Daily Manna
18
13
137
प्रभु येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष देणे-१
Sunday, 20th of April 2025
Categories :
खरा साक्षीदार
तुमच्या बायबल मध्ये प्रेषित ४:२ कडे माझ्यासह चला:
"कारण ते लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे असे, प्रसिद्ध्पणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला."
येथे आपण पाहतो की परुशी, सदुकी व त्यावेळचे धार्मिक पुढारी हे गडबडले होते. ते असे की, त्यांनी त्यांची शांति गमाविली होती कारण प्रेषित येशूच्या पुनरुत्थाना विषयी प्रचार करीत होते.
आज सुद्धा, ह्या जगाच्या लोकांना काही घेणे देणे नाही जेव्हा आपण येशूच्या वधस्तंभावरील मरणा विषयी बोलतो. ते सहानुभुति दाखवितात हे म्हणत, "ओह, येशू मरण पावला, किती वाईट, किती वाईट. तो चांगला मनुष्य होता." परंतु येथे आता वेगळेच वळण येते. ते गडबडून जातात जेव्हा तुम्ही त्यांना हे सांगता, "पाहा, येशू जो मरण पावला, लक्षात घ्या, तो पुन्हा उठला. तेव्हाच मग ते म्हणतात, "नाही, ते शक्य नाही."
आज सुद्धा, येथे जगामध्ये लोकांचे काही गट आहेत, जे हा विश्वास ठेवीत नाही की येशू मृतामधून पुन्हा उठला. म्हणून, त्यांनी त्यांचे स्वतःचे सिद्धांत घडविले आहेत. ते म्हणतात, पाहा, येशू वधस्तंभावर होता, परंतु तो मरण पावला नाही, तो केवळ बेशुद्ध झाला, व नंतर पुन्हा शुद्धीवर आला." हे नरकाच्या खड्ड्यापासून एक खोटे आहे.
पाहा किती सोयीस्करपणे त्यांनी कथा घडविली की आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थानाला एक वेगळीच दिशा दयावी. सत्य हे आहे, "येशू मरण पावला, तो मृतामधून पुनरुत्थित झाला व तो लवकरच पुन्हा येत आहे."
पुनरुत्थान काय आहे? ते आज आपल्याला कसे लागू आहे? ते काही शुभेच्छा पाठविणे किंवा सामाजिक माध्यमावर काही चांगले चित्र पाठविणे असे आहे काय? हे काही केवळ हात मिळविणे व चांगला वेळ घालविणे आहे काय? आता, मी ह्या सर्वांविरुद्ध नाही, आपल्याला हे करण्याची गरज आहे परंतु मुद्दा हा आहे की येथे त्यापेक्षा काही अधिक आहे.
प्रत्येक ख्रिस्ती लोकांना त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष देण्यास बोलाविले आहे.
जेव्हा यहूदा मरण पावला, तेथे केवळ ११ च प्रेषित राहिले होते. म्हणून प्रेषितांनी सभा बोलाविली की यहूदा च्या जागी कोणाला तरी घ्यावे. प्रेषित १:२२ मध्ये आपण हे कृत्य पाहतो, "म्हणजे तो आपणामध्ये येत जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे."
येथे ह्या पवित्र वचनात काही सिद्धांत आहे जे आजही आपल्याला लागू आहे. आपल्यातील प्रत्येकाला त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार व्हावे म्हणून बोलाविण्यात आले आहे.
हे पुरेसे नाही केवळ असे म्हणणे, " ओह! देवाची स्तुति होवो, मी बरा झालो, मला आशीर्वाद मिळाला. "आता, पुन्हा, हे सर्व चांगले आहे, परंतु येथे यापेक्षा अधिक आहे. त्याच्या पुनरूत्थानाचे आपण साक्षीदार झाले पाहिजे.
साक्षीदार म्हणजे काय?
एक साक्षीदार हा तो आहे, जो कोणीतरी म्हणतो मला ते ठाऊक आहे.
तुम्ही पाहा, आपल्यापैकी अनेक जण हे अजूनही मागण्याच्या स्तरावरच आहेत (मत्तय ७:७ पाहा), जो लोकसमुदाय येशूच्या मागे चालत होता तो जास्तकरून त्याच्या मागे मासे व भाकरी साठी येत होता. जर तुम्ही शुभवर्तमान हे वाचले असेन, बायबल म्हणते, एका ठिकाणी ते एकदुसऱ्यावर पडत होते, ते एक-दुसऱ्यास कुदळीत होते कारण येशू लोकांना बरे करीत होता. बरे करण्याचे गुण येशुमधून जात होते, असंख्य लोक बरे झाले होते. डॉक्टरांचा व्यवसाय कदाचित ठप्प पडला असेन. शवपेटी ची व्यवस्था करणाऱ्यांना कदाचित येशूच्या वेळी व्यवसाय मिळत नसेन.
तुम्हाला ठाऊक आहे काय कोणी प्रभु येशूला वधस्तंभावर खिळिले? हे तेच लोक होते ज्यांनी मासे व भाकरी खाल्ल्या होत्या. हे कदाचित त्या असंख्य लोकसमुदायातील काही असतील जे बरे झाले व ज्यांची सुटका झाली होती. ते ओरडत होते, "त्यास वधस्तंभावर खिळा" (लूक २३:२१).
येथे आज काही लोक आहेत, जेव्हा सर्व काही चांगले होत आहे, ते म्हणतील, "देवाची स्तुति होवो" परंतु जेव्हा कठीण प्रसंग येतात, तेव्हा मग ते सामाजिक माध्यमावर ते त्यांचे द्वेषपूर्ण विष ओकतात. असा व्यक्ति हा येशूचा शिष्य नाही, परंतु केवळ एक चांगल्या वातावरणातील पंखा आहे. एक शिष्य हा तो आहे जो वेळी अवेळी येशूच्या मागे चालतो व त्याची शिकवण पाळतो.
प्रेषिताने म्हटले, "आम्ही केवळ [त्याच्या] मधील जीवनाच्या वचना विषयी [लिहित आहोत] जो प्रारंभापासून अस्तित्वात आहे, ज्यांस आम्ही ऐकले, ज्यांस आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, ज्यावर आम्ही आमचे डोळे लाविले आणि आमच्या स्वतःच्या हाताने स्पर्श केला." (१ योहान १:१ ऐम्पलीफाईड)
Prayer
पित्या, येशूच्या नांवात, तुझ्या पुनरुत्थानाचा मला एक खरा साक्षीदार बनीव. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती● प्रीतीचे खरे स्वरूप
● दानीएलाच्या उपासादरम्यान प्रार्थना
● दिवस २१ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● नवीन आध्यात्मिक वस्त्रे परिधान करा
● दिवस १८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
Comments