आज तूं मजकडून गेलास म्हणजे बन्यामिनी प्रदेशाच्या सीमेवर सेल्सह येथे राहेलीच्या थडग्याजवळ तुला दोन पुरुष भेटतील. (१ शमुवेल १०: २)
आज राहेलीची कबर ही बेथलेहेमच्या उत्तरी मार्ग यरुशलेम-हेब्रोन येथे आहे.
हा बन्यामीन चा भाग होता.
मग देवाच्या टेकडीपाशी पोहोचशील, तेथे पलिष्ट्यांचा चौकीपहारा आहे; तूं तेथे नगराजवळ पोहचल्यावर संदेष्ट्यांचा एकसमुदाय उच्च स्थानाहून उतरून येतांना तुला भेटेल, त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील; व ते भाषण करीत असतील. (१ शमुवेल१०: ५)
संगीत आणि भविष्यवाणी हे खोलवर जुळलेले आहेत.
उपासना आणि भविष्यवाणी हे खोलवर मिसळलेले आहेत.
नीतिसूत्रे १३: २० आपल्यालासुचना देते की, सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खाचा सोबती कष्ट पावतो.
संदेष्टा शमुवेल ने शौल ला हे म्हणत भविष्यवाणी केली, "तेव्हापरमेश्वराचा आत्मा तुजवरजोराने येईल व तुही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यांत बदल होऊन तूं निराळा मनुष्य होशील."(१ शमुवेल१०: ६)
ते टेकडीपाशी आले तेव्हा, पाहा, संदेष्ट्यांचा एक समुदाय त्याला भेटला; आणि देवाचा आत्मा त्याजवर जोराने आला व तो त्यांच्याबरोबर भाषण करू लागला. जे लोक त्याला पूर्वीपासून ओळखीत होते त्यांनी जेव्हा पाहिले की हा संदेष्ट्यांबरोबर भाषण करीत आहे तेव्हा ते आपसांत म्हणू लागले, किशाच्या पुत्राला काय झाले? शौल हाही संदेष्ट्यांपैकी आहे काय?(१ शमुवेल१०: १०-११)
शौल हा केवळ एक साधारण बन्यामिनी होता, परंतु जेव्हा तो संदेष्ट्यांच्या एका गटाच्या संपर्कात आला, काहीतरी अद्भुत घडले. भविष्यात्मक अभिषेक शौला वर आला आणि तो सुद्धा इतर संदेष्ट्याप्रमाणे संदेश देऊ लागला. येथे एक मुख्य सिद्धांत आहे. हे संगती मध्ये राहण्याद्वारे अभिषेक हा एकापासून दुसऱ्याला देता येतो.
शौल आपल्या काकास म्हणाला, गाढवे सापडली आहेत असे त्याने आम्हांस कळविले. शमुवेलाने राजपदाविषयी जे काही सांगितले होते त्या संबंधाने त्याने त्याला काहीएक कळविले नाही.(१ शमुवेल१०: १६)
संदेष्टा शमुवेल ने त्यास जेसांगितले होते ते न सांगून शौला ने ज्ञानी पणा दाखविला.
योसेफ प्रमाणे नाही ज्याने त्या स्वप्ना विषयी त्याच्या भावांना सांगितले जे परमेश्वराने त्यास दाखविले होते. ह्याने त्यास मोठया संकटात टाकले. तुमचे स्वप्न प्रत्येकाला सांगू नका. प्रत्येक जण हा तुमचा मित्र नाही आहे.
शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला व ज्या सैनिकांच्या मनास देवाकडून स्फूर्ति झाली ते त्याच्याबरोबर गेले.(१ शमुवेल१०: २६)
हे तेव्हाच जेव्हा परमेश्वर लोकांच्या हृदयास स्पर्श करतो तेव्हा ते तुम्हांला साहाय्य करतील.
Chapters