तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. (इफिस २:१)
शारीरिक मृत्यू शिवाय, बायबल दुसऱ्या प्रकारच्या मृत्यू विषयी बोलते. यास आध्यात्मिक मृत्यू असे ओळखले जाते.
आध्यात्मिक मृत्यू काय आहे?
आध्यात्मिक मृत्यू हा जेव्हा व्यक्ति हा शारीरिकपणे जिवंत आहे, पण आध्यात्मिकदृष्टया मृत आहे. आपण सर्व जण ह्या जगात आध्यात्मिकदृष्टया मृत असे जन्मलो आहोत, देवापासून दूर असे.
आध्यात्मिकदृष्टया मृत असण्याची उदाहरणे
उधळा पुत्र आध्यात्मिकदृष्टया मृत होता.
तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे. (लूक १५:३२)
आध्यात्मिकदृष्टया मृत असण्याविषयी पौलाने लिहिले
मी नियमशास्त्राविरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. (रोम ७:९)
आध्यात्मिकदृष्टया मृत असण्याविषयी पौलाने लिहिले
परमेश्वराने आदामाला म्हटले
पण बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तूं खाशील त्या दिवशी तूं खास मरशील. (उत्पत्ति २:१७)
आदाम व हव्वा आध्यात्मिकदृष्टया मृत झाले जेव्हा त्यांनी पाप केले
आपण आपले प्रथम आई-वडील-आदाम व हव्वा कडून आपला पतित स्वभाव वारशाने घेतो. सर्व मानव जे ह्या जगामध्ये जन्मले आहेत ते त्यांच्या ह्या वारशाने मिळविलेल्या पापमय स्वभावा द्वारे जन्मले आहेत (यामध्ये केवळ एकच अपवाद हा प्रभु येशू जो ह्या जगात पापरहित असा जन्मला). म्हणून, आपण प्रत्येक जण ह्या जगात देवापासून आध्यात्मिकदृष्टया दूर झालेले असे येतो.