english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
ई पुस्तके

आध्यात्मिक यशाचे गुप्त गणित-वाढणारा विश्वास

0 7
देवाच्या प्रिय लेकरांनो, या प्रकटीकरणासाठी तुमचे स्वागत आहे, आणि माझा विश्वास आहे की आध्यात्मिक वाढ, शिस्त आणि नशीबाच्या तुमच्या दृष्टीकोनाला पुन्हा परिभाषित करण्याची त्यात क्षमता आहे. बहुतेक लोक कल्पना करतात की मोठे यश मग ते आध्यात्मिक अथवा व्यवहारिक असो, ते एका नाट्यमय क्षण, एक नवीन प्रगती, किंवा अचानकपणे प्रेरणेच्या वाढीमुळे येते. आपण एक सामर्थ्यशाली भेट, एक मुख्य निर्णय, किंवा एखाद्या अलौकिक अनुभवासाठी वाट पाहतो जे रातोरात सर्वकाही बदलेल.

परंतु एक सत्य येथे आहे जे सातत्याने संघर्ष करणाऱ्यांपासून ज्यांची वाढ होत आहे त्यांना वेगळे करते.

खरे परिवर्तन- पवित्र शास्त्रामुळे खरे परिवर्तन- हे क्वचितच स्फोटक आहे.

हे जवळजवळ नेहमीच वाढणारे आहे.

जीवन बदलते हे केवळ मोठी झेप घेण्यामुळे नाही, परंतु लहान, वारंवार घेणाऱ्या पावलांमुळे. तुमची घडण हे तुमच्या दैनंदिन सवयींमुळे होत असते- वर्षातून एकदा होणाऱ्या तुमच्या प्रेरणेच्या क्षणामुळे नाही.

प्रचंड कार्य विरोधात वाढणारी प्रगती


अनेक विश्वासणारे नकळत एखाद्या सापळ्यात अडकतात : आपण आध्यात्मिक वचनबद्दतेपासून त्वरित परिणामांची अपेक्षा करतो. आपण म्हणतो :

  • “मी आज प्रार्थना केली -आज चमत्कार का झाला नाही?”
  • “मी संपूर्ण आठवडाभर बायबल वाचले-मी अद्याप आध्यात्मिकदृष्ट्या सामर्थ्यशाली का नाही?”
  • “मी माझ्या विवाहासाठी तयारी करू लागलो- का अद्याप काहीही बदलत नाही?”
जेव्हा त्वरित परिणाम दिसत नाहीत, निराशा होऊ लागते. आपण आपल्या स्वतःला प्रश्न करतो, आणि त्याहूनही वाईट, आपण देवाला प्रश्न करतो. आणि मग आपण सावकाशपणे त्या सवयींकडे पुन्हा वळू लागतो ज्यांना आपण सोडू इच्छित होतो.

स्वतंत्रता देणारे सत्य येथे आहे :

यश म्हणजे तुम्ही वारंवार करीत असलेल्या गोष्टींची बेरीज आहे –तुम्ही अधूनमधून करणाऱ्या गोष्टी नाही.

तुमचे नशीब अधूनमधून येणाऱ्या प्रेरणेने ठरत नाही, तर सातत्यपूर्ण दिशानिर्देशावरून ठरते.

ज्याप्रमाणे शरीर दररोजच्या पोषणाने वाढते, त्याप्रमाणे आत्मा दररोजच्या आज्ञापालनाने वाढतो.

“आमची रोजची भाकर आज आम्हांला दे.”
-मत्तय. ६:११
“तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात.”
-योहान ८:३१

वाढणारा परिणाम : का एक टक्का महत्वाचा आहे?

एका क्षणासाठी, चला आपण थांबू आणि काहीतरी अगदी महत्वाचे समजून घेऊ-आध्यात्मिकदृष्ट्या आणि गणितीयदृष्ट्या दोन्हीही प्रकारे. जर तुम्ही एक संपूर्ण वर्षभरात प्रत्येक दिवशी १ टक्का अधिक उत्तम होत जाता, तेव्हा ३६५ टक्के उत्तम होत नाही.

