english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बायबल भाष्य
  3. अध्याय ४
बायबल भाष्य

अध्याय ४

Book / 49 / 1415 chapter - 1
1210
म्हणून प्रियजनहो, जे तुम्ही माझा आनंदव मुकुट आहा, त्या माझ्या प्रिय बंधुंनो,  तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. (फिलिप्पै ४:१)

लोकांसाठी चार शीर्षक
१.प्रियजनहो
२. अनेक वर्षांपासून बंधु
३.माझा आनंद
४. माझा मुकुट

कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करू आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंत:करणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. (फिलिप्पै ४: ६-७)

न्यू लिविंग भाषांतर फार सुंदररित्या त्यास व्यक्त करते
कशाविषयीही चिंता करू नका; त्याऐवजी सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करा. तुम्हाला काय गरज आहे ते देवाला सांगा, आणि त्याने जे सर्व काही केले आहे त्यासाठी त्याचा धन्यवाद करा. 

मग तुम्ही देवाची शांति अनुभव कराल; जी आपण जे काही समजतो त्याच्याही पलीकडे जाते. जेव्हा तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये राहता तेव्हा त्याची शांति तुमचेअंत:करण वमनाचे रक्षण करेल.(फिलिप्पै ४: ६-७)

जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा शांति ही केवळ शैक्षणिक विषयापेक्षा अधिक होते, त्याचीशांति ही प्रत्यक्षता होते आणि आपल्या सत्वाच्या प्रत्येक मज्जातंतूमधून आरपार जाते. एक बहुमुल्य बक्षीस हे प्राप्त केले जाऊ शकते आणि मग त्यासाठी आपल्याला धन्यवाद हा दिलाच पाहिजे.

हीशांति आपलेअंत:करण वमनावर रक्षण करणारी सुद्धा होते. अगोदर जे आपल्याला अधिक चीडीस आणीत असे ते आता तसे करणार नाही. हे संरक्षक फारच दक्ष आहे आणि स्वाभाविक विचार व भितीस आपल्या जीवनात स्थिर होण्यापासून रोखते.

बंधुंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सदगुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.(फिलिप्पै ४: ८)

मनन करणे हे सहज येणाऱ्या विचारांपेक्षा अधिकअसे आहे. ते गरम पाण्याच्या कप मध्ये चहाच्या पावडरच्या पुडी सारखे आहे. ती पुडी पाण्यात जाते- पाणी हे तेव्हा अजूनही स्वच्छ आहे, हळूहळू जेव्हा त्या पुडी मधील पावडर त्या पाण्यात मिसळू लागते-ते पाण्याचा रंग बदलू लागते.

जेव्हा तुम्ही निश्चिंत आहात तेव्हा तुम्ही जे बोलता ते तुमच्या हृदयात काय आहे ते समजण्याचे योग्य मापदंड आहे (मत्तय १२:३४). जसे तुमच्या शरीराला व्यायामाची गरज आहे तशी तुमच्या मनाला सुद्धा कार्यरत करण्याची गरज आहे. तुमच्या मनाला कार्यरत करण्यासाठी, तुम्हीत्या गोष्टींवर विचार(मनन)केला पाहिजेज्या प्रशंसनीय व सत्य आहेत जे तुमच्या मनाला चालना देतात.

येथे काही लोक आहेत जे केवळ नकारात्मक गोष्टींवर विचार करण्याकडे ओढले जातात, सर्व गोष्टींविषयी ते शंकात्मक असण्याचे निवडतात. आपल्याविचारांनी आपल्या कृतीला मार्गदर्शन केले पाहिजे.

तुम्ही तुमच्या मनात काय भरता हे तुमच्या स्वतःच्या मनाच्या निवडीचा विषय आहे. देवाच्या सत्याच्या विलक्षण गोष्टींवर विचार करण्याचे निवडा, आणि मग ते तुमच्यात प्रशंसनीय चरित्र निर्माण करेल जे देवाला गौरव व आदर आणते.

माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, व माझे जे ऐकले, पाहिले ते आचरीत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील. (फिलिप्पै ४:९)

प्रेषित पौल फिलिप्पै येथील लोकांना विचार कसा करावयाचा हे सांगितल्यावर, तो त्यांना सांगतो की कसे जगावे. परंतु तो तसे करतो जसे जो ते सिद्धपणे समजतो की ते उद्धीष्ट्ये किती कठीण असे आहे.

