Daily Manna
18
18
190
त्याचे दैवी दुरुस्तीचे दुकान
Monday, 28th of April 2025
Categories :
पुनर्स्थापना
बदल
"दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन." (आमोस ९:११)
"दुरुस्तीचे दुकान" हे टेलीव्हिजनवर एक कार्यक्रम आहे ज्याची २०१७ मध्ये सुरुवात झाल्यापासून त्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. (युट्युबवर मी काही मालिका पाहिल्या आहेत). या कार्यक्रमाच्या साधारण पद्धतीमध्ये पुनर्स्थापना करणाऱ्या कुशल कारागिरांचा समावेश आहे जे लोकांच्या मौल्यवान संपत्तीला पुन्हा सजीव करण्याचे काम करतात. जुनी खेळणी, आणि घड्याळांपासून ते प्राचीन फर्निचर, पेंटिंगपर्यंत, शोमधील कारागीर आणि स्त्रिया प्रत्येक वस्तूंचे मूळ सौंदर्य पुनर्स्थापित करण्यासाठी खूप काळजी घेतात.
"दुरुस्तीचे दुकान" यास इतर पुनर्स्थापनेच्या शो पेक्षा काय वेगळे ठरविते ते लोकांनी आणलेल्या वस्तूंशी असलेले त्यांचे भावनिक संबंध आहे. यांपैकी अनेक वस्तू ह्या कौटुंबिक वारसा किंवा प्रिय वस्तू आहेत जे पिढ्यांपासून मिळालेले आहेत. जेव्हा ह्या वस्तूंना पुनर्स्थापित केले जाते, तेव्हा ते केवळ एक भौतिक वस्तू नाहीत ज्यांना पुनर्जीवित केले गेले आहे परंतु आठवणी आणि भावना ज्या त्याशी जुळलेल्या आहेत.
मालकांना त्याच्या वस्तू पुनर्स्थापित होताना दिसताच त्यांच्या प्रतिक्रिया पाहणे हा एक आनंद आहे. काही भावनात्मक होऊन जातात आणि रडतात जेव्हा त्यांना बालपणाच्या आठवणी आठवतात, त्याचवेळेस इतर हे सरळपणे अत्यंत आनंदित होतात हे पाहून की त्यांच्या मौल्यवान संपत्तीला त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळालेले आहे. "दुरुस्तीचे दुकान" हे ब्रिटन व जगभरात आवडता कार्यक्रम झाले आहे, आणि असे का हे पाहणे सोपे आहे. हा एक शो आहे जो मौल्यवान संपत्तीचे मुल्य आणि पुनर्स्थापनेचे सामर्थ्य की जुन्या वस्तूंना नवीन करणे याची आपल्याला आठवण देते.
पुनर्स्थापना म्हणजे एखादया गोष्टीला त्याच्या मूळ स्थितीत पूर्ण व परिपूर्णपणे आणणे आहे. त्याचप्रमाणे, देव आपल्याला एक व्यक्ति म्हणून पुनर्स्थापित होऊ देतो, जे आपली स्वतःची पापे किंवा इतरांच्या कृत्यांद्वारे हतबल झाले आहेत. देवाची प्रीति व कृपे द्वारे, आपल्याला परिपूर्णतेच्या स्थानी पुन्हा नियुक्त केले जाऊ शकते आणि आपल्या भूतकाळाच्या जखमांपासून बरे केले जाऊ शकते.
हतबल झालेल्या लोकांचे देवाचे पुनर्स्थापना करणे ही एक सामर्थ्यशाली आठवण आहे की आपण हतबल झालेले आहोत किंवा हतबल झालेल्या स्थितीतच कायम राहू म्हणून घाबरण्याची गरज नाही. त्याऐवजी आपण विश्वास बाळगू शकतो की देव आपल्याला परिपूर्णतेच्या अवस्थेमध्ये आणेल आणि नवीन आशा व शक्तीनिशी आपल्याला जीवनात पुढे जाऊ देईल. जेव्हा आपण देवाला आपल्या जीवनात कार्य करावे आणि आपल्याला पुनर्स्थापित करू देऊ, तेव्हा आपण खरे आरोग्याचा अनुभव आणि कठीण परिस्थितीमध्ये शांति प्राप्त करू शकतो.
