कुमारी आपली भूषणे, नवरी आपला पोषाख विसरेल काय? तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत. (यिर्मया २: ३२)
वधू साठी तिची आभूषणे आणि पोषाख हेच काय तिला वधू ची ओळख देतात. ती त्यांस अधिक जपून ठेवते. कारण येथे त्यास विसरणे हे अस्वाभाविक असे आहे. इस्राएल चे परमेश्वराला विसरणे हे अस्वभावीक असे होते.
तरी पण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला, जीच्यांत हित नाही अशा गोष्टींशी केला आहे. (यिर्मया २: ११)
परराष्ट्रीय राष्ट्रे हे त्यांच्या दैवतांशी विश्वासयोग्य होती जरी त्या दैवतांनी त्यांच्यासाठी काहीही केलेले नव्हते. पण येथे इस्राएल ला तो सर्व गौरवाचा परमेश्वर होता ज्याने अगणित मार्गांनी त्यांसआशीर्वादित केले होते आणि तरीही ते त्याच्यापासून मागे फिरले होते.