तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हांबरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठायी कायआहे; म्हणून भिऊ नका. (हाग्गय २:५)
जुन्या करारानुसार पवित्र आत्मा हा लोकांसोबत होता. नवीन करारात तो देवाच्या लोकांमध्ये असेल.
कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा [त्याने आपल्याला आत्मा दिला आहे], प्रीतीचा व संयमनाचा [समर्थता जी शांत राहणे, संतुलित मन ठेवणे आणि आत्मसंयम बाळगणे]आत्मा दिला आहे. (२ तीमाथ्यी १:७)
प्रार्थना
माझे मंदिर [तुझ्या]गौरव व वैभवाने भर. (हाग्गय २:७)
'रूपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी या स्थळाला शांति देईन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. (हाग्गय २: ८-९)
जेव्हा परमेश्वर घोषित करतो की रूपे आणि सोने हे त्याचे आहे. तो सरळपणे त्याचे सर्वसत्ताधीशपण आहे हे सांगत आहे, आणि निर्माणकर्ता आणि सर्वांचा मालक ह्या नात्याने पृथ्वीचे सर्व स्त्रोत हे त्याचेच आहे.
स्तोत्रसंहिता ५०:१० मध्ये परमेश्वर घोषित करतो, "वनातील सर्व पशु, हजारो डोंगरावरील गुरेढोरे माझी आहेत."
स्तोत्रसंहिता २४:१ आपल्याला सांगते की, "पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे; जग व त्यांत राहणारे परमेश्वराचे आहेत."
वरील वचने ही अगदी स्पष्ट करतात की मनुष्यहा या पृथ्वीच्या स्त्रोताचा खरा मालक नाही परंतु केवळ देवाच्या स्त्रोत चा सांभाळणारा आहे.