संपूर्ण नवीन करारात, आपण येशूला अंतिम पुनर्स्थापित करणारा म्हणून पाहतो, जो लोकांना बरे करतो आणि त्यांना पुन्हा नवीन करतो. तो शारीरिक आरोग्य, दृष्टि आणि जीवन देखील पुनर्स्थापित करतो. स्त्री जिला रक्तस्राव होत होता तिचे आरोग्य पुनर्स्थापित करण्यात आले होते. आंधळ्या बार्तीमयाला त्याची दृष्टि पुन्हा प्राप्त झाली होती. नाईन येथील विधवेच्या मुलाचे जीवन पुनर्स्थापित केले गेले होते. पेत्राला त्याच्या व्यवसायामधील अपयशातून पुनर्स्थापित केले गेले, आणि यादी पुढे चालूच राहते. तथापि, त्याचे पुनर्स्थापना करणे हे भौतिक दृष्टीकोनाच्याही पलीकडे जाते. येशू, नातेसंबध, प्रतिष्ठा आणि उद्देश देखील पुनर्स्थापित करतो.
आपण ह्या पुनर्स्थापनेच्या विषयाला संपूर्ण बायबलमध्ये पाहतो, ज्यासह देवाची इच्छा आहे की सर्व गोष्टींना नवीन करावे. "तेव्हा राजासनावर बसलेले म्हणाला, पाहा, मी सर्व गोष्टी 'नवीन करतो'". तो म्हणाला, "लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत" (प्रकटीकरण २१:५).
जेव्हा आपण ख्रिस्ताकडे येतो, तेव्हा आपण नवीन सृष्टि होतो, त्याबरोबर आपल्या जीवनाच्या जुन्या गोष्टी ह्या निघून जातात आणि सर्व गोष्टी ह्या नवीन होतात (२ करिंथ ५:१५). हे परिवर्तन हे केवळ कॉस्मेटिक बदल नाही परंतु सर्वांगाने बदल आहे की आपण कोण आहोत आणि आपण कोण असावयास पाहिजे आहे.
आपल्या जीवनात देवाचे पुनर्स्थापना करण्याचे कार्य ही एक जीवनभराची प्रक्रिया आहे जेथे आपणांस त्याच्यामध्ये सतत नवीन केले जाते. तो आपल्याला केवळ आपल्या मूळ स्थितीत पुनर्स्थापित करीत नाही परंतु आपण पूर्वी कसे होतो त्यापेक्षाही अधिक उत्तम असे करीत आहे. त्याचे पुनर्स्थापना करण्याचे कार्य हे केवळ आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी मर्यादित नाही परंतु ते आपल्या सभोवतालच्या जगासाठी देखील आहे, ज्यासाठी आपल्याला पुनर्स्थापित करणारे एजंट आणि इतरांसाठी आरोग्य आणावे म्हणून पाचारण झालेले आहे.
तुम्हांला आज पुनर्स्थापनेची गरज आहे काय? तुम्हांला त्याच्या दैवी दुरुस्तीच्या दुकानात घेऊ दया आणि प्रेमळरित्या तुम्हांला पुनर्स्थापित करू दया.
Bible Reading: 1 kings 13-14
Confession
पित्या, तुझ्या तारणाचा आनंद मला पुनर्स्थापित कर आणि माझा सांभाळ करण्यासाठी मला इच्छूक आत्मा दे. येशूच्या नावाने. (स्तोत्र ५१:१२)
Join our WhatsApp Channel

Most Read
● दिवस २१:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● दिवस ३३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दोनदा मरू नका
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
● त्याच्या सामर्थ्याचा उद्देश
● दैवी शांति मध्ये प्रवेश कसा मिळवावा?
● ख्रिस्ता समान होणे
Comments