हिंदी मराठी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us Contact us Listen on Spotify Listen on Spotify Download on the App StoreDownload iOS App Get it on Google Play Download Android App
 
Login
Online Giving
Login
  • Home
  • Events
  • Live
  • TV
  • NoahTube
  • Praises
  • News
  • Manna
  • Prayers
  • Confessions
  • Dreams
  • E-Books
  • Commentary
  • Obituaries
  • Oasis
  1. Home
  2. Daily Manna
  3. तुम्हांला एकासदुपदेशकाची का गरज लागते
Daily Manna

तुम्हांला एकासदुपदेशकाची का गरज लागते

Tuesday, 17th of June 2025
16 12 315
प्रभु येशूला माझा वैयक्तिक प्रभु व तारणारा स्वीकारल्यानंतर,मी एका आत्म्याने भरलेल्या चर्च ला जाऊ लागलो. उपासना संपल्यावर, तेथे मुलांचा एक लहान गट (तीनमुले होती)होता ज्यांनी मला चहा घेण्यासाठी बोलाविले.

जवळच्या हॉटेल मध्ये तेवेटर म्हणून काम करणारे होते. चहा घेताना आम्ही प्रभु बद्दल बोलत, व वचन सांगत असे. तसेच ते मला काही ख्रिस्ती पुस्तके देत असे जेव्हा त्यांना कळले की मला पुस्तके वाचण्यास आवडतात. आमची संगती अधिक वेळेची नसे (४५ मिनिटे). एके दिवशी, जेव्हा मी चर्च ला गेलो नाही, त्यांनी माझ्या शेजाऱ्यांच्या फोन वर मला बोलाविले. 

त्याने मला फार चांगले व आपलेसे असे वाटले.
पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते की:
"जसे लोखंड लोखंडाला धारधार करते, तसेच एक मनुष्य (सदुपदेशक) त्याच्या मित्राच्या विचारांस चालना देतो. (नीतिसूत्रे २७:१७)

आज चर्च ची एक दु:खद बाब ही, लोक चर्च ला येतात, व निघून जातात-कोणालाही एक-दुसऱ्याबरोबर भेटावे असे वाटत नाही, कोणालाही एक-दुसऱ्याच्या अधीन व्हावे हे नको आहे. 

परंतु तुम्ही पाहा, खरीप्रगती होते जेव्हा तुम्ही एक-दुसऱ्याच्या अधीन होता; जेव्हा तुम्ही कोणाला भेटता. मी देवाला धन्यवाद देतो की माझ्या पूर्वीच्या दिवसात आणि आज सुद्धा मी असे सतत करीत आहे.

अनेक वेळा विवाह लावण्याच्या विधीमध्ये पुढील वचन हे वापरले जाते. परंतु ह्या वचनाचे लागुकरण हे केवळ विवाह विधी पुरतेच मर्यादित नाही आणि ते सदुपदेश देण्यासाठी सुद्धा वापरले जाऊ शकते.

उपदेशक ४:९-१०
एकटयापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. 

मी विश्वास ठेवतो की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला एका सदुपदेशकाची गरज आहे. का, हे येथे दिले आहे?
#१ हे पवित्र शास्त्रानुसार आहे.
मोशे ने यहोशवाला सदुपदेश दिला. इथ्रो ने मोशे ला सदुपदेश दिला. नामी ने रुथ ला. एलीयास अलीशा होता. येशूने त्याच्या शिष्यांना सदुपदेश दिला. पौला ला तीमथ्यी होता. प्रेषित पौलाने स्वतः आम्हांला सांगतिले आहे की वडिलांनी पुढच्या पिढीला शिकवावे व सदुपदेश दयावा. (तीताला पत्र २)

#२ आपल्या सर्वांमध्ये काहीतरी कमतरता असते
व्याख्या द्वारे, "कमतरता" ही काहीतरी जे आपण पाहत नाही. 
म्हणजे, जर तुम्हाला काही कमतरता नाही, तर तुम्ही आत्ताच स्वीकारले आहे की ती तुम्हाला आहे. आपल्याला इतर कोणीतरी लागतो की आपल्या स्वतःला पूर्णपणे ओळखावे.

