Daily Manna
18
14
163
मध्यस्थी करणाऱ्यांसाठी एक भविष्यात्मक संदेश
Sunday, 7th of September 2025
Categories :
मध्यस्थी
आज सकाळी, पवित्र आत्मा फारच सामर्थ्याने मजबरोबर बोलला आणि माझ्यावर छाप पाडली की मध्यस्थी करणाऱ्यांना प्रोत्साहन दयावे.
प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुति करीत जागृत राहा. (कलस्सै ४:२)
१. सतत
तुम्ही कधी तुमच्या जीवनात त्या प्रसंगामधून गेला आहात काय जेव्हा ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करीत होता ते सोडून दयावे कारण उत्तर मिळण्यास फार उशीर लागत होता?
मध्यस्थी करणारे असणे हे धन्यवाद न मिळण्याचे काम आहे असे वाटते. स्तुतिआराधना घेणारा लीडर किंवा प्रचारक शिवाय फार क्वचित की कोणी तुमच्याकडे लक्ष देतात. आणि तरीही, मध्यस्थी करणारे हे देवाच्या अंत:करणा जवळ आहेत. अशी वेळ येते जेव्हा मध्यस्थी करणारे त्या समयामधून जात असतात जेव्हा त्यांस मध्यस्थी करणे सोडून दयावे असा मोह होतो आणि चांगल्या कार्यासाठी पुढे जावे असे वाटते.
सैतानाचे एक सर्वात मोठे खोटेपण हेकी तुमची मध्यस्थी ही काही फळ निर्माण करीत नाही; ती प्रभाव करीत नाही. परंतु सत्य हे अगदी त्याउलट आहे.
पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो, "सुरु ठेवा, आणि मध्यस्थी करणे सोडू नका. आत्म्याच्या स्तरात तुम्ही एक प्रभावकारी छाप पाडीत आहात." जर तुम्ही थांबलात, तर प्रकरण आणखी वाईट होईल, आणि हाताबाहेर जाऊ शकते.
२. प्रार्थनेत तत्पर राहा.
मध्यस्थी करणारा हा पवित्र शास्त्रात भिंतीवरीलपहारेकरी समान पाहिला जातो (यशया ६२:६ वाचा.). जर पहारेकरी झोपत आहे, तर तो पाहू किंवा ऐकू शकत नाही म्हणून तो ज्यांच्यासाठी पहारा देत आहे त्यांना इशारा देऊ शकत नाही.
एक जागृत मध्यस्थी करणारा हा देवासाठी महत्वाचा आहे.
३. एक जागृत मध्यस्थी करणारा
केवळ मध्यस्थी करण्याच्या वेळेला प्रार्थना करीत नाही परंतु दिवसाच्या सुरुवातीलाच व्यक्तिगत प्रार्थने द्वारे त्याने त्याचे आध्यात्मिक स्नायू अगोदरच बळकट केलेले आहेत. अशामध्यस्थी करणाऱ्याकडे सामर्थ्य आहे की प्रार्थनेच्या भविष्यात्मक परिमाण मध्ये प्रवेश करावा जेथे तो किंवा ती पाहू व ऐकू शकते की परमेश्वर काय बोलत आणि करीत आहे.
४. धन्यवाद
मध्यस्थी करणाऱ्या साठी धन्यवाद हे फार महत्वाचे आहे कारण ते केवळ परमेश्वराच्या अंत:करणाला स्पर्श करीत नाही परंतु ते मध्यस्थी करणाऱ्याच्या अंत:करणावरसुद्धा प्रभाव पाडते जो धन्यवाद देतो. धन्यवादमध्यस्थी करणाऱ्यास गर्वा पासून राखते आणि गौरव परमेश्वराला देते.
आत्म्याच्या वतीने मी तुम्हाला विनंती करीत आहे की तुमच्या स्वतःला मध्यस्थी करण्यास समर्पित करा. नोहाअॅप द्वारे मध्यस्थी करण्यास जुळा. त्या लोकांनी ज्यांनी त्यांचे पाय मध्यस्थीच्या पाण्यात भिजविलेले नाहीत, कृपा करून तसे करा, कारण ह्या वेळी ख्रिस्ताच्या शरीरालातुमची गरज आहे. आत्म्याच्या बोलाविण्यास तुम्ही ऐकाल काय?
Bible Reading: Ezekiel 19-20
Prayer
मी येथे आहे परमेश्वरा. तुझ्या गौरवाकरिता माझा उपयोग कर. प्रार्थना करण्यास मला शिकीव.
Join our WhatsApp Channel

Most Read
● दिवस १३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● देव महान द्वार उघडतो
● दिवस ३८ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● एस्तेरचे रहस्य काय होते?
● पेंटेकॉस्ट साठी वाट पाहणे
● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● विसरण्याचा धोका
Comments