जीवन हा धडा आहे, आणि नेहमीच आपल्याला काहीतरी शिकण्यासारखे आहे. एका ज्ञानी मनुष्याने एकदा म्हटले होते की जेव्हा आपण शिकणे थांबवितो, आपण मरू लागतो. "माझ्या मुला, ज्ञानाची वचने सोडून भटकावयाचे असले तर शिक्षण घेणे सोडून दे" (नीतिसूत्रे १९:२७). आपल्याला तेवढेच समजते जितके आपण शिकण्यास तयार असतो, आणि जेव्हा आपण शिकणे थांबवितो, आपण जमा झालेल्या पाण्यासारखे होतो ज्यामध्ये जंतू वाढतात आणि दुर्गंधी येते.
शिकणे आपल्याला प्रबुद्ध होण्यास मदत करते आणि समाजाशी आपला संपर्क वाढविते. हे प्रभावित करण्यासाठी देखील एक मुख्य साधन आहे. परंतु तुम्हाला ठाऊक आहे काय की शिकण्यात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे?- तो अहंकार आहे. शिकण्यासाठी नम्र व्हावे लागते. ते जे नम्र आहेत त्यांनाच केवळ देव शिकवितो. "परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांस सन्मार्ग दाखवितो. तो नम्र जनांस न्यायपथाला लावितो. तो दीनांस आपला मार्ग शिकवितो." (स्तोत्र. २५:८-९)
अनेकदा, देव पाप्यांना अशा मार्गांनी सुचना देतो, परंतु जे स्वयं-नीतिमान आहेत त्यांच्याकडे तो लक्ष देत नाही. यामुळेच त्याने परुशी व सदुकी लोकांकडे दुर्लक्ष केले आणि वेश्या व कर वसूल करणाऱ्यांना उपदेश दिला.
नम्र व्यक्ति त्यांच्या मर्यादा ओळखतात आणि हे समजतात येथे शिकण्यासाठी बरेच काही आहे. नवीन माहिती व अनुभवांसाठी हा मोकळेपणा वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी आवश्यक आहे.
याउलट, ते जे विश्वास ठेवतात की त्यांना अगोदरच सर्व काही ठाऊक आहे ते नवीन कल्पना व शिकण्याच्या संधींसाठी तयार नसतात. अशा प्रकारची विचारसरणी ही सतत अहंकारद्वारे प्रेरित असते, ज्यास स्वतःला महत्त्व देण्याच्या चुकीच्या भावनेचा विचार असे म्हटले जाऊ शकते. १ करिंथ. ८:२ मध्ये बायबल म्हणते, "जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अदयाप कळत नाही.
तुम्ही कदाचित ३० वर्षांपासून किंवा जास्त वर्षांपासून व्यवसायिक व्यक्ति असाल, परंतु हे वचन आपल्याला सांगते की नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यासारखे आहे. नेहमीच काहीतरी नवीन असते जी देवाची इच्छा आहे की प्रगट करावे.
मागे कधीकाळी, मी श्रीलंका देशात होतो, आणि मी देवाच्या या अद्भुत माणसाच्या चर्चला गेलो होतो. त्याने मला माईक दिला आणि म्हणाला, "पास्टर, कृपा करून चर्चला उपदेश दया." मला आश्चर्य वाटले, कारण मी खरेच त्याची अपेक्षा केली नव्हती. अचानकपणे, पवित्र आत्म्याने मला हळुवारपणे म्हटले, "बोल, की मी देवाच्या माणसाकडून शिकण्यासाठी आलो आहे." जर तुम्ही अगोदरच भविष्यात्मक स्पर्शामध्ये वाटचाल करीत आहात, तर इतर कोणाकडूनतरी नेहमीच काहीतरी शिकण्यासारखे आहे जो भविष्यात्मक स्पर्शामध्ये चालत आहे.
कोणताही देवाचा माणूस, कोणतेही सेवाकार्य, कोणतेही चर्च, आणि कोणताही व्यवसाय परिपूर्ण नाही, परंतु जर तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवला आणि शिकण्याची वृत्ति ठेवली, तर तुम्ही एका नवीन पातळीवर जाल. रोम. ११:३३ मध्ये बायबल म्हणते, "अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!"