#३ लोक हे आपल्याला देवाचे बक्षीस आहेत.
कोणीतरी म्हटले आहे, "परमेश्वर जेव्हा आपल्याला बक्षीस देतो, तो ते एका व्यक्ति मध्ये लपेटून देतो." आपण बक्षीस ला मुकतो जेव्हा कोणीही आपल्या बाजूने चालत नाही की आपल्याला मार्गदर्शन दयावे व आपल्याला प्रोत्साहन दयावे.
हे आजच्या वेळेत सर्वात दुर्लक्षित सिद्धांत आहे. लाभ हे अमुल्य आहे आणि जीवनाच्या प्रवाहात जीवन सुरक्षितता पुरविते ज्यामध्ये फारच वादळे आहेत.

करुणा सदन येथे, आम्हाला काहीतरी म्हणजे जे-१२ पुढारी आहेत, जे मग पास्टर ला माहिती देतात, जे मग मला माहिती देतात. तुम्ही जेव्हा जे-१२ पुढारीच्या अधीन असता, हाव्यक्ति एक सदुपदेशक व एक साहाय्यक असे कार्य करतो जे आध्यात्मिक वाढीला कारणीभूत होते. अनेकांनी याची साक्ष दिली आहे.

जर तुम्ही करुणा सदन चा हिस्सा आहात, तर मग मी तुम्हाला अधिक प्रेरणा देतो कीकोणा एका पुढाऱ्याच्या अधीन राहा. 

जरतुम्हाला कोणा एका पुढाऱ्याच्या अधीन राहावयास आवडले, तर तुम्ही केएसएम ऑफिस ला फोन करू शकता. 

तसेच, जर तुम्ही इतर कोणा चर्च चा हिस्सा आहात, मी तुम्हाला प्रेरणा देतो की कोणालातरी शोधावे व ज्याच्या अधीन तुम्ही होऊ शकता. लाभ हे अमुल्य आहेत.

नातेसंबंधात सदुपदेश देणे हे सोपे नाही आणि त्यामध्ये कदाचित चढ-उतार असतील परंतु लक्षात ठेवा परमेश्वर ह्यासर्वांमध्ये कार्यरत आहे. (रोम ८:२८ वाचा.)

Bible Reading: Job 9-13
Prayer
(जर तुम्हाला सदुपदेशक नाही तर ही प्रार्थना करा.): पित्या, मला एक सदुपदेशक दे जो माझ्या जीवनात तुझी उपस्थिती व सत्य ओतणारा होईल.

(जर तुम्हाला सदुपदेशक आहे तर ही प्रार्थना करा.): पित्या, मी तुला ..........साठी धन्यवाद देतो. मी त्याच्यावर /तिच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर आशीर्वाद बोलतो. येशूच्या नांवात. आमेन.
[तुमच्या सदुपदेशक साठी नेहमी नियमितपणे प्रार्थना करा.]



Join our WhatsApp Channel


Most Read
● रागावर उपाय करणे
● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
● पाऊस पडत आहे
● अगापेप्रीति मध्ये वाढणे
● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
● तुमच्यासाठी हे बदलत आहे.
● अशी संकटे का?
Comments
CONTACT US
Phone: +91 8356956746
+91 9137395828
WhatsApp: +91 8356956746
Email: [email protected]
Address :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
GET APP
Download on the App Store
Get it on Google Play
JOIN MAILING LIST
EXPLORE
Events
Live
NoahTube
TV
Donation
Manna
Praises
Confessions
Dreams
Contact
© 2025 Karuna Sadan, India.
➤
Login
Please login to your NOAH account to Comment and Like content on this site.
Login