प्रियबंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिति व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करितो.
(३ योहान २)
योहान प्रार्थना करीत आहे कीगायस चे शारीरिक आरोग्य त्याच्या आध्यात्मिक आरोग्य सारखे व्हावे. परमेश्वर आपले शारीरक [त्याने आपल्या शरीराला प्रतिकारशक्ती दिली आहे]आरोग्य तसेच आत्म्याच्या आरोग्या [भावनात्मक व आध्यात्मिक स्वास्थ्य] विषयी काळजी करतो.
जर तू इतका दयाळू असशील, तर त्यांना त्यांच्या मार्गावर बक्षीस सह पाठीव, अशा रीतीने की त्याने देवाचा आदर करावा. (३ योहान ६)
तुमच्या बक्षिसाने देवाचा आदर केला पाहिजे.
मी तुला अगोदरच ह्याविषयी लिहिले होते,परंतु दियत्रफेस जोअग्रगण्य होण्याची आणि तुमच्यामध्ये प्रथम असा ओळखला जावा म्हणून लालसा धरतो, तो आमचा अधिकार स्वीकार करीत नाही. (३ योहान ९)
हे हरविलेल्या पत्राचा संदर्भ देते, शक्यतोदियत्रफेस द्वारे नष्ट केले गेले असावे. म्हणून पत्र जे आपल्याकडे आहे ते प्रत्यक्षात योहान ४ आहे.
तुम्ही कोणाचे अनुकरण करीत आहात?
प्रिय बंधो, वाईटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. (३ योहान ११)
कोणी म्हटले आहे, "अनुकरण करणे हे खुशामत करण्याचा प्रामाणिक प्रकार आहे."
आपण सर्व जण जे लोक आपल्या सभोवती आहेत त्यांचे काही प्रमाणात अनुकरण करीत असतो. जेव्हा आपण लोकांच्या सभोवती असतो, ते ज्या गोष्टी करतात, त्या आपण शिकतो. शब्दजे ते बोलतात, वस्त्रे ते घालतात, त्यांची वागणूक असे काहीही असू शकते, तसेच जीवनाच्या मोठया गोष्टींशी जसे ज्यापद्धतीने ते पैशाची व्यवस्था करतात किंवा त्यांच्या कुटुंबाला मार्गदर्शन करतात.
अनुकरण करणे ही वाईट गोष्ट होते जेव्हा आपण जे देवाच्या वचनाच्या कक्षाच्या बाहेर आहे त्याचे अनुकरण करण्याची वृत्ती ठेवतो.
इस्राएली लोकांनी जेव्हा परराष्ट्रीयांच्या अमंगळ आचरणाचे अनुकरण करण्यास सुरुवात केली, ज्यांस परमेश्वराने इस्राएली लोकांना तो देश देण्याअगोदर तेथून घालवून दिले होते (१ राजे १४:२४). हेच तर कारण होते की त्यांना अनेक संकटातून जावे लागले. "त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले, त्यांचे अनुकरण करू नका, ही देवाची आज्ञा मोडली होती. (२ राजे १७:१५)
तथापि, पवित्र शास्त्र आपल्याला हे सुद्धा सांगते की, अनुकरण करणे ही चांगली गोष्ट आहे, जेव्हा जे चांगले आहे त्याचे आपण अनुकरण करतो.
पौल, जो प्रेषित त्याने करिंथ येथील मंडळीला लिहिले, "जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा." (१ करिंथ ११:१)
तुमच्या जीवनात काही भाग आहे काय ज्यामध्ये तुम्हांला बदल व्हावा याची अत्यावश्यकता आहे? तुम्हाला तुमचे आई-वडील असणे यात प्राविण्य मिळवावयाचे, तुमचे आध्यात्मिक जीवन कसे प्रबळ करावे हे शिकावे, कार्ये कशी करावी हे शिकावे हे असू शकते? देवाची सेवा करण्यास तुम्हाला अधिक उत्तम असे बनण्याची किंवा काही वाद्य वाजविण्यास शिकावे याची गरज आहे काय? विषय काहीही असो,सभोवतालच्यालोकांकडे पाहा जे देवाच्या मागे चालत आहेत आणि ते त्या विशेष भागात तुमच्यापेक्षा उत्तम असे आहेत ज्यामध्ये तुम्हाला बदल हा करावा वाटतो.
म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे. (इब्री ६:१२)
आपल्याला देवाचे अनुकरण केले पाहिजे.
तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचेअनुकरण करणारे व्हा. (इफिस ५:१)
प्रार्थना:
स्वर्गातील पित्या, मला संपन्न करण्यासाठी तुझ्या योजना, मला आशा व भविष्य देण्यासाठी तुझ्या योजनांसाठी मी तुझा धन्यवाद करतो. चांगली उदाहरणे ओळखावी व त्यांचे अनुकरण करण्यासाठी मला कृपा करून साहाय्य कर म्हणजे जे तू माझ्यासाठी उत्तम असे ठेवले आहे त्याचा मी अनुभव करावा. येशूच्या नांवात, आमेन.
Join our WhatsApp Channel
Chapters