देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधु तीमथ्य ह्यांच्याकडून(कलस्सै १:१)
पौलाच्यातेरा पत्रांमधून नऊ पत्रांमध्ये, त्याने स्वतःला 'प्रेषित' म्हणूनसंबोधले आहे. पौलाने प्रेषित म्हणवून घेण्याचे किंवा हा सन्मान स्वतःला लावून घ्यावाम्हणूनस्वतःहून पाहिले नाही. तरतारणारा व पुनरुत्थित प्रभु -येशू ख्रिस्ता कडून प्रेषित म्हणून आदेश प्राप्त केला आहे. (प्रेषित ९:३-६)
देव आपला पिता ह्याच्यापासून तुम्हांस कृपा व शांति असो.
लक्षात घ्या की सर्व कृपा व शांतीचे स्त्रोत हा आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्त आहे.
ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरीलप्रीति विषयी आम्ही ऐकतो. (कलस्सै १:४)
कलस्सै येथील लोकांचा विश्वास व सर्वपवित्र जनांवरील त्यांच्या प्रीति विषयी पौलाने कोठून ऐकले.(कलस्सै १:७ )
आपल्याला सांगते की हा तो एपफ्रास होता ज्याने ही माहिती पौलाला सांगितली.
ही सुवार्ता तुम्हांकडे येऊन पोहचली आहे; तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली, त्या दिवसापासून जशी तुम्हांमध्ये आहे. (कलस्सै १:६)
खरी सुवार्ता ही जेव्हा सांगतात व प्राप्त करतात ती नेहमीच फळ आणते. फळ जे बदललेल्या जीवनात दिसते. (रोम १:१३)
त्याने आत्म्यामध्ये तुझ्या प्रीतीविषयी आम्हांला सुद्धाघोषित केले आहे (कलस्सै १:८)
कलस्सै येथील लोक पौलाला कधीही भेटलेले नव्हते तरीही त्यांनी त्याजवर प्रीति केली. हीप्रीति ही"आत्म्यामध्ये" होती.
तसे म्हणण्याचा माझा अर्थ काय आहे? प्रभु पौलाला ओळखत होता आणि त्याजवर प्रीति केली होती आणिकलस्सै येथील लोकांमधील पवित्र आत्मा ती प्रीति पौला प्रति मोकळी करीत होता.
उदाहरणार्थ: येथे आपल्यापैकी अनेक आहेत जे देवाच्या पुरुष व स्त्रीयांवर प्रीति करतात आणि मनोरंजक गोष्ट ही आहे की आपण त्यांना कधीही व्यक्तिगत भेटलेलो नसतो.
ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुम्हांसाठीखंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धि ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. (कलस्सै १:९)
ज्ञान साठी ग्रीक शब्द हा "सोफिया" आहे. ज्ञान हे केवळ बुद्धि पेक्षा जास्त आहे; हे बुद्धीला पद्धतशीर वापरण्याची योग्यता आहे.
ग्रीक शब्द, "सुनेसीस" हा"समज" असा भाषांतरित केला आहे.
आपली सुखवसुविधा पूर्णपणे वापरण्यासाठी,ज्ञान व समज एकत्र कार्य करण्याची गरज आहे.
अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ दयावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धि व्हावी.(कलस्सै १:१०)
वचनानुसार"चाला" हे अनेक वेळाप्रतीकात्मक म्हटले गेले आहे की आचरण किंवा जीवनशैली विषयी एक पद्धत दर्शवावी.
त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. (कलस्सै १:१३)
त्या पुत्राच्या ठायी, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ति म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. (कलस्सै १:१४)
जेव्हा अगोदरच आपल्याला "अंधाराच्या सत्तेतून" मुक्त केलेले आहे, सैतानाला आपल्यावर काहीही प्रत्यक्ष सत्ता नाही. त्याचे केवळ शस्त्र हे खोटेपण, फसवणूक आणि धमकाविणे आहे.
परमेश्वराने आपल्याला स्वतःकरिता बनविले आहे, परंतु आपण स्वतःला दुष्टाच्या बंधनात देतो. परमेश्वराने प्रभु येशू ख्रिस्ताच्या अनमोल रक्ता द्वारे आपल्याला पुन्हा आणले आहे. परमेश्वराने हे जुन्या करारात संदेष्टा होशेय च्या द्वारे उदाहरणाने स्पष्ट केले आहे. (होशेय१:२-३; आणि ३:२)
ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे उद्धार हा पुरविला गेला आहे. कोणतेही मानवी प्रयत्न किंवा मानवाची स्वतःची धार्मिकता ही दैवी कृपा आणू शकत होते ज्याची आपल्याला गरज होती. त्यामुळे, ख्रिस्ताचे रक्त आपल्या पापाच्या खंडणी करिता दैवी पुरवठ्याचे बक्षीस होते.
तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तित ज्येष्ठ आहे. (कलस्सै १:१५)
तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे
हे ते भौतिक स्तरात नाही की येशू हा देवाचे प्रतिरूप आहे.
येशूचे शारीरिक शरीर हे स्पष्ट होते. संदेष्टा यशया ने हे स्पष्टपणे उल्लेखले आहे की येशू मध्ये काही सुंदरता नव्हती ज्याची आपण इच्छा करावी. (यशया ५३:२)
प्रेषित पौलाने फिलिप्पै २:७ मध्ये म्हटले आहे, की येशूचे शारीरिकशरीर हे मनुष्याच्या स्वरूपात घडविले होते. प्रभु येशूने कृती, स्वभाव व चारीत्र्यामध्ये पित्याला पूर्णपणे सादर केले होते. येशूने म्हटले, "ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे" (योहान १४:९). येशूने पित्याच्या अंत:करणाची प्रत्यक्ष प्रतिमा (इब्री १:३)आपल्याला दिली.
तो सर्व उत्पत्तित ज्येष्ठ आहे
येथे काही लोक आहेत जे यावर सहमत आहेत की ज्येष्ठ म्हणजे येशू हा देवाच्या सृष्टि निर्माण मधील प्रथम होता. याचा अर्थ हा होतो काय की येशू हा निर्मित केलेला सत्व आहे?
कलस्सै मधील उताऱ्यात येशू हा ज्येष्ठ आहे या कल्पनेचा अर्थ हा की तो सृष्टि मध्येअगोदरच अस्तित्वात आहे आणि तो सृष्ट सत्व असा नाही. वचने जी पुढे आहेत त्यावरून हे आपण पाहू शकतो.
कारण आकाशांत व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. (कलस्सै १:१६-१७)
येशू हा स्पष्टपणे सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे आणि मग तर्कसंगत म्हटल्यासतो पहिली सृष्ट वस्तू बनविली आहे असे असू शकला नसता.
येशूला मृत्युमधून प्रथम जन्मलेला असे देखील म्हटले आहे.
लाजरस आणि अनेकांना मृत्युमधून उठविले गेले होते परंतु ते पुन्हा मरण पावले. येशू हा युगा मध्ये प्रथम व्यक्ति होता जो मृतामधून जिवंत झाला आणि पुन्हा कधीही न मरण्यास.
मी मेलो होतो, तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. (प्रकटीकरण १:१८)