तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ति देताना त्याने पाहिला. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता. (लूक २२:४३-४४)
तोस्त्री ला म्हणाला, "मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणीत करीन; .......तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे; तूं आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. (उत्पत्ति ३: १६-१७)
येशू जेव्हा गेथसेमाने बागेत होता, त्याने रक्त सांडले. वैद्यकीय शास्त्र याची पुष्टी करते की जेव्हा व्यक्तितीव्र यातनेत असतो, रक्तवाहिन्या फुटतात आणि रंध्रामधून रक्त बाहेर पडते. तेच काय ते प्रत्यक्षात येशूला गेथसेमाने बागेत झाले.
जर तुम्ही संकटातून जात आहात, कदाचित तुम्ही तुमची इच्छाशक्ती गमाविली असेल. काहीही प्रकरण असो, तुम्हीहे म्हणत ते पुन्हा प्राप्त करू शकता, "परमेश्वरा, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. माझ्या जीवनात ये. तुझी इच्छा पूर्ण करण्यास मला समर्थ कर."
येशूने पित्याकडे तीन वेळा प्रार्थना केली की हा संकटाचा प्याला काढून टाकावा. परंतु नंतर त्याने म्हटले, "तरी माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होवो." इच्छाशक्ती जी तुम्ही गमाविली आहे, ती येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त केली जाऊ शकते.
यशया ५०:६ म्हणते, "मी मारणाऱ्यापुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यापुढे मी आपले गळ केले; उपमर्द व छिथू यांपासूनमी आपले तोंड चुकविले नाही." आदर व कृपे विषयी चेहरा बोलतो. येशूनेत्याचे रक्त त्याच्या चेहऱ्यावरून वाहिलेजेणेकरून येशू द्वारे आपण आदर व ओळख प्राप्त करावी. त्याचा चेहरा विद्रूप केला गेला जेणेकरून तुमचा चेहरा स्वीकारला जावा.आज धैर्याने परमेश्वरासमोर या, जेणेकरून तो तुम्हाला पुनर्स्थापित करो. तो तुमची सर्व भग्नता व्यवस्थित करेन व तुम्हांला परिपूर्ण करेन.
Bible Reading: Amos 8-9; Obadiah; Jonah 1
Confession
स्वर्गातील पित्या, मला आशीर्वादित केल्याबद्दल मी तुझा धन्यवाद करतो. तुझा पुत्र, येशू ख्रिस्ताला ह्या जगात माझ्या ऐवजी बलिदान होण्यासाठी पाठविल्याबद्दल तुझा धन्यवाद. ख्रिस्ताने जो आशीर्वाद माझ्यासाठी ठेवला आहे तो मी प्राप्त करतो. मी तो आदर व ओळख प्राप्त करतो जे तुझ्यापासून येते आणि तुला सर्व गौरव देतो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ११:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● स्तुति वृद्धि करते
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-२
● जेव्हा तुम्ही युद्धात आहात: समज
● चालढकल करण्याच्या बलाढ्यला मारणे
● परमेश्वर तुमच्या शरीरा विषयी काळजी करतो काय
● यासाठी तयार राहा!
Comments
