हिंदी मराठी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us Contact us Listen on Spotify Listen on Spotify Download on the App StoreDownload iOS App Get it on Google Play Download Android App
 
Login
Online Giving
Login
  • Home
  • Events
  • Live
  • TV
  • NoahTube
  • Praises
  • News
  • Manna
  • Prayers
  • Confessions
  • Dreams
  • E-Books
  • Commentary
  • Obituaries
  • Oasis
  1. Home
  2. Daily Manna
  3. अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-1
Daily Manna

अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-1

Monday, 22nd of April 2024
26 21 979
Categories : फसवणूक सिद्धांत
कारण जर एखादा तुमच्याकडे येऊन आम्ही जो येशू गाजवितो त्यापेक्षा वेगळ किंवा तुम्ही जे शुभवर्तमान स्वीकारले, त्यापेक्षा वेगळे शुभवर्तमान स्वीकारले तर तुम्ही ते सहज सहन करता. (2 करिंथकरांस 11:4)

लक्षात घ्या, वरील वचनात, आपल्याला तसे अनुकरण करण्याच्या चुकीच्या मार्गात नेण्याविषयी ताकीद देण्यात आली आहे:
  • अन्य येशू
  • एक निराळा आत्मा
  • एक निराळी सुवार्ता
आज, येथे काही निवडक लोक आहेत जे उपासनेला देखील जात नाहीत कारण काही विलक्षण शिकवणीसह त्यांच्या कानावर प्रक्षोभक बातमी टाकणाऱ्या अशा कोणाला ते त्यांच्या भोवती वार्ता देताना पाहू शकत नाहीत. म्हणून त्याऐवजी, ते युट्युब वर अशा शिकवणीसाठी शोध घेतात जे साहजिकपणे त्यांना "गहन गोष्टींकडे" नेईल. हे धोकादायक आहे!!

नुकतेच, एका पाळकाने मला फोन केला व अश्रुपूर्णरित्या मला सांगितले की त्याच्या काही सदस्यांच्या घरात फसव्या गोष्टींवर एक प्रचारकाच्या परिसंवाद सभेला उपस्थित राहिल्यानंतर अनेक सदस्य त्याची मंडळी सोडून गेले. त्या प्रचारकाने त्यांना सांगितले की पाळक त्यांना सर्व काही चुकीच्या गोष्टी शिकवीत आहे आणि तोच एकमेव आहे ज्याच्याकडे 'सत्य प्रकटीकरण' आहे.

नवीन खोटे सिद्धांत, नवीन खोटे प्रकटीकरण आणि नवीन सुवार्ता ह्या जवळजवळ दररोज निर्माण होत आहेत. आणि हे आता अधिक वाईट होणार आहे. बायबल स्पष्टपणे आपल्याला ताकीद देते की शेवटल्या दिवसांत, विचित्र सिद्धांत निर्माण होतील –जे अन्य येशू, अन्य आत्मा, अन्य सुवार्ता सांगतील! (२ करिंथ ११:४)

आज देखील, एक संस्था आहे जी शिकविते की येशू ख्रिस्त हा मीखाएल-आद्यदेवदूत आहे. –ते म्हणजे अन्य येशूचा प्रचार करणे आहे.

आणखी एक संस्था ज्यांच्याकडे लाखो अनुयायी आहेत जे शिकवितात की येशूचे वधस्तंभावरील बलिदान हे पुरेसे नव्हते की आपल्या सर्व पापांपासून आपल्याला सोडवावे, आणि म्हणून कोणताही व्यक्ति जो मरण पावतो त्यास 'अधोलोकात" जाणे आवश्यक आहे की प्रायश्चित्त करावे आणि त्यांच्या जिवांस शुद्ध करावे-ती अन्य सुवार्ता आहे.

"अन्य सुवार्ता" ही संज्ञा याचा अर्थ दुरुपयोग करणे (म्हणजे गोष्टींमध्ये भेसळ करणे). ते जे सुवार्तेमध्ये भेसळ करतात ते त्यामध्ये आणखी गोष्टी जोडण्याद्वारे सुवार्तेला नष्ट करतात, आणि ख्रिस्ताचे व्यक्तित्व व कार्याच्या स्वाभाविकतेला विद्रूप करतात.

आणखी, येथे ही एक संस्था आहे जी शिकविते की पवित्र आत्मा हा सर्वशक्तिमान परमेश्वराची केवळ एक अदृश्य "शक्ती" आहे आणि एक व्यक्ति नाही –तो निराळा आत्मा आहे.

आज, हे तेवढेच सामान्य आहे लोकांना हे म्हणताना ऐकणे, "आत्म्याने मला हे करण्यास सांगितले, आत्म्याने त्यावर विश्वास ठेवण्यास मला सांगितले ......" इतका गोंधळ हा लोक त्यांच्या स्वतःच्या "मानवी आत्म्याच्या" ऐकण्याचा केवळ परिणाम आहे, तेव्हा आपल्याला काय करण्याची गरज आहे ती ही की देवाच्या त्या वचनाकडे पुन्हा वळावे जे आत्म्याने पहिल्या प्रथम प्रकट केले होते. जर जे तुम्ही ऐकत आहात ते देवाच्या वचनाच्या समन्वयात नाही, तर तुम्ही निराळ्या आत्म्याचे ऐकत आहात.

Prayer
पित्या, असे होवो की तुझ्या वचनाने माझ्या अंत:करणाला विश्वास दयावा आणि माझ्या अंत:करणाला बदलावे. मला साहाय्य कर की योग्य व्यक्तींबरोबर संबंध बनवावे. मला व माझ्या कुटुंबाला खोटया सिद्धांतांपासून सांभाळून ठेव. येशूच्या नांवात. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● दिवस १७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● प्रतिदिवशीज्ञानीहोत कसे वाढावे?
● उत्तमतेच्या मागे लागणे
● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
● दैवी भेट देण्याचा तुमचा क्षण ओळखा
● उपास द्वारे देवदूताला कार्य करावयास लावणे
● खोटे बोलणे सोडणे आणि सत्य स्वीकारणे
Comments
CONTACT US
Phone: +91 8356956746
+91 9137395828
WhatsApp: +91 8356956746
Email: [email protected]
Address :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
GET APP
Download on the App Store
Get it on Google Play
JOIN MAILING LIST
EXPLORE
Events
Live
NoahTube
TV
Donation
Manna
Praises
Confessions
Dreams
Contact
© 2025 Karuna Sadan, India.
➤
Login
Please login to your NOAH account to Comment and Like content on this site.
Login