मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले, त्याला चौघांनी उचलून आणिले होते. (मार्क २:३)
हे मध्यस्थी चे चित्र आहे. लोकांना प्रार्थने द्वारे येशू कडे आणणे.
हेभागीदारीचे चित्र आहे. आपले दान देणे, सेवा वगैरे द्वारे लोकांना येशू कडे आणणे.
त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. (मार्क २:५)
हे सांगत नाही की येशूने पक्षघाती माणसाचा विश्वास पाहिला, परंतु त्याने चार माणसांचा विश्वास पाहिला.
"होय, मनुष्य म्हणेल, तुला विश्वास आहे, आणि माझ्याकडे कार्ये: क्रीयावाचून तूं आपला विश्वास मला दाखीव, आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन" (याकोब २:१८)
परमेश्वर तुझा विश्वास पाहतो. तुझ्या विश्वासामुळे अनेक हे आशीर्वादित होतील. तुमचे कुटुंब आशीर्वादित होईल. लोक जे करुणा सदन सभेला येत आहेत ते आशीर्वादित होतील.
विश्वास हा येशू ख्रिस्ता द्वारे परमेश्वरा मध्ये आत्मविश्वास आहे. (मार्क२:५ ऐम्पलीफाईड)
मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. (मार्क २:५)
येशू येथे एक सामर्थ्यशालीसत्य प्रदर्शित करीत आहे की येथे आपल्या जीवनाच्या शारीरिक व भावनात्मक हिस्स्यामध्ये संबंध आहे. वास्तवात, डॉक्टरांनी आज हे मानले आहे कीक्षमा व स्वस्थते मध्ये एक मजबूत पकड आहे.
"हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नांवाचा धन्यवाद कर.
हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,
त्याचे सर्व उपकार विसरू नको;
तो तुझ्या सर्व दुष्कार्मांची क्षमा करितो;
तो तुझे सर्व रोग बरे करितो. (स्तोत्रसंहिता १०३: १-३)
आपल्या पापांची क्षमा व स्वस्थता हे जुळलेले आहे हे वरील वचनात दिसते
हा असे का बोलतो; हा दुर्भाषण करितो; एकावाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? (मार्क २:७)
परुशी हे असे म्हणण्यात बरोबर होते की कोणी मनुष्य पापांची क्षमा करू शकतनाही. येशू अगोदर किंवा नंतर कोणत्याही संदेष्ट्याने पापांची क्षमा करण्याचा दावा केला नव्हता किंवा तसे बोलले नव्हते- केवळ येशू अशा पद्धतीने बोलला.
येशूने स्पष्टपणे हा दावा केला कीपापांची क्षमा करण्याचे त्याच्याकडे सामर्थ्य आहे जसे त्याच्या स्वर्गीय पित्याने केले होते. हे स्पष्टपणे सिद्ध करते की येशू ख्रिस्त शरीरात परमेश्वर होता.
उपास
कोणीही जुना द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालीत नाहीत; घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो आणि बुधले बिघडतात; तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घालितात.
अनेक शतकांअगोदर, द्राक्षारस हा बाटली ऐवजी बुधलीमध्ये ठेवत असत. जेव्हाबुधले हे नवीन आहेत, तेव्हा ते नरम व वाढणारे असतात, परंतु जसे ते जुने होतात, ते कठीण होतात आणि अधिक वाढू शकत नाही. जर नवीन द्राक्षारस जुन्या बुधलीत ओतला, तर ते पात्र हे फुटू शकते आणि द्राक्षारसाचे नुकसान होऊ शकते.
उपास बुधली ला नवीन करते आणि मग परमेश्वर नवीन द्राक्षारस ओतू शकतो. उपास हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपल्या स्वतःला शिस्तबद्ध करतो. उपास हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपलाजुना स्वभाव टाकून देतो म्हणजे तो ख्रिस्ता बरोबर पुनरुत्थित व्हावा. उपास मध्ये, आपण आपले जुने बुधले टाकून देतो म्हणजे परमेश्वर नवीन चा उपयोग करू शकतो. आणि म्हणून आपण नवीन द्राक्षारसाने भरू शकतो: पवित्र आत्मा!
उपासा मध्ये, आपण आपले शरीर, आपले अंत:करण व आपले मन यांस शिस्तबद्ध करतो. आपण सर्व जण ख्रिस्ता द्वारे नवीन केले गेले पाहिजे, जसे स्वर्ग आणि पृथ्वी हे सुद्धा त्यामध्ये नवीन केले जातील. म्हणून आपण उपास करतो,आपल्या शरीराला केवळ शिस्तबद्ध करण्यास नाही परंतु आपल्याला सर्वांगीण शिस्तबद्ध करावे.
Chapters