हिंदी मराठी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us Contact us Listen on Spotify Listen on Spotify Download on the App StoreDownload iOS App Get it on Google Play Download Android App
 
Login
Online Giving
Login
  • Home
  • Events
  • Live
  • TV
  • NoahTube
  • Praises
  • News
  • Manna
  • Prayers
  • Confessions
  • Dreams
  • E-Books
  • Commentary
  • Obituaries
  • Oasis
  1. Home
  2. Daily Manna
  3. दिवस ०६: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Daily Manna

दिवस ०६: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना

Saturday, 16th of December 2023
40 30 2420
Categories : उपास व प्रार्थना
मी व्यर्थ परिश्रम करणार नाही

“सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते.” (नीतीसूत्रे १४:२३)

फलदायक होणे ही आज्ञा आहे. प्रमुख आज्ञांचा हा भाग होता जे देवाने मनुष्याला निर्माण केल्यावर त्याला दिले होते. नफारहित श्रम हे एक चिन्ह आहे की शत्रू तुमच्या जीवनात सक्रीय आहे.
जेव्हा या शक्तींकडून लोकांवर हल्ला होतो, तेव्हा त्यांचे श्रम दाखवण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही नसते. कधीकधी, या शक्ती त्यांना काम करू देते आणि काही परिणाम मिळवू देते, परंतु रातोरात, संकट आणि नुकसान होते जे त्यांच्या अनेक वर्षांच्या श्रमाला नष्ट करून टाकते.

अनेक विश्वासणारे व्यर्थ परिश्रम करत आहेत; ते सैतानाच्या कार्याबद्दल अज्ञानी आहेत. हे विश्वासणारे वरदान प्राप्त केलेले आहेत पण त्यांना पदोन्नत केले गेलेले नाही; त्यांना नोकरीवाचून पात्रता आहे, आणि पैशावाचून बुद्धिमत्ता आहे. त्यापैकी काहींना अनेक नोकऱ्या आहेत, सकाळपासून ते रात्रीपर्यंत काम आहे, आणि तरीही कर्जात जगत आहेत. काही विश्वासणारे आधीच त्यांच्या व्यवसायात यशस्वी आहेत; म्हणून त्यांना अशा प्रकारची प्रार्थना करण्याची आवश्यकता वाटत नाही. सैतानाने यशस्वीपणे हल्ला केल्यानंतरच्या पेक्षा त्याने हल्ला करण्याआधी प्रार्थना करण्यास प्राधान्य देण्याच्या वास्तविकतेला ते जाणत नाहीत. कारण सैतान कोणत्याही वेळेला हल्ला करू शकतो जर आपण बेसावध राहिलो, आजचे यश उद्या गमावू शकतो. ईयोबाचे उदाहरण घ्या. तो आधीच यशस्वी आणि चांगलाच प्रस्थापित होता, परंतु जेव्हा सैतानाने त्याच्यावर हल्ला केला, त्याने एकाच दिवसात सर्वकाही गमावले. ईयोबाची पुनर्स्थापना झाली नसती जर देव त्याच्या सोबत नसता.

लोक व्यर्थ परिश्रम का करतात याची काही प्रमुख कारणे 
१. बंदिवास
इस्राएली लोक बंदिवासात होते, आणि त्याचे सर्व परिश्रम हे त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या निरीक्षकांसाठी होते.

“९ तो आपल्या लोकांना म्हणाला, ‘पाहा, ह्या इस्राएल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत; १० तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या; नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व ह्या देशातून निघून जातील.’ ११ त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे, ह्या हेतूने त्यांच्यापासून बिगारकाम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली.
१३ म्हणून मिसरी लोक इस्राएलवंशजांपासून सक्तीने काम घेऊ लागले; १४ त्यांना मातीचा गारा व विटा करायला आणि शेतात हरतऱ्हेची कामे करायला लावत, असल्या बिकट कामाने त्यांना जीव नकोसा झाला; कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत.” (निर्गम १: ९-११, १३-१४)