अहंकार आपल्याला इतके भरून टाकतो की देवापासून प्राप्त करण्यास जागा नसते. एक माणूस ज्यास अहंकार आहे तो एका कप सारखा आहे जे पाण्याने भरलेले आहे; त्यामध्ये पाण्याचा कोणताही थेंब जो पडतो, तो जमिनीवर पडतो. अशा व्यक्तीला देव नवीन गोष्टी प्रगट करणे आणि त्याबरोबर संभाषण करू शकत नाही. देव गोष्टी मोकळ्या करतो, परंतु तुम्ही इतके भरलेले आहात की त्याच्यापासून काहीही प्राप्त करत नाही.
स्वयं प्रभु येशू देखील त्याच्या समयात त्याच्या शिक्षकांपासून शिकण्यास अगदी सुरुवातीपासून तयार होता. लूक २:४६ म्हणते, "मग असे झाले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना [मरीया आणि योसेफ] मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्न करताना सापडला."
लक्षात घ्या, येशू ऐकत व विचारत होता. ऐकणे हे नम्रता आणि शिकण्याचा पुरावा आहे. होय, तो परमेश्वर आहे ज्यास सर्व गोष्टींचे परिपूर्ण ज्ञान आहे. त्यास काहीही शिकण्याची गरज नाही आणि तो काहीही विसरला नाही, परंतु एक मनुष्य म्हणून, तो कोण होता हे त्याने बाजूला ठेवले आणि शिकले. लूक २:५२ मध्ये, बायबल म्हणते, "येशू ज्ञानाने व शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला." हे येशूचे सतत शिकणे आणि व्यक्तिगत विकासाला दर्शविते.
व्यवस्थापक म्हणून, उद्योजक म्हणून, तुम्हांला एक चांगले ऐकणारे असण्याची गरज आहे. तुमचे उत्पादन किंवा सेवेसंबंधी तुम्हांला त्यावरील प्रतिक्रिया स्वीकारण्याची गरज आहे नाहीतर तुम्ही फारच थोडया वेळाकरिता केवळ बाजाराचा एक पुढारी होऊन राहाल.
जेव्हा येशू एक शिक्षक म्हणून वाढला, तेव्हा त्याने मत्तय ११:२८-३० मध्ये म्हटले, "अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे."
जर तुम्ही ही वचनें काळजीपूर्वक वाचली, तर तुम्ही हे पाहाल की येशूचे प्रमुख आमंत्रण हे आपल्यासाठी आहे की त्याच्या मार्गानुसार शिकावे. तो आला की आपल्याला राज्याचा मार्ग दाखवावा आणि त्याने ताबडतोब त्यासाठी आवश्यकता गोष्टी सांगितल्या, शिकण्यासाठी तुम्हाला माझ्यासारखे नम्र झाले पाहिजे" येशू म्हणाला तो नम्र आहे, याचा अर्थ कोणत्याही अहंकारी व्यक्तिला त्याच्या वर्गात प्रवेश मिळू शकत नाही. शिष्य त्याच्याबरोबर जवळजवळ तिने वर्षे होते, देवाच्या राज्याच्या मार्गाविषयी शिकत होते कारण त्यांनी स्वतःला त्याच्या पुढारीपणास सोपविले होते. येशूने त्याचे सेवाकार्य सुरु करण्याअगोदर त्यापैकी काही जण त्यास ओळखत होते आणि तरीही त्यांनी त्यांचा अहंकार व घमंड सोडून दिला म्हणजे ते शिकू शिकतील कि अगदीच जवळच्या काळात प्रेषित होण्याकरिता काय करावे लागते.
अहंकारामुळे एखादयाला अति आत्मविश्वास आणि अजिंक्य वाटू शकते, ज्यामुळे ते स्वतःच्या असुरक्षेस कमी लेखतात. तथापि, अहंकाराने प्रेरित आत्मविश्वास हा नेहमीच कमकुवत असतो आणि अगदी लहानशी आव्हाने किंवा टीकेने देखील सहजपणे विस्कळीत होऊ शकतो. दुसऱ्या शब्दात, अहंकार हा शस्त्रांचा पोषाख आहे जो स्टीलसारखा दिसू शकतो परंतु प्रत्यक्षात तो कागदाने बनविलेला असतो. जरी ते सामर्थ्य व संरक्षणाचे स्वरूप देऊ शकते, तरी त्यात सहजपणे शिरकाव करू शकतात आणि ते घालणाऱ्यास नुकसान होण्याइतके कमकुवत करू शकतात.
