भिंत बांधण्यास प्रतिक्रिया: अडथळे
हे पाहून मी जासूद पाठवून त्यांस कळविले की, मी मोठया कामांत गुंतलो आहे; मला येण्याला सवड नाही; मी काम सोडून तुम्हांकडे का यावे, काम का बंद पाडावे? त्यांनी चार वेळा माझ्याकडे हाच निरोप पाठविला आणि मीही त्यांस असेच उत्तर दिले. (नहेम्या ६: ३-४)
जेव्हा तुम्ही काही निर्माण करीत आहात तेव्हा तडजोड करण्यासाठी शत्रूला भेटू नका. तुमची मुल्ये किंवा तुमच्या दृष्टांतावर तडजोड करण्यास तुम्हावर दबाव आणू शकतील.
"ओनो च्या सपाट" भागामध्ये ओनो हे बन्यामीन चे पवित्र शास्त्रातील नगर होते (१ इतिहास ८: १२, एज्रा २: ३३).
नहेम्यास यरुशलेम ची भिंत बांधण्यामध्ये अवरोध करण्यात अपयशी झाल्याने, सनबल्लट व तोबीया यांनी कपटनीति आखली आणि सोंग केले की त्यांना त्याच्याबरोबर संभाषण करावयाचे आहे, त्यांनी नहेम्यास ओनो येथे येण्याचे आमंत्रण केले. तथापि, परमेश्वराने कदाचित नहेम्यास प्रगट केले की त्यांचा हेतू हा चांगला नाही.
आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हांस भेवडावयास पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर. (नेहम्या ६: ९)
भय हे कार्य करण्याच्या तुमच्या निश्चयाला कमकुवत करेल. भय हे तुमच्या हाताला कमकुवत करेल. शत्रूचे हे डावपेच होते. त्यास काम थांबवायला पाहिजे.
प्रार्थना: आता, त्यामुळे, हे देवा माझा हात दृढ कर. (नहेम्या ६:९)
मी म्हणालो, माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही. (नहेम्या ६: ११)
त्यांना पाहिजे होते की त्याने चूक करावी म्हणजेत्याचे स्वतःचे लोक त्याच्या विरुद्ध होतील.
मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे, आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्यास त्यांनी मोल देऊन ठेविले होते. (नहेम्या ६: १३)
जेव्हा मोठे काम होत आहे तेव्हा शत्रूला पाहिजे की तुम्ही पाप करावे की मग कदाचित तेथे वाईट बातमी पसरेल ज्याद्वारे टीका आणि दोष लावता येईल.
म्हणूनअलुल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी म्हणजे बावन्न दिवसांच्या आत कोट बांधून झाला. (नहेम्या ६: १५)
जे इतके वर्ष करता आले नाही ते ५२ दिवसांच्याआंत केले गेले.
हेच घडते जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाच्या सिद्धांतानुसार चालता. वेगाचा आत्मा तुमच्यावर येतो की गोष्टी विजेच्या वेगाने पूर्ण करावे.
भिंत बांधण्यास प्रक्रिया: खोटे आरोप
पाचव्या वेळी सनबल्लटाने आपल्या चाकरांच्या हाती खुली चिठी देऊन मजकडे पाठविले; त्या चिठीत असे लिहिले होते की निरनिराळ्या राष्ट्रांत अशी बातमी उठली आहे आणि गेशेमही असेच म्हणत आहे की, तुझा व यहूदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे म्हणून तूं हा कोट बांधीत आहेस; या अफवेवरून असे दिसते की तूं त्यांचा राजा होऊ पाहत आहेस.
तूं यहूदा देशात राजा आहेस असे स्वतःविषयी यरुशलेमेत जाहीर करावे म्हणून तूं संदेष्ट्येही नेमिले आहेत; हे वर्तमान राजाच्या कानी जाणार, ह्याकरिता आता आपण एकत्र जमून वाटाघाट करू. (नहेम्या ६: ५-७)
जेव्हाकेव्हा तुम्ही परमेश्वरासाठी काहीतरी महान असे करण्याचा प्रयत्न करता, चहाडीचा आत्मा तुमच्या विरुद्ध येईल. त्यास तुम्हांला महान गोष्टी करण्यापासून अडथळा करू देऊ नका. प्रत्येक टिके ला यश हेच उत्तम उत्तर आहे.