हिंदी मराठी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us Contact us Listen on Spotify Listen on Spotify Download on the App StoreDownload iOS App Get it on Google Play Download Android App
 
Login
Online Giving
Login
  • Home
  • Events
  • Live
  • TV
  • NoahTube
  • Praises
  • News
  • Manna
  • Prayers
  • Confessions
  • Dreams
  • E-Books
  • Commentary
  • Obituaries
  • Oasis
  1. Home
  2. Daily Manna
  3. दानधर्म करण्याची कृपा-२
Daily Manna

दानधर्म करण्याची कृपा-२

Monday, 20th of May 2024
26 21 1406
Categories : देणे
'दानधर्म करण्याची कृपा' ही आपली शृंखला आपण पुढे चालू ठेवत आहोत. आपण त्या कारणांकडे पाहणार आहोत की दानधर्म करणे हे आपल्या आध्यात्मिक वाढी साठी का महत्वाचे आहे.

२. परमेश्वर आपल्या दानधर्मात हर्ष करतो.

लूक ६:३८, "दया म्हणजे तुम्हांस दिले जाईल; चांगले माप दाबून, हालवून व शींग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही दयाल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल."

खरे दानधर्म करणे हे समजण्याने सुरु होते की "त्याच्याकडून, त्याच्याद्वारे आणि त्यासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याला युगानुयुग गौरव असो." (रोम ११:३५. ३६) दुसऱ्या शब्दात, तोच सर्व जीवनाचे स्त्रोत, माध्यम व ध्येय आहे.

आपण जेव्हा परमेश्वराला अशा मनाने देतो, ते त्या आशीर्वादास मोकळे करते जे वाढीची शास्वती देते. मार्टिन लुथर ने एकदा म्हटले, "मी माझ्या हातात काही गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या सर्व गमाविल्या, परंतु परमेश्वराच्या हातात ज्या मी दिल्या, त्या अजूनही माझ्याकडे आहेत.

लूक ६:३८ वाचणे हे मोहात पाडणारे होऊ शकते आणि केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करावे की दिल्यानंतर आपण काय प्राप्त करतो, परंतु असे करण्याने आपण मुद्दा गमावू शकतो. आपण प्रामुख्याने देतो  कारण परमेश्वर आपल्या उदारतेमध्ये हर्ष करतो. परमेश्वर दान देणाऱ्याकडे आकर्षित होतो. "हर्षाने देणारे परमेश्वरास आवडतात" (२ करिंथ ९:७)

३. आपले दानधर्म करणे द्वार उघडते

"तिने जाऊन एलीयाच्या सांगण्याप्रमाणे केले; तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला." (१ राजे १७:१५)

विधवेला आशीर्वादित केले व तिने तिच्या कुटुंबासह अवश्य अनेक दिवस भोजन केले. तिच्या देण्याने तिच्यासाठी व तिच्या कुटुंबासाठी आशीर्वादाचे द्वार उघडले. अनेकांना ही समज नसते आणि म्हणूनच जेव्हा अभाव असतो त्यावेळी दान देण्यात संघर्ष करतात.

त्याने (कर्नेल्य) दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या, अशी आपणास हाक मारीत आहे. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय, महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. (प्रेषित १०:३-४)

कर्नेल्य हा कोणी असा नव्हता की ज्याने परमेश्वराची उपासना केवळ शब्दाने केली होती; त्याने त्याची उपासना कृती मध्ये पूर्ण केली होती. पवित्र शास्त्र कर्नेल्या ला असे संबोधिते की ज्याने नियमितपणे  देवाच्या कार्यासाठी व देवाच्या लोकांसाठी दानधर्म केले होते.

कर्नेल्याच्या दानधर्म करण्याने देवदूताकडून एक अद्भुत भेटी साठी द्वार उघडे केले होते. परमेश्वराने त्याच्या महान प्रेषित-पेत्रा ला सुद्धा मार्गदर्शन केले की, जावे आणि कर्नेल्याच्या कुटुंबियांना तारणाचा संदेश सांगावा.

तर मग तुम्ही पाहा, की बीज पेरणे हे परमेश्वराच्या-प्रमाणाच्या पीक साठी द्वार उघडते. प्रत्येक बीज जे तुम्ही कधी पेरले असेन ते परमेश्वरा समोर स्मरणार्थ आणण्यात येईल आणि त्या बीज च्या प्रत्युत्तरात तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तो तुम्हाला पुरवेल.

यशया ४५:१-२ मध्ये परमेश्वराने हे आश्वासन दिले आहे हे म्हणत, "परमेश्वर म्हणतो, त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करितो......मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करून, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन."
Prayer
पित्या, येशूच्या नांवात, मी घोषणा करतो की मी दिले आहे आणि चांगले माप दाबून, हालवून व शींग भरून माझ्या पदरी घालतील; सर्व पुरुष व स्त्री मला दानधर्म करतील. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● परमेश्वरासाठी तहानेले झालेले
● दिवस ११:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● मध्यस्थी करणाऱ्यांसाठी एक भविष्यात्मक संदेश
● धन्यवादाचे अर्पण
● देवासारखा विश्वास
● दुष्ट विचार पद्धती विरुद्ध संघर्ष (दिवस 9)
● दु:खा पासून कृपे कडे जाणे
Comments
CONTACT US
Phone: +91 8356956746
+91 9137395828
WhatsApp: +91 8356956746
Email: [email protected]
Address :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
GET APP
Download on the App Store
Get it on Google Play
JOIN MAILING LIST
EXPLORE
Events
Live
NoahTube
TV
Donation
Manna
Praises
Confessions
Dreams
Contact
© 2025 Karuna Sadan, India.
➤
Login
Please login to your NOAH account to Comment and Like content on this site.
Login