तुम्ही ३७.७८ वेळा उत्तम असे होता.

ही वाढण्याची शक्ती आहे.

लहान कृत्ये-दररोज वारंवार केली जातात-जे कालांतराने मोठे परिणाम निर्माण करते.

“आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो,....तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे येईल.”
-नीतिसूत्रे २४:३३-३४

(लहान कृत्ये- मोठे परिमाण)
“जो मूठ-मूठ साठवतो त्याचे धन वृद्धी पावते.”
-नीतिसूत्रे १३:११
(लहान सातत्य-मोठे परिणाम.)

१. तुमच्यासाठी वाढ-आशीर्वाद

प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही निवड करता :

  • पाच मिनिटांची प्रार्थना,
  • आभार व्यक्त करण्याचा एक क्षण,
  • एक वचन वाचले गेले,
  • दयाळूपणाचे एक कृत्य,
  • एका प्रलोभनाचा प्रतिकार केला.
स्वर्ग त्याची नोंद ठेवते-आणि ते वाढत जाते.

कालांतराने, ह्या लहान बिया आध्यात्मिक शक्ती, भावनात्मक स्थिरता, चांगेल नातेसंबंध, तीक्ष्ण समज, गहन शांती आणि अलौकिक कृपा निर्माण करते.

२. तुमाच्याविरोधात वाढ- चेतावणी

त्याप्रमाणेच, लहान नकारात्मक सवयी देखील वाढत जातात :
  • एक तक्रार,
  • रागाचा एक क्षण,
  • एक दिवस प्रार्थना करणे सोडून देणे,
  • एक तडजोड,
  • एक निष्काळजी विचार 
हे सावकाशपणे आनंद कमी करते, विश्वासाला रिकामी करते, शिस्तीला कमकुवत करते, शत्रूसाठी प्रवेश करण्यासाठी मागील द्वार उघडते आणि उध्वस्तता निर्माण करू देते.

“द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्या खोकडांना, त्या लहान खोकडांना आमच्यासाठी धरा.”
-गीतरत्न २:१५

लक्षात ठेवा, तुम्ही एका दिवसात शक्तिशाली किंवा कमकुवत होत नाही. हे हळूहळू, शांतपणे, वाढत जाते जे तुमच्या भविष्याचा निर्णय करते.

जेव्हा वाढ अदृश्य वाटते

प्रत्येक विश्वासूला विश्वासाच्या प्रवासात एका विचित्र टप्प्याला सामोरे जावे लागते –निराशेची दरी.

हा तो समय आहे जेथे :
तुम्ही प्रार्थना करता ..... पण काहीही वाटत नाही.
तुम्ही देवाचे वचन वाचता, .....पण बदल दिसत नाही.
तुम्ही स्वतःला शिस्त लावता, ....पण परिणाम दिसत नाही.
हे अशा समयीच बहुतेक लोक धीर सोडतात.

परंतु सत्य हे आहे :
तुमची फळे दिसण्यापुर्वी तुमची मुळे वाढत आहेत.

ज्याप्रमाणे बिया जमिनीवरती काहीही हालचाल दाखवत नाही, त्याचवेळेस ते शांतपणे खाली त्यांची मुळे मजबूत करत असतात, तुमच्या लहान आध्यात्मिक सवयी तुम्हांला आतूनबाहेरून शांतपणे परिवर्तीत करत असतात.

प्रभू येशूने ह्या गुप्त प्रक्रियेचे परिपूर्णपणे वर्णन केले आहे :

“आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही.”
-मार्क ४:२७

शांततेला अपयश समजू नका.
विलंबाला नकार समजू नका.
मंद प्रगतीला प्रगतीच नाही असे समजू नका.

