हिंदी मराठी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us Contact us Listen on Spotify Listen on Spotify Download on the App StoreDownload iOS App Get it on Google Play Download Android App
 
Login
Online Giving
Login
  • Home
  • Events
  • Live
  • TV
  • NoahTube
  • Praises
  • News
  • Manna
  • Prayers
  • Confessions
  • Dreams
  • E-Books
  • Commentary
  • Obituaries
  • Oasis
  1. Home
  2. Daily Manna
  3. अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत
Daily Manna

अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत

Monday, 18th of September 2023
21 12 1077
आपण सर्वांनी ही म्हण ऐकली असेन, “”अडथळे हे यशस्वी होण्यासाठी स्थिति आहे”. परंतु जेव्हा आपण संकटात अडकतो तेव्हा त्याची सुखद बाजू पाहणे कठीण असते. आज मी तुमच्या जीवनावर भविष्य करतो की तुमचा अडथळा हा तुमचा पराभव नसेल परंतु त्याऐवजी दैवी वळण जे तुम्हांला काहीतरी मोठे करण्यासाठी स्थिर करेल.

अडथळ्यांचे स्वरूप समजून घेणे
जीवनात, अडथळे हे विविध स्वरुप व प्रकरात येऊ शकतात –नोकरी गमावणे, तुटलेले नातेसंबंध, आणि अयशस्वी प्रकल्प. तत्काळ नंतरचे परिणाम अनेकदा आपल्याला विचलित करून टाकतात, आपल्या योग्यतेवर आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. तरीही, बायबल रोम. ८:२८ मध्ये काय सांगते त्याची आठवण केली पाहिजे, “ परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.”

प्रेषित पौलसाठी अडथळे हे नवखे नव्हते. तुरुंगात टाकण्यापासून ते तारू तुटण्यापर्यंत, त्याने असंख्य अडथळ्यांचा सामना केला परंतु प्रत्येकाचा काहीतरी मोठ्यासाठी एक पायरी म्हणून वापर केला. २ करिंथ. ४:८-९ मध्ये, पौल स्पष्ट करतो, “आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही.”

सामना करण्यासाठी धोरणे
अडथळ्यांना यशामध्ये बदलण्याच्या आपल्या प्रवासात, आपण प्रथम आपला दृष्टीकोन व्यवस्थित केला  पाहिजे. शेवटी, पेत्र तोपर्यंत पाण्यावर चालला जोपर्यंत त्याने त्याचे डोळे येशूवरून हटवले नाही आणि वारा आणि लाटांवर लक्ष केंद्रित करू लागला (मत्तय १४:२९-३१). जेव्हा आपण आपल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतो, ते दुर्गम असे वाटतात. तथापि, आपले लक्ष देवाकडे वळविण्याने, आपण गोंधळाच्या स्थितीत शांती प्राप्त करू शकतो.

याकोब १:२-४ आपल्याला सांगते, “माझ्या बंधुंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो; आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” तुमच्या अडथळ्यांना परीक्षा म्हणून पाहा, जे तुमच्यामध्ये काहीतरी महान असे उत्पन्न करेल. एक नवीन योजना बनवा आणि प्राप्त केले जाणारे लक्ष्य स्थित करा.

तुमच्या पुनरागमनाकडे नेणारा प्रवास
जेव्हा अडथळ्यांचा सामना करत आहात, येथे विशेषेकरून दोन मार्ग आहेत ज्यांचे अवलंबन लोक करतात: धैर्य सोडून देणे किंवा त्यात यश मिळवावे. योसेफाची कथा ही नंतरच्या गोष्टीसाठी एक विलक्षण उदाहरण आहे. त्याच्या स्वतःच्या भावांकडून गुलामिगीरीत विकला गेलेला, चुकीने तुरुंगात टाकलेला, आणि ज्यांना त्याने मदत केली ते त्याला विसरले होते, योसेफाने बहुगुणीत अडथळ्यांचा सामना केला. तरीही, त्याने कधीही धैर्य सोडले नाही आणि देवाच्या योजनेवरील विश्वास गमावला नाही. शेवटी, तो सत्तेच्या पदावर उन्नत करण्यात आला, केवळ त्याच्या कुटुंबाला वाचविले नाही तर दुष्काळापासून संपूर्ण राष्ट्राचा बचाव केला. (उत्पत्ती ४१)

तुमच्या आशीर्वादांची गणना करत सुरुवात करा, मग ते कितीही लहान दिसणारे असोत. योसेफाप्रमाणे तुमच्या परीक्षा अनेक वर्षे चालू शकतील परंतु छोट्या विजयांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका. शेवटी, दाविदाने गल्ल्याथचा एका लहान दगडाने पराभव केला होता. (१ शमुवेल १७:४९-५०)

प्रत्येक यश आपल्या पुनरागमनाच्या दिशेने एक पाऊल म्हणून साजरे करा. तुमचा “दगड’ दिवसभरातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज, नवीन चैतन्याने सकाळी उठण्याइतके सोपे असू शकते. काहीही असो, त्यास तुमच्या जीवनात देवाच्या कार्याचे प्रमाण म्हणून स्वीकारा.

पुनरागमनाचा परमेश्वर 
आपण पुनरागमनाच्या देवाची सेवा करतो. त्याने लाजराला मृत्युमधून उठविले (योहान ११:४३-४४), गंभीर परीक्षांनंतर इयोबाची मालमत्ता पूर्ववत केली (इयोब ४२:१०), आणि सर्वात महत्वाचे, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे मृत्यूला पराजित केले (मत्तय २८:५-६). तुमच्या अडथळ्यांचे स्वरूप कसेही असो,  लक्षात ठेवा की तुम्ही त्या देवाची सेवा करता जो परिस्थितीला बदलण्यात विशेष असा आहे.
Prayer
पित्या, आम्हांला अधिक अविश्वसनीय गोष्टींसाठी दैवी वळण म्हणून अडथळ्यांना पाहण्याचे सामर्थ्य दे. आमचा विश्वास व चिकाटीला प्रज्वलित कर, आम्हांला ही आठवण देत की तू पुनरागमनाचा परमेश्वर आहे, परीक्षांना विजयात बदलतो. येशूच्या नावाने. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● लोक बहाणे करण्याची कारणे- भाग १
● विश्वास ठेवण्याची तुमची क्षमता कशी वाढवावी
● यशाची परीक्षा
● केवळ इतरत्र धावू नका
● हेतुपुरस्सर शोध
● परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक
● कार्यवाही करा
Comments
CONTACT US
Phone: +91 8356956746
+91 9137395828
WhatsApp: +91 8356956746
Email: [email protected]
Address :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
GET APP
Download on the App Store
Get it on Google Play
JOIN MAILING LIST
EXPLORE
Events
Live
NoahTube
TV
Donation
Manna
Praises
Confessions
Dreams
Contact
© 2025 Karuna Sadan, India.
➤
Login
Please login to your NOAH account to Comment and Like content on this site.
Login