्भुत उपदेशक आहेस, तूं माझा असामान्य योजना आखणारा आहे. माझ्या सर्व योजना स्थापित होतील कारण मला तुझा दैवी उपदेश आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● साधारण पात्रा द्वारे महान कार्य● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● दिवस २८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● तयारी नसलेल्या जगात तयारी
● एस्तेरचे रहस्य काय होते?
● प्रेमाद्वारे प्रेरित व्हा
● उत्तमतेच्या मागे लागणे
Comments