Daily Manna
32
21
1933
याबेस ची प्रार्थना
Thursday, 15th of February 2024
Categories :
जाबेझ ची प्रार्थना
प्रार्थना
याबेस हा यहूदा (यहूदा म्हणजे "स्तुति") च्या वंशातून होता.
आपल्याला याबेस विषयी यापेक्षा जास्त काहीही ठाऊक नाही कारण संपूर्ण शास्त्रा मध्ये त्याच्याविषयी एकदाच उल्लेख आहे: १ इतिहास ४:९-१०.
आणि याबेस ने इस्राएल च्या परमेश्वराला हे म्हणत हाक मारिली, "तूं माझे खरोखर कल्याण करिशील, माझ्यामुलुखाचाविस्तार वाढविशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दु:खी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल! त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. (१ इतिहास ४:१०)
आज, चला आपण याबेस च्या अद्भुत प्रार्थने कडे पाहू या. तुम्ही सुद्धा तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेच्या साधना मध्ये त्याचा समावेश करू शकता. ते तुमच्या प्रियजनांना शिकवा.
विनंती#१
"ओह,तूं माझे खरोखर कल्याण करिशील,
काही कदाचित असे म्हणतील, "मी अगोदरच आशीर्वादित आहे" खरे आहे, परंतु सत्य हे सुद्धा आहे की येथे आशीर्वादाचे स्तर आहेत. तुम्ही आशीर्वादित असू शकता आणि तुम्ही वास्तवात आशीर्वादित असू शकता.
शब्द आशीर्वाद हा इब्री शब्द "बाराक" पासून येतो, त्याचा अर्थ, यशासाठी समर्थ केलेले. याबेस हे म्हणत होता, "हे परमेश्वरा, असे होवो की मी यशा साठी समर्थ केला जावो." परमेश्वराचा आशीर्वाद कोणास श्रीमंत करतो, आणि तो त्याबरोबर दु:ख देत नाही (नीतिसूत्रे १०:२२). जेव्हा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा प्रतिकार किंवा विरोध ची पर्वा हा विषय नसतो.
विनंती#२
माझ्यामुलुखाचाविस्तार कर
याबेस ने प्रभावाच्या वाढत्या क्षेत्रासाठी मागितले. अशा प्रकारची प्रार्थना तुम्हाला त्या क्षेत्रात नेईल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नव्हती.
विनंती#३
की तुझा हात माझ्यासोबत राहो
जर तुम्ही निर्गमन ८:१६-१९ वाचले. जेव्हा परमेश्वराने मिसरी लोकांवर उंवांची साथ आणली, तेव्हा जादुगार देवाच्या सामर्थ्याची नकल करू शकले नाही. त्यांनी पराभव स्वीकारला व फारो ला म्हटले, "यांत देवाचा हात आहे."
अति मनोरंजक आहे की जादूगारांनी ह्या प्रदर्शनास "देवाचा हात" म्हटले. जर देवाचा हात सर्व मिसरी जादुगारांचीमोहिनी थांबवू शकतो, तर केवळ याची कल्पना करा की जेव्हा देवाचा हात तुमच्यावर असेल तेव्हा कोणत्या महान गोष्टी कदाचित पूर्ण होऊ शकतील?
परमेश्वराचा वरदहस्त एलीयावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून अहाबापुढे इज्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला. (१ राजे १८:४६)
देवाचा हात हा देवाचे सामर्थ्य आहे. ते अशक्यचे स्तर शक्यते मध्ये आणते (लूक १:३३).
मी भाकीत करतो की तुम्ही प्रत्येक स्पर्धकांवर वर्चस्व कराल जे तुमच्यापुढे गेले आहेत. देवाचा हात तुमच्यावर राहील व तुम्हाला वेग देईल.इतरांसाठी ज्यास वर्षे लागलीते पूर्ण करण्यास तुम्हांला केवळ काही दिवस लागतील.
विनंती#४
की तूं मला वाईटापासून राखावे.
येथे आपण याबेस च्या प्रार्थनेची तुलना प्रभूच्या प्रार्थने बरोबर करू शकतो "आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडीव." (मत्तय ६:१३)
विनंती#५
की मी दु:खी होऊ नये!
जीवनात, तुम्ही केवळ दोन प्रकारच्या लोकांचा सामना कराल; एकव्यक्ति हा एक तर परीक्षा आहे किंवा आशीर्वाद. येथे काही तटस्थ व्यक्ति नाही.
याबेस ने प्रार्थना केली की तो सर्वांसाठी आशीर्वाद असे होईल व दु:ख असे नाही. आशीर्वादित असणे हेच केवळ पुरेसे नाही, आपल्याला आशीर्वाद होण्याची गरज आहे.
जेव्हा आपण त्या प्रार्थना करतो ज्या देवाचे राज्य केंद्रित असतात; प्रार्थना ज्या त्याच्या इच्छेनुसार असतात आणि त्याच्या वचनावर आधारित असतात, आपण त्वरित उत्तराची अपेक्षा करू शकतो. पवित्र शास्त्र याची नोंद करते, "म्हणून परमेश्वराने ते त्यास दिले जी त्याने विनंती केली." (१ इतिहास ४:१०)
Confession
[ही पापकबुली जितक्या वेळा तुम्ही करू शकता तितक्या वेळा करा. लक्षात ठेवा, ज्याची तुम्ही कबुली देता ते तुम्ही प्राप्त कराल.]
१. यशा साठी मला समर्थ केले आहे येशूच्या नांवात.
२. जेथे इतर हे अपयशी होत आहेत तेथे मी यशस्वी होईन येशूच्या नांवात.
३. जेथे इतर हे नाकारले गेले आहे तेथे माझा स्वीकार केला जाईल येशूच्या नांवात.
४. जेथे इतरांना सहन केले जाईल तेथे मी उत्सव करीन येशूच्या नांवात.
५. जेथे इतरांचा न्याय केला जाईल तेथे मला न्यायी ठरविले जाईल येशूच्या नांवात.
६. मी आशीर्वाद आहे जेथेकोठे मी जात आहे येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel

Most Read
● केवळ इतरत्र धावू नका● चला यहूदा ला प्रथम जाऊ दया
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● यहूदाच्या पतनापासून ३ शिकवणी
● आत्मे जिंकणे-ते किती महत्वाचे आहे?
● हुशारीने कार्य करा
● कृपा दाखविण्याचे व्यवहारिक मार्ग
Comments