जेव्हा आपण आपल्या शक्तीने अहंकारामध्ये असतो, असे होऊ शकते की आपण सुधारण्यासाठी प्रयत्न थांबवू शकतो आणि स्थिर होऊ शकतो. हे शेवटी आपल्या क्षमतेमध्ये घसरण आणि शक्ती गमाविण्याकडे नेऊ शकते. त्याचप्रमाणे, आपल्या आध्यात्मिकतेमध्ये अहंकार आपल्या विश्वासात सतत वाढणारे आणि नम्र होण्याऐवजी इतरांप्रती अनीतिमान आणि दोष दाखविणारे व्हावे याकडे नेऊ शकते.
अनेक कारणांपैकी एक कारण हे आहे की आपण ख्रिस्तासाठी लोकांकडे जात नाहीत कारण आपण हा आध्यात्मिक अहंकार बाळगून आहोत की आपण त्यांच्यापेक्षा अत्यंत सरस आहोत.
लूक १८:१०-१३ मध्ये प्रभु येशूने दोन माणसांविषयी म्हटले आहे जे मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते, एक हा परुशी आणि दुसरा जकातदार होता. परुशी उभा राहिला आणि स्वतःशीच प्रार्थना केली, देवा, मी तुझे आभार मानतो, की मी इतर माणसांसारखा नाही-जबरदस्तीने घेणारा, अन्यायी, व्यभिचारी किंवा या जकातदारासारखा देखील नाही. मी आठवडयातून दोनदा उपास करतो; माझ्याकडे जे सर्व काही आहे त्याचा दशांश देतो.' आणि जकातदार, हा दूर उभा होता, वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा मज पाप्यावर दया कर."
तुम्ही पाहा अगदी तीच शिकवण व सिद्धांत ज्यांनी परुश्याला मदत केली असती (या प्रकरणात, उपास आणि दशांश देणे), त्याचा अहंकार व गर्वामुळे त्यास देवासमोर न्यायी न ठरविण्याचे कारण झाले. म्हणून तुम्ही पाहता, जेव्हा आपण आपल्या आध्यात्मिकतेविषयी गर्विष्ठ आणि अहंकारी असतो, तेव्हा ते शेवटी आपल्या आध्यात्मिकतेस नष्ट करू शकते आणि अगदी त्या शिकवणी आणि सिद्धांतांपासून वेगळे करू शकते जे आपल्याला मार्गदर्शन करतात. ज्या गोष्टींचा आपण अहंकार करतो त्याच गोष्टी केवळ गर्वाद्वारे नष्ट केल्या जातात.
जर देव बलाम सारख्या संदेष्ट्याला शिकविण्यासाठी एखादया गाढवाचा वापर करू शकतो, तर मग देव एखादया लहान मुलाद्वारे देखील तुम्हांला शिकवू शकतो. जर बलाढय पेत्राला देखील एक कोंबडा शिकवू शकतो, तर मग तुम्ही तुमच्या भोवतालच्या साधारण लोकांकडून प्राप्त करणे आणि शिकण्यासाठी तयार असले पाहिजे.
म्हणून तुम्हांला तुमच्या स्वतःला विचारण्याची गरज आहे, "शिकण्यासाठी माझ्या स्वतःमध्ये अजूनही काही जागा शिल्लक आहे काय?" "मी बंद पात्र आहे किंवा शरण जाणारे पात्र आहे काय?" देवाकडे नेहमीच काहीतरी म्हणण्यास आहे. लोकांकडून नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यासाठी आहे. तुम्हांला तयार राहण्याची गरज आहे. वास्तविकता की तुम्ही पुढारी आहात याचा अर्थ हा नाही की तुम्ही आता लोकांकडून शिकू शकत नाही. आणि तुम्हीं घराचे मुख्य आहात याचा अर्थ तुमची पत्नी तुम्हांला काहीतरी शिकवू शकत नाही.
१ करिंथ १३:९ मध्ये प्रेषित पौलाने म्हटले, "कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो." तुम्ही ते पाहिले का? देवाने पुरुषाची तशा रीतीने रचना केली आहे म्हणजे आपण अहंकाराने प्रेरित होणार नाही. कोणीही सर्व ज्ञानाचा विश्वकोश नाही. इतरांना नेहमीच काहीतरी माहीत असते जे तुम्हांला शिकण्याची गरज आहे जर तुम्हांला ते माहीत असलेच पाहिजे. म्हणून, ते उंच खांदे खाली करा आणि शिकण्याच्या अडथळ्यावर चढा.

Join our WhatsApp Channel