२. दुष्टाची दुष्टाई 
मिद्यानी लोकांनी इस्राएल लोकांनी वनस्पती लावणे आणि बीज वाढण्यासाठी वाट पाहिली, आणि पीक वाढून कापणी करण्याची वेळ आली तेव्हा ते आले की ज्या सर्वांनी त्यांना फायदा करून दिला असता त्यास नष्ट करावे; हे अशाच प्रकारे शत्रू कार्य करतो.
“१ इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले; तेव्हा परमेश्वराने त्यांना सात वर्षे मिद्यानाच्या हाती दिले. २ मिद्यानाचा हात इस्राएलावर प्रबळ झाला; मिद्यानाच्या भीतीने इस्राएल लोकांनी डोंगराडोंगरातून आपल्यासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले. ३ मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत; ४ आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गज्जाच्या परीसरापर्यंतच्या पिकाचा नाश करत व इस्राएलात अन्न, शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे वगैरे काहीएक उरू देत नसत. ५ कारण ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते; अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत. ६ मिद्यानामुळे इस्राएलाची हलाखीची अवस्था झाली, तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. (शास्ते ६:१-६)

कधीकधी, ते एखाद्या तरुण व्यक्तीला त्याच्या तरुण वयात यशस्वी होऊ देत असत, आणि वृद्ध वयात, ते त्यांना आजाराने त्रस्त करत जे त्याचे वित्त कमी करून टाकेल.

कधीकधी ते लेकरांना मरू देत असत, आणि पालकांची मुलांमधील सर्व गुंतवणूक ही वाया जात असत. त्यांनी तुम्हांला थांबवण्याआधी तुम्ही त्यांना थांबवा; ते तुमच्याशी लढण्याआधी तुम्ही त्यांच्याशी लढा. तुमचा शत्रू हा भौतिक नाही; तुमचा शत्रू हा सैतान आहे, परंतु तो लोकांना प्रभावित करू शकतो आणि त्यांना तुमच्या विरोधात उपयोगात आणू शकतो. ते व्यक्ती हे तुमचे खरे शत्रू नाहीत, परंतु ते सैतानाच्या प्रभावाखाली आहेत. तुम्ही आध्यात्मिक शत्रूला थांबविण्यासाठी ज्याक्षणी प्रार्थना करता, मानवी पात्रांद्वारे त्याचा प्रभाव देखील थांबेल.

३. पापी जीवनशैली
पाप शत्रूला कायदेशीर प्रवेश करू देते.
“तुमच्या दुष्कर्मानी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे.” (यिर्मया ५:२५)

नफारहित श्रमाचा ज्यांनी अनुभव केला त्यांची पवित्र शास्त्रातील काही उदाहरणे 

१. एक बुद्धिमान माणूस ज्यास विसरून गेले होते 
उपदेशक ९:१५ मध्ये, त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता; त्याने आपल्या बुद्धीबलाने त्या नगराचा बचाव केला; पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही. हा माणूस बुद्धिमान आहे, परंतु तो गरीब आहे कारण जेव्हाजेव्हा तो लोकांना मदत करतो, ते त्याला विसरून जातात. ज्ञान तुम्हांला श्रीमंत करू शकते, परंतु जेव्हा तुम्ही अशा आत्म्यावर उपाय करत नाही जे लोकांना व्यर्थ परिश्रम करायला लावते, तेव्हा मग तुम्ही एक “गरीब बुद्धिमान माणूस” असाल.

२. याकोब
याकोबाला पुष्कळदा फसविले गेले, आणि त्याच्या परिश्रमासाठी त्याला पूर्ण पुरस्कार मिळत नसे. त्याच्या जीवनावर असणाऱ्या देवाच्या कराराने त्याला वाचवले होते.

“३८ आज वीस वर्षे मी आपल्याजवळ राहिलो; इतक्या काळात आपल्या शेळ्यामेंढ्या गाभटल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाहीत. ३९ वनपशूंनी जी फाडून खाल्ली ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्यांच्याऐवजी दुसरी भरून दिली; दिवसा-रात्री चोरीस गेलेली आपण माझ्यापासून भरून घेतलीत. ४० दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा ह्यांनी मी जर्जर होई; माझ्या डोळ्याची झोप उडे, अशी माझी दशा होती. गेली विष वर्षे मी आपल्या घरी काढली; चौदा वर्षे आपली दोन्ही मुलींसाठी आणि सहा वर्षे आपल्या शेरडामेंढरांसाठी मी आपली चाकरी केली. आणि दहादा आपण माझ्या वेतनात फेरबदल केला. ४१माझ्या पित्याच्या देव, अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा ‘धाक (देव) माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दु:ख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपल्याला धमकावले.” (उत्पत्ती ३१: ३८-४१)

आपल्या समाजात पुष्कळ लोक हे लाबानासारखे आहेत; ते लोकांना फसवतात आणि त्यांचा पूर्ण आशीर्वाद त्यांना नाकारतात. जर तुम्ही प्रार्थना करू शकता, तर देव तुम्हांला पूर्ण ताबा देण्यासाठी पाऊल उचलू शकतो.