तो त्या आई-वडिलांप्रमाणे नाही जे म्हणतात, "मी जे सांगितले आहे ते करा"

त्याऐवजी तो म्हणतो, "मी जसे करीत आहे तसे करा"

कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रेषित पौलाने सांगितल्या, ज्या आपण केल्या पाहिजेत:
१.गोष्टी ज्या शिकल्या
२. गोष्टी ज्या प्राप्त केल्या
३. गोष्टी ज्या ऐकल्या
४. गोष्टी ज्या माझ्यामध्ये पाहिल्या

मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. (फिलिप्पै ४: १३)

फिलिप्पै ४: १३ हे म्हणत नाही की तुम्ही काहीही करू शकता जे तुम्हाला करावयास वाटते.

माझ्यापाशी सर्वकाहीआहे व ते विपुल आहे, एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे; तेजणु काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. (फिलिप्पै ४: १८)
१. जणु काय सुगंध
२. देवाला मान्य
३.संतोषकारक यज्ञ
तीन सुगंध जे देवाला अत्यंत आवडतात.

१. आपल्या देण्याचा सुगंध
ज्यागोष्टी तुमच्याकडून पाठविल्या गेल्या. फिलिप्पै येथील लोकांनी उदारपणे पौलाच्या गरजेसाठी दाने दिली आणि ते देवासाठी सुगंध देणारे होते.

२. आपल्या साक्षीचा सुगंध
२ करिंथ २:१४, १६
परंतु दुर्दैवाने, प्रत्येक जणांस सत्याचा हा सुगंध आवडत नाही, जरी जे सौम्यतेने व भिडस्तपणे म्हटले जाते, जसे ते म्हटले गेले पाहिजे (१ पेत्र ३:१५). जेव्हा आपली साक्ष ही नेहमीच ख्रिस्ताचा सुगंध पसरविते, ते त्याच्या ग्रहण करणाऱ्याद्वारे तसेच सुगंधित असे स्वीकारले जात नाही. त्यांच्यासाठी ज्यांचे तारण झाले आहे, सार्वकालिक जीवनाचे हे आवडते सुगंध आहे, परंतु ज्यांचा नाश होत आहे, त्यांच्यासाठी सार्वकालिक मृत्यूचा कडूदुर्गंध असे आहे.

३. आपल्या प्रीतीचा सुगंध
आणि ख्रिस्ताने तुम्हांवर प्रीति केली, आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. (इफिस ५:२)

प्रीतीने चाला, ख्रिस्ताप्रमाणे,-ते प्रीतीचे प्रमाण आहे जे आपल्यासाठी स्थिर केले गेले आहे. आपण तडजोड द्वारे आपली प्रतिष्ठा कमी करण्याचे धैर्य करू नये.

जरी जेव्हा आपल्याला इतरांसाठी मरण्यास कदाचित बोलाविले जाणार नाही, तरी आपल्याला निश्चितपणे ह्यासाठी बोलाविले गेले आहे की आपल्या स्वतःच्या भावनात्मक व शारीरिकत्यागा द्वारे ख्रिस्ताचे दु:ख व अर्पण प्रदर्शित करावे.

हे तेव्हाच जेव्हा आपण ख्रिस्ताला अशा प्रकारे अनुभवितो, की आपण सुद्धा देवा साठी एक सुगंधित अर्पण होतो.

माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील. आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. (फिलिप्पै ४: १९-२०)

सर्वात मोठीआपलीएक चिंता ही आपल्या गरजेंसाठी पुरवठा करण्याच्या समर्थते विषयी राहते. प्रभूने हे आश्वासन दिले आहे हे म्हणत, "माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील."

परमेश्वराने आपल्या गरजा पुरविण्याचे आश्वासन दिले आहे, आपले लोभ नाही. अनेक जण देवाला बाटली मधील भूत असे करण्याचा प्रयत्न करतात.

Join our WhatsApp Channel

Chapters
  • अध्याय १
  • अध्याय २
  • अध्याय ३
  • अध्याय ४
मागील
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन