कधी नाही एवढया महान गुरु द्वारे शिष्यांना प्रशिक्षण दिले गेले होते. त्यांनी त्यास वधस्तंभावर दिलेले पाहिले होते आणि आता तो त्यांच्या मध्य जिवंत होता. ते किती उल्लासित झाले असतील? त्यांना असे वाटले असेन की जावे व प्रत्येकाला सांगावे की त्यांना ठाऊक आहे की येशू हा वास्तवात प्रभु व मशीहा होता. आणि तरीही प्रभूने त्यांना म्हटले, "पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हांकडे पाठवितो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरांत राहा (वाट पाहा)." (लूक २४:४९)
ते इतके उत्साही व आवेशी होते की जावे व जगाला पुनरुत्थित प्रभु विषयी सांगावे, येशूने त्यांना सावधान केले व त्यांना प्रोत्साहन दिले की कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांचे ज्ञान व सामर्थ्यावर विसंबून राहू नका परंतु त्याऐवजी यरुशलेम मध्ये थांबून राहा जोपर्यंत पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जात नाही.
आजच्या समाजात कोणालाही थांबून राहण्यास आवडत नाही, वाट पाहण्यास वेळ फुकट घालविणे असे समजले जाते, निष्फळ असे-तुम्ही कशाचेही नांव घ्या. मानवी मनाचे स्वाभाविक शब्दावडंबर हे की आपण का वाट पाहावी कारण त्याचवेळी आपण अधिक कार्य करू शकतो. आणि तरीही, देवाच्या दैवी ज्ञाना मध्ये वाट पाहणे हे सामर्थ्यशाली होऊ शकते.
प्रार्थना व उपासने मध्ये परमेश्वराची वाट पाहणे हे समर्पणाचे कृत्य आहे जे आज्ञाधारकते मधून जन्म घेते. प्रार्थना व उपासने मध्ये वचनावर मनन करीत परमेश्वराची वाट पाहणे हे शरीराच्या इच्छेला संपवून टाकू शकते. पेंटेकॉस्टचा अनुभव करीत शिष्यांचे हे टीकात्मक भाष्य होते आणि आज सुद्धा हे तसेच आहे.
यशया ४०:३०-३१ मध्ये पवित्र शास्त्र सांगते, "तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत."
वाट पाहण्यासाठी इब्री शब्द हा "कवा" आहे-त्याचा शब्दशः अर्थ हा की वेळ घेणे, किंवा त्याच्या उपस्थिती मध्ये घुटमळणे व स्वतःला त्याच्याबरोबर एकरूप करून घेणे. हे मनोरंजक आहे की नाही! स्तोत्र २५:५ म्हणते, "तूं आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करितो."
येथे निश्चितपणे वाट पाहण्याच्या प्रक्रीयेमध्ये किंमत सामावलेली आहे आणि त्यामुळेच अनेक जणांना किंमत भरण्यास कठीण वाटते. परंतु जसे देवाच्या एका महान मनुष्याने एकदा म्हटले होते, "देवाला आज्ञाधारक समर्पण ही पात्रता किंमत आहे."
Bible Reading: Ezra 8-10
Prayer
परमेश्वरावर विसंबून राहीन व त्याच्या वचनावर मी माझी आशा धरून राहीन.
मी परमेश्वरावर विसंबून राहीन, व त्याच्या मार्गानुसार चालेन. भूमी वारशाने मिळविण्यासाठी तो मला श्रेष्ठ करेल.
Join our WhatsApp Channel

Most Read
● ख्रिस्ता द्वारे विजय मिळवणे● भावनात्मकदृष्टया वाहवत जाऊन बळी पडणे
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-३
● येशूला पाहण्याची इच्छा
● तुम्ही येशू कडे कसे पाहता?
● स्वप्ना मध्ये देवदूताचे प्रगट होणे
● आध्यात्मिक दरवाजे बंद करणे
Comments