पुढील अभ्यासासाठी: लूक. ५:५-७; यशया ६५:२१-२३; १ करिंथ. १५:१०

Prayer
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका. 

१. माझे पीक नष्ट करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येक शक्तीला येशूच्या नावाने मी विखरून टाकतो. (यशया ५४:१७)

२. माझ्या हाताच्या कामाच्या विरोधात कार्य करणाऱ्या कोणत्याही सैतानी शक्तीला येशूच्या नावाने मी नष्ट करतो. (अनुवाद २८:१२)

३. देव आणि येशूच्या रक्ताने अभिषेक झाल्यावर, माझ्या जीवनात कोणतीही शक्ती हल्ला करत आहे तिला मी येशूच्या नावाने नष्ट करतो. (१ योहान २:२७; प्रकटीकरण १२:११)

४. मी लुबाडणाऱ्यांना, लुटारूंना आणि माझ्या आरोग्यावर, व्यवसायावर आणि कुटुंबाला बिघडवून टाकणाऱ्यांना, येशूच्या नावाने धमकावतो. (मलाखी ३:११)

५. माझे परिश्रम व्यर्थ करण्यासाठी कोणत्याही शक्तीला नियुक्त केले असेल तिला येशूच्या नावाने मी प्रतिबंधित करतो. (यशया ६५:२३)

६. पित्या, माझ्या हाताच्या कामाला आशीर्वादित कर आणि त्यास येशूच्या नावाने १०० पट पीक उत्पन्न होण्यास कारणीभूत कर. (उत्पत्ती २६:१२)

७. माझे हिरावून घेतलेले प्रत्येक आशीर्वाद, सद्गुण, संधी आणि आरोग्य येशूच्या नावाने पुन्हा प्राप्त करतो. (योएल २:२५)

८. येशूच्या रक्ताने, येशूच्या नावाने. माझ्या आधारामध्ये कोणत्याही वाईटास मी थांबवतो आणि प्रतिबंधित करतो. (इब्री. ९:१४)

९. माझ्या जीवनात कोणतेही रोपटे जे माझ्या स्वर्गीय पित्याने लावलेले नाही त्यास येशूच्या नावाने मी उपटून टाकतो. (मत्तय. १५:१३)

१०. माझ्या जीवनात मुळापासून तयार केलेला कोणत्याही शापाच्या आणि अपयशाच्या कार्यक्रमास येशूच्या नावाने मी नष्ट करतो. (गलती. ३:१३)

११. माझा उद्देश आणि नशिबाच्या विरोधात तयार केलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही याची मी घोषणा करतो, आणि माझ्या भविष्याला अपयशी करण्याची शत्रूच्या प्रत्येक योजनेला मी येशूच्या नावाने रद्द करत आहे. (यशया ५४:१७)

१२. परमेश्वरा, माझ्या वतीने लढण्यासाठी तुझ्या योद्धा देवदूतांना मोकळे कर आणि येशूच्या नावाने माझ्या जीवनासाठी तुझ्या इच्छेला विरोध करणाऱ्या प्रत्येक आध्यात्मिक गडाचा नाश कर. (स्तोत्र. ३४:७)

Join our WhatsApp Channel


Most Read
● त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
● शब्दांचे सामर्थ्य
● अप्रसिद्ध नायक
● अपरिवर्तनीय सत्य
● स्तुति वृद्धि करते
● चिकाटीची शक्ती
● उदारपणाचा सापळा
Comments
CONTACT US
Phone: +91 8356956746
+91 9137395828
WhatsApp: +91 8356956746
Email: [email protected]
Address :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
GET APP
Download on the App Store
Get it on Google Play
JOIN MAILING LIST
EXPLORE
Events
Live
NoahTube
TV
Donation
Manna
Praises
Confessions
Dreams
Contact
© 2025 Karuna Sadan, India.
➤
Login
Please login to your NOAH account to Comment and Like content on this site.
Login