प्रगतीच्या उंबरठ्याच्या अगदी समोर तुम्ही दरीमध्ये आहात.

देव लहान सुरुवातीची प्रशंसा करतो.

वाढण्याचे तत्व हे नवीन नाही. हे प्राचीन, दैवी शहाणपण आहे.

देवाने स्वतः म्हटले आहे :

“कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय?”
-जखऱ्या ४:१० 
तो पूर्ण केलेल्या मंदिराचा आनंद करत नाही...
त्याच्या मोठ्या परिणामात नाही ....
परंतु त्यासाठी घेतलेल्या पहिल्या पावलात.

का?
कारण लहान सवयी ह्या मोठ्या नशिबांचे जन्मस्थान आहेत.
एक दगड आज ठेवला तर उद्या ते मंदिर होते.
एक प्रार्थना आज म्हटली तर ती उद्या सामर्थ्याची जीवनशैली होते. 
एक वचन आज वाचले तर ते उद्या ते प्रकटीकरणाची विहीर होते.
देव अनेकदा आज्ञाधारकतेचे लहान कृत्य नशिबाचे मोठे द्वार उघडण्यासाठी वापरतो.

बदल जो तुम्ही आज केला पाहिजे

जर तुम्ही विश्वास, सेवाकार्य, कुटुंब, वित्त किंवा वैयक्तिक वाढीमध्ये टिकणाऱ्या यशाची इच्छा करता, तर ही मानसिकता ताबडतोब स्वीकारा :

मोठ्या बदलासाठी वाट पाहणे थांबवा.
लहान, सातत्यपूर्ण पावले उचलण्यास  सुरुवात करा.

स्वतःला विचारा :

  • आज मी कोणती छोटीशी आध्यात्मिक सवय सुरु करू शकतो?
  • देवासोबतच्या माझ्या चालण्यात कोणती १ टक्के सुधारणा मी करू शकतो?
  • कोणता एक लहान निर्णय आहे जो मला त्याच्या उद्देशाशी जुळवतो?
आज तुम्हांला डोंगरावर चढण्याची गरज नाही.
केवळ एकावेळी एकच पाऊल उचला.

तुमचा विश्वास वाढेल.
तुमची शिस्त वाढेल.
तुमचा आज्ञाधारकपणा वाढेल.

आणि एके दिवशी, तुम्ही मागे पाहाल आणि तुम्हांला आश्चर्य वाटेल की देवाने तुम्हांला किती दूर आणले आहे.

बी कार्य करत आहे.

तुमच्या सवयींचा बिया म्हणून विचार करा.

बी प्रगती दाखवत नाही ज्याक्षणी तिला पेरले जाते. परंतु जमिनीखाली, एक चमत्कार घडत आहे :

मुळे बनत आहेत, रचना मजबूत होत आहे आणि भविष्याच्या वाढीसाठी जीवन स्वयं पुन्हा व्यवस्थित रचले जात आहे.

तुमच्या आध्यात्मिक सवयी तेच करतात.
निराश होऊ नका.
लहान गोष्टींच्या दिवसाचा तिरस्कार करू नका.

तुमच्या रोजची शिस्त-कितीही लहान दिसोत-ते तुम्हांला अत्यंत वाढीसाठी तयार करत आहेत.

विश्वासू राहा.
सातत्यपूर्ण राहा.
तुमचा वाढता विश्वास लवकरच तुमच्या जीवनात देवाच्या गौरवाची साक्ष देईल.

“ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या  दिवसापर्यंत सिद्धीस नेईल.”
-फिलिप्पै. १:६
Join our WhatsApp Channel
अध्याय
  • समर्पण
  • बुक ब्लर्ब - अत्यंत यशस्वी लोकांच्या गुप्त सवयी
  • आध्यात्मिक यशाचे गुप्त गणित-वाढणारा विश्वास
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन