हिंदी मराठी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us Contact us Listen on Spotify Listen on Spotify Download on the App StoreDownload iOS App Get it on Google Play Download Android App
 
Login
Online Giving
Login
  • Home
  • Events
  • Live
  • TV
  • NoahTube
  • Praises
  • News
  • Manna
  • Prayers
  • Confessions
  • Dreams
  • E-Books
  • Commentary
  • Obituaries
  • Oasis
  1. Home
  2. Daily Manna
  3. तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
Daily Manna

तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका

Friday, 18th of April 2025
21 12 225
Categories : विश्वास
१४ मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत; १५तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावेस अशी विनंती करतो. १६जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत." (योहान १७:१४-१६)

ख्रिस्ती म्हणून आपल्याला जगात राहण्यास बोलाविले आहे, पण जगाचे होण्यासाठी बोलाविलेले नाही (योहान १७). आपल्याला आपले शेजारी, आणि शत्रूंना देखील प्रेम करण्यासाठी बोलाविले आहे, परंतु याचा हा अर्थ नाही की आपण आपल्या स्वतःला त्यांच्याबरोबर एकरूप करून घेऊ नये जे आपली मुल्ये आणि विश्वास मानीत नाहीत.

आजच्या जगात, ख्रिस्ती लोकांसाठी अधिकच सामान्य आहे की एखादया व्यक्तीबरोबर किंवा मिळून कार्य करावे जे पवित्र शास्त्राचा आदर करीत नाहीत आणि त्यांच्या विश्वासासाठी त्यांचा छळ देखील करतात. ख्रिस्ती लोकांसाठी हे आव्हानात्मक होऊ शकते, कारण देवाबरोबरचे त्यांचे चालणे आणि आध्यात्मिक पारख करण्यावर ते प्रभाव करू शकते. याचा अर्थ हा होत नाही की आपण आपल्या स्वतःला जगापासून वेगळे करावे, परंतु त्याऐवजी ज्या लोकांच्या संगतीत आपण राहतो त्याविषयी हेतुपूर्वक काळजी घेतली पाहिजे.

तुम्हांला योग्य जे ठाऊक आहे त्यापेक्षा जरा खालच्या पातळीवर जाणे हे तडजोडीमध्ये सामाविलेले असते. बायबल अशा तडजोडीस असे संबोधिते -"लहान कोल्हे द्राक्षमळ्याची नासधूस करतात" (गीतरत्न २:१५). यामुळेच, आपला विश्वासूपणा, विशेषतः लहान गोष्टींबाबत, फारच महत्वाचा आहे.

"ह्या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघडया होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला." (दानीएल ६:१०)

विश्वासूपणा उन्नतिकडे कसा नेतो याबद्दल दानिएलाचे उदाहरण मुख्य रूपाने कार्य करते. मृत्यूच्या धोक्याला तोंड देत असताना देखील, दानिएलाने विश्वासाशी तडजोड करण्याचे नाकारीले. असे करण्याने, त्याने आशिया मधील एक सर्वात शक्तिशाली पुरुष होण्यासाठी मार्ग उघडीला.

एक व्यक्ति जो तडजोड करण्यास नकार देतो हा तो कोणीतरी आहे ज्यावर देव जीवनातील मोठया आणि मोठया संधीसाठी भरवसा ठेवू शकतो. हे महत्वाचे आहे हे लक्षात घेणे की हा केवळ परमेश्वरच नाही जो एखादया व्यक्तीकडे लक्ष देतो. इतर लोक देखील याकडे लक्ष देत असतात, मग ते मालक, सहकारी किंवा गुरुजण असतील.

भटकलेल्या आणि मृतमय जगासाठी तडजोड करणे हे तुमच्या साक्षीला देखील बिघडवू शकते, जसे याकोब ४:४ चेतावणी देते: "जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे." एक ख्रिस्ती म्हणून आपल्याकडे मोठी जबाबदारी आहे जी आपले तारण, आणि सत्याचे ज्ञान, आणि सर्वशक्तिमान परमेश्वराची लेकरे म्हणून आशीर्वादाच्या स्थानासह येते.

ज्यावेळेस आपल्या भोवतालच्या लोकांचा आपण आदर केला पाहिजे, त्याचवेळेस आपण पवित्र शास्त्राची आपली मुल्ये व विश्वास याशी तडजोड नाही केली पाहिजे.

Bible Reading: 2 Samuel 16-18
Prayer
प्रेमळ पित्या, तुझ्या वचनात तडजोडीस नाकारण्यासाठी मला कृपा पुरीव, जरी जेव्हा ते कठीण किंवा लोकप्रिय नाही असे दिसत असेन.
तुझ्या नेत्रांसमोर मला विश्वसनीय राहण्याची इच्छा आहे. माझ्या जीवनास तुझी प्रीति व सत्याचे प्रतिबिंब असे कर, की या अंधाऱ्या जगामध्ये उज्वलपणे चमकत राहावे. येशूच्या नावाने, आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
● वारा जो डोंगराला देखील सरकवतो
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- १
● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
● तुमच्या भविष्यासाठी देवाची कृपा आणि उद्देश स्वीकारणे
● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले
● वनातील मानसिकतेवर प्रभुत्व करणे
Comments
CONTACT US
Phone: +91 8356956746
+91 9137395828
WhatsApp: +91 8356956746
Email: [email protected]
Address :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
GET APP
Download on the App Store
Get it on Google Play
JOIN MAILING LIST
EXPLORE
Events
Live
NoahTube
TV
Donation
Manna
Praises
Confessions
Dreams
Contact
© 2025 Karuna Sadan, India.
➤
Login
Please login to your NOAH account to Comment and Like content on this site.
Login