Daily Manna
21
16
841
आजच्या वेळेत हे करा
Thursday, 13th of June 2024
Categories :
मध्यस्थी
मध्यस्थी करणारे
लाखो लोकांसाठी मागील महिने हे फारच आवाहनात्मक व तणावपूर्ण होते. प्रत्येक वेळी मी लोकांना त्यांच्या पीडादायक परिस्थिती संबंधी सांत्वन व सहानुभूती देत होतो, माझ्या अंतरंगात सुद्धा मला खोलवर एक कांटा टोचला जात आहे हे अनुभवीत होतो. पवित्र आत्म्याने मला तेव्हा ओझे दिले हे म्हणत की, "पुत्रा, माझ्या लोकांसाठी आग्रह्पूर्ण प्रार्थना करा." मी फारच प्रामाणिकपणे म्हणत आहे, कधी कधी इतक्या प्रार्थना विनंत्या पाहून मी फारच भारावून जात असे परंतु मी त्याची वाणी मानण्याचा निर्णय केला होता.
एके दिवशी प्रभु येशूने, "त्याच्या बारा प्रेषितांस एकत्र बोलावून त्यांस सर्व भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला; आणि त्याने त्यांस देवाच्या राज्याची घोषणा करावयास व रोग्यांस बरे करावयास पाठविले." (लूक ९:१-२)
प्रभु येशूने त्याच्या शिष्यांना आदेश दिला की आजाऱ्यांस त्याच्या नांवात बरे करा. याचा सरळ अर्थ हा आहे की प्रत्येक शिष्यांकडे त्याला किंवा तिला पाठबळ देण्यास दैवी अधिकार होता कि तसे करावे.
"विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील: ते माझ्या नांवाने भुते काढतील, .......त्यांनी दुखणाइतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील." (मार्क १६:१७-१८)
आजच्या वेळेत, काही बंधने आपल्याला परवानगी देणार नाहीत की लोकांवर हात ठेवावे व त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. तथापि, त्याने तुम्हाला त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास नाही थांबविले पाहिजे. जेव्हा तुम्हाला त्यांचे आजार, संकटे याविषयी बातमी मिळते-त्यांच्यासाठी मध्यस्थी करा. त्यांच्याबरोबर केवळ सहानुभूती करण्याऐवजी, त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहात.
त्यांना सांगा की प्रभु येशू आजही राजासनावर आहे आणि तो त्यांना सोडणार नाही किंवा त्यांचा त्याग करणार नाही. जेव्हा तुम्ही असे आचरण स्वीकारता जे देवाच्या वचनावर आधारित आहे, तर परिणाम जे पुढे होतील त्याने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
देवाच्या चमत्काराच्या हस्तक्षेपाच्या साक्षी ह्या सर्वीकडून ओतप्रोत भरून येऊ लागतील- येशूचे नांव हे उंचाविले जाईल!
एक मार्ग हा, नोहा ऐप वर मध्यस्थी करणारे योद्धे होण्याद्वारे तुम्ही अनेक जणांसाठी आशीर्वाद होऊ शकता. तुम्हाल इतरत्र कोठेही जाण्याची गरज नाही की कोणाला तरी शोधावे की ज्यांच्यासाठी प्रार्थना करावी. नोहा ऐप वर तेथेच प्रार्थना विनंत्या दिसतील. तुम्हाला एवढेच करावयाचे आहे की केएसएम कार्यालयाला फोन करावयाचा आहे व त्यांना सांगावयाचे आहे की तुम्हाला त्या प्रार्थना विनंत्यांसाठी प्रार्थना करावयास आवडेल. ते तुमचा आढावा घेतील व तुम्हाला पंजीकृत करतील (हे सर्व काही विनामुल्य आहे). जेव्हा तुम्ही प्रार्थना विनंती साठी प्रार्थना करता, त्यांना ह्याची सुचना मिळेल की ह्या व्यक्तीने त्यांच्या प्रार्थना विनंती साठी प्रार्थना केली आहे.
तुम्ही कदाचित हे म्हणू शकता, "पास्टर मायकल, ह्यामध्ये मला काय लाभ?" चांगला प्रश्न! तुम्हाला ठाऊक आहे काय, की मध्यस्थी करणारे हे अगदी देवाच्या अंत:करणाजवळ आहेत? संदेष्ट्ये हे देवाचे मुख आहेत व सुवार्ताप्रसारक हे त्याचे पाय आहेत, परंतु मध्यस्थी करणारे हे अगदी त्याच्या अंत:करणाजवळ आहेत. परमेश्वराला मागा की इतरांसाठी मध्यस्थी करण्यास तुम्हाला कृपा पुरवावी.
तुम्ही पाहा, देवाच्या राज्यात जो मार्ग वर आहे तो मार्ग खालील आहे, प्राप्त करण्यासाठी आपल्याला देण्याची गरज आहे. तुमच्या समस्या सोडविण्याचा मार्ग हा अगोदर इतरांच्या समस्या सोडविणे आहे (देवाच्या साहाय्याने). तुम्ही ईयोबा विषयी वाचले नाही काय? आपल्या अनेक जणांपैकी त्यास अधिक समस्या होत्या. याचवेळी ईयोबाने त्याच्या भोवतालच्या लोकांसाठी प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आणि पाहा, काय घडले. "ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दु:खाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली" (ईयोब ४२:१०).
Prayer
पित्या, येशूच्या नांवात, मध्यस्थी करणाऱ्या अंत:करणासाठी मी तुला विनंती करीत आहे. तुझे अनुकरण करण्यास मला साहाय्य कर. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● स्वर्गाचे आश्वासन● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति
● सुदृढ मन हे एक दान आहे
● इतरांसाठी मार्ग प्रकाशित करणे
● ख्रिस्ता समान होणे
● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
Comments