आज सुद्धा, येथे अनेक ख्रिस्ती लोक आहेत जेऔषधोपचार घेणे हे देवामध्ये विश्वासाचा अभाव दर्शविणे आहे असा विश्वास ठेवतात.हे तुम्हाला धक्कादायक असे वाटेल परंतु एका चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा हे काही ख्रिस्ती गटात विश्वासाची कमी असे समजले जाते.
याउलट,शारीरिक इलाज व वैद्यकीय उपचार हे बायबल मध्ये अनेक वेळा उल्लेखले गेले आहे. येथे अनेक वचने आहेत जे "वैद्यकीय उपचार" घेण्याबद्दल बोलतात, जसेपट्ट्या बांधणे (यशया १:६), तेल(याकोब ५:१४), तेल व द्राक्षारस (लूक १०:३४), पाने(यहेज्केल ४७:१२), द्राक्षारस (१ तीमथ्यी ५:२३), आणि विशेषतः "गिलादाचे मलम"(यिर्मया ८:२२). तसेच, लूक, जो प्रेषितांची कृत्ये व लूकाचे शुभवर्तमान चा लेखक यास पौल द्वारे संबोधले आहे "प्रिय वैद्य" (कलस्सै ४:१४).
टीप: कृपाकरूनवरील सर्व वचने वाचा.
एकच वचन जे त्याच्या संदर्भाबाहेर घेऊन शिकविले जाऊ शकते की कोणी डॉक्टर कडे जाऊ नये ते २ इतिहास १६:१२ असू शकते. "आसाच्या पायास त्याच्या कारकीर्दीच्या एकूणचाळीसाव्या वर्षी व्याधी झाला; तो व्याधी बराच वाढला; तथापि त्या रोगात तो परमेश्वरास शरण न जाता वैद्यास शरण गेला." विषय हा नाही की आसा ने वैद्यांचा सल्ला घेतला नाही परंतु हा की"तो परमेश्वरास शरण गेला नाही". जरी जेव्हा आपण डॉक्टर कडे जातो, आपला अंतिम विश्वास हा देवा मध्ये असला पाहिजे, डॉक्टर मध्ये नाही.
डॉक्टर हे आपल्यासाठी देवाचे बक्षीस असे आहे, एक माध्यम ज्याद्वारे परमेश्वर स्वस्थता व स्वास्थ्य आणतो. त्याचवेळेला, आपला अंतिम विश्वास व भरवसा हा देवा मध्ये असला पाहिजे, डॉक्टर किंवा औषध मध्ये नाही.
जसे एका डॉक्टर ने समजदारीने म्हटले आहे, "डॉक्टर हे कापू व शिवू शकतात परंतु हा तो परमेश्वर आहे जो बरे करतो." मी पूर्णपणे सहमत आहे.
Prayer
प्रभु येशू, तूं द्राक्षावेल आहे व मी शाखा आहे. मी प्रत्येक चांगले फळ व पवित्र आत्म्याचे दान तुझ्यापासून प्राप्त करतो.(योहान १५:५)
जिवंत देवाच्या पवित्र आत्म्या, येशूच्या नांवात सामर्थ्यात मजवर स्थिर हो. (यशया ११:२)
जिवंत देवाच्या पवित्र आत्म्या, येशूच्या नांवात सामर्थ्यात मजवर स्थिर हो. (यशया ११:२)
Most Read
● येशू स्वर्गात काय करीत आहे● यहूदाच्या पतनापासून ३ शिकवणी
● तुमचे खरे मूल्य शोधा
● तुमचा विश्वासघात झाला असे अनुभविलेआहे काय?
● तुमच्या अंत:करणाचे रक्षण कसे करावे
● देवाचे ७ आत्मे: उपदेशाचाआत्मा
● कर्जामधून बाहेर या: किल्ली